नव्या वादळी नाव हाकारतो
कुठे भेदूनि दाट अभ्रांस थोडा
फिका चंद्र क्षणमात्र तेजाळतो
निळी पेटती रेष रेखीत गगनी
अनामिक उल्केस बोलावितो
भणाणून आवर्त झोंबे शिडांसी
सुकाणू दिशाहीन कैसे फिरे
पुन्हा का अकस्मात तारा खुणेचा
कुणाला न ठाऊक कोठे विरे
जिभा अंध:कारास फुटती हजारो
तशी गाज ह्या सागराची उठे
रोरावती मत्त लाटा अनादि
किनाऱ्यावरी गर्व त्यांचा फिटे
उद्याच्या उषेचीच आता प्रतीक्षा
उद्याच्याच सूर्यास मी जाणतो
तमाची तमा नाही आता जराही
नव्या वादळी नाव हाकारतो
💬 प्रतिसाद
(8)
ख
खिलजि
गुरुवार, 03/01/2018 - 15:41
नवीन
कविता फार सुंदर झालेली आहे .. अति सुंदर कविता .. हे कडवं तर मनात घर करून गेलंय राव ..
जिभा अंध:कारास फुटती हजारो
तशी गाज ह्या सागराची उठे
रोरावती मत्त लाटा अनादि
किनाऱ्यावरी गर्व त्यांचा फिटे
सिद्धेश्वर विलास पाटणकर
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Fri, 03/02/2018 - 04:36
नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Fri, 03/02/2018 - 04:56
नवीन
हा मोती राहूनच गेला वाचायचा.
नादमय ..वाह!
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Fri, 03/02/2018 - 05:35
नवीन
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
- Log in or register to post comments
स
सत्यजित...
Wed, 03/07/2018 - 22:11
नवीन
अतिशय सुरेख कविता!
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
गुरुवार, 03/08/2018 - 17:36
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
गुरुवार, 03/08/2018 - 17:54
नवीन
सुंदर कविता !
अतिशय चित्रदर्शी !
हाकारणे
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Mon, 03/12/2018 - 06:13
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments