Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

साधले तर वार कर ...

व — विशाल कुलकर्णी, गुरुवार, 02/22/2018 - 06:57
कोण जाणे रोज ओझे जीव कसले वाहतो बंद डोळ्यांनी सुखाचे भोग फसवे भोगतो वाट चुकलेली कदाचित मागल्या वळणावरी मी नवा उत्साह लेवुन गांव दुसरे शोधतो अंबराची सांगता महती मला का सारखी मी इथे मातीतुनी दररोज इमले बांधतो सावजाला ठाव असते नाव व्याधाचे इथे प्राण घेताना बळीचे आर्त डोळे टाळतो साधले तर वार कर या काळजावरती सखे अन्यथा मी पाठ फिरवुन नयन हलके झाकतो © विशाल विजय कुलकर्णी

प्रतिक्रिया द्या
3184 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ख
खिलजि गुरुवार, 02/22/2018 - 07:35 नवीन
आगमनाची सुरुवात ऐसी, तर सांगतेची काय तमा ... काळजाचा ठाव घेते , कडव्याची प्रत्येक सीमा ... सिद्धेश्वर
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 02/22/2018 - 07:36 नवीन
सावजाला ठाव असते नाव व्याधाचे इथे प्राण घेताना बळीचे आर्त डोळे टाळतो.. जबर्दस्त....
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 02/22/2018 - 08:14 नवीन
क्या बात!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 02/22/2018 - 09:22 नवीन
इमले आणि शेवटचा शेर खासंच!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 02/22/2018 - 10:28 नवीन
क्या बात है विशाल... मस्तच आवडली वाट चुकलेली कदाचित मागल्या वळणावरी मी नवा उत्साह लेवुन गांव दुसरे शोधतो हे विषेश आवडले. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 02/23/2018 - 07:53 नवीन
धन्यवाद मंडळी !
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sun, 02/25/2018 - 06:43 नवीन
क्या बात है !!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 03/08/2018 - 07:27 नवीन
धन्यवाद शार्दुल !
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 03/08/2018 - 16:59 नवीन
सुंदर रचना!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा