Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देव आहे का नाही...वाद कशाला? स्वतःच पडताळून पाहा आणि ठरवा

क
क्रिप्ट
Tue, 02/27/2018 - 04:07
🗣 127 प्रतिसाद
इथे गेले अनेक दिवस देव आहे की नाही, आस्तिक विरुद्ध नास्तिक अश्या बऱ्याच चर्चा सुरु आहेत. तसेही हा विषय काही नवीन नाही. गेली अनेक वर्षे हे सुरु होते आणि पुढेही सुरु राहील. देवावर श्रद्धा असलेले आस्तिक त्यांची आस्था सोडणं अवघड आहे आणि त्यांच्या श्रद्धेवर तुटून पडण्यापासून माघार घेणं हेही नास्तिकांना अवघड आहे. परंतु भारतीय अध्यात्मशास्त्राने यावर सोपे उत्तर आधीच देऊन ठेवलेले आहे. खर म्हणाल तर उत्तर एक्दम सोपे आणि म्हणाल तर अवघडही आहे. ते असे की तुम्ही स्वतःच तपासून पहा की देव आहे कि नाही ते! स्वतः प्रयत्न करा...अनुभव घ्या आणि मगच आपले ठाम मत तयार करा. हे खरे कि येथे ९९.९९९९% लोकांनी मग ते आस्तिक असोत कि नास्तिक, प्रत्यक्ष देव काही पाहिलेला नाही. काहीवेळा आस्तिकांना त्या शक्तीचा कदाचित थोडाफार अनुभव आलेला असावा अथवा काही योगायोगामुळे त्यांचे तसे मत झाले असावे परंतु नक्की कशामुळे अनुभव आला याचा शोध घेण्याचा प्रयत्न काही कोणी करत नाही. त्यापेक्षा सहजपणे श्रद्धा ठेऊन ते मोकळे होतात. त्याचप्रमाणे देवावर विश्वास नसलेले नास्तिक देखील देवाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न न करता तो नाहीच असे ठामपणे म्हणत असतात. एखाद्या गोष्टीचे अस्तित्व सहजपणे दाखवता किंवा अनुभवता येत नसेल तर ती अस्तित्वातच नाही हे म्हणणे अगदी सोप्पे असते. थोडक्यात काय तर आस्तिक असो व नास्तिक कोणीही देवाचा शोध स्वतःहून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आता तुम्ही विचाराल कि शोध घ्यायचे म्हणजे नक्की काय करायचे? आता आपल्यापैकी अनेकजण शाळेमध्ये गणित शिकलेले असालच. आता मी तुम्हाला सांगितले कि १११ गुणिले १११ याचे उत्तर १२३२१ असे आहे तर तुम्ही काय कराल? एकतर तुम्ही उत्तर माहित नसताना देखील मी सांगितलेल्या उत्तरावर विश्वास ठेवाल, किंवा ते उत्तर चुकीचेच आहे असे म्हणाल. दोन्ही मार्ग तसे चुकीचेच. योग्य मार्ग हाच कि शाळेमध्ये जो आपण गुणाकार शिकलेलो आहे त्याचा वापर करून स्वतः उत्तर काढणे आणि पडताळून पाहणे. आता शाळेत शिकताना आपण काय केले तर बाई/सर जे शिकवीत आहेत ते प्रमाण मानून गुणाकार शिकला आणि स्वतः पडताळून पाहिले. देवाच्या शोधाप्रीत्यर्थ इथेही तेच करायचे आहे. गेल्या हजारो वर्षात अनेकांना स्वतःच्या अस्तित्वाच्या प्रयोजनावर, देव आहे कि नाही यावर अनेक प्रश्न पडले आणि ते शोधताना आजच्या काळातील शास्त्रज्ञांनी जसे प्रयोग केले तसे अनेक प्रयोग या भारतभूमीत झाले. त्यावरून ज्यांना या जगापलीकडील रहस्य गवसले, जो काही शोध लागला तो ज्या पद्धतीमुळे लागला त्या पद्धती नोंदवून ठेवल्या. या पद्धती ज्यांनी वापरल्या त्या अनेक लोकांना मग ते विविध काळातील का असेनात काही अनुभव आले आणि या पद्धती प्रमाण झाल्या. आता वर गणिताचे उत्तर जसे काढले तसे आपल्याला एका समंजस विद्यार्थ्यांप्रमाणे फक्त एवढेच करायचे आहे कि या पद्धती शिकायच्या आहेत आणि त्याचा वापर करून उत्तर स्वतः पडताळून पाहायचे आहे. बस्स काम झाले. बाकी आस्तिक किंवा नास्तिक यापैकी कोणत्याही एकाबद्दल दुराग्रही असण्याची अवशक्यताच काय? आता आपले दुर्दैव हेच कि ज्या गोष्टींचे उत्तर असंख्य लोकांना ज्या पद्धती वापरून मिळाले आहे ते सर्व आपल्याकडे खूप पूर्वीपासून उपलब्ध असूनही सध्याच्या काळातील असंख्य लोक त्यापासून अनभिज्ञ आहेत. एवढेच काय तर माहित असूनही न उत्तर न शोधता किंवा पद्धती न वापरता त्या कश्या चुकीच्या किंवा खोट्या आहेत किंवा वापरणारे कसे मूर्ख आहेत याचा डंका पिटण्यात आनंद मानणारे हि बरेच आहेत. भारतीय अध्यात्मशास्त्र थोडेजरी वाचले तरी या वेगवेगळ्या पद्धतींची तुम्हाला ओळख होईल. त्यात प्रामुख्याने उपनिषदे, पातंजल योग, ब्रह्मसुत्रे आणि गीता यांचा समावेश होतो. उपनिषदे वाचलीत तर लक्षात येईल सर्व प्रमुख उपनिषदे ही संवाद रूपी किंवा प्रश्नोत्तर रुपी आहेत. Fools argue and wise discuss या उक्तीवरच ती आधारित आहेत. उपनिषदे सरळ सरळ सांगत आहेत कि बाबांनो देव आहे कि नाही या वादात न पडता स्वतः पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा. त्यामुळे तुम्ही नास्तिक जरी असाल तरी उपनिषदांचा अभ्यास करा आणि त्यात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून ठरवा. पतंजली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सूत्रात स्पष्टपणे म्हणतात - योगश्चित्तवृत्तिनिरोधः| तदा द्रष्टुः स्वरूपेऽवस्थानम् || अर्थात योग म्हणजेच चित्तवृत्तींचा निरोध थोडक्यात चित्ताला निरनिराळी रूपे धारण करू न देणे अथवा सजगपणे मनातील विचारलाटा पूर्णपणे थांबवणे. असे केले तर द्रष्टा (ईश्वर म्हणा, देव म्हणाला किंवा शक्ती म्हणा) आपल्या स्वरूपात प्रकट होतो. इथे तर पतंजली सरळसरळ असंख्य लोकांना ईश्वर, देव का दिसत नाही अथवा केंव्हा दिसेल याचे स्पष्टपणे उत्तर देत आहेत. आता चित्तवृत्तींचा निरोध कसा करावा त्यासाठी काय मार्ग आहेत हे जाणण्यासाठी पतंजली योगसूत्रे नक्की वाचा. मनोविज्ञानातही झाला नसेल तेवढा मनाचा सूक्ष्म अभ्यास त्यांनी मोजक्या शब्दात मांडला आहे. काहीच मिळाले नाही तरी यात मनाची काही अद्भुत रहस्ये नक्की कळतील. त्यामुळे आस्तिक असाल वा नास्तिक पतंजली ने सांगितलेला अष्टांग योग आचरणात आणण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा. जर तुम्ही आस्तिकतेकडे झुकला असाल तर तुमच्यासाठी गीता आहे. देवाचा प्रत्यक्ष प्रमाण अनुभव आला नसेल तर केवळ श्रद्धा असून काय उपयोग? परंतु त्याच श्रद्धेचा उपयोग गीतेत सांगितल्याप्रमाणे भक्ती किंवा कर्मयोगाचा वापर करून देवाचा अनुभव घेण्यासाठी केला तर नक्कीच काहीतरी गवसेल. थोडक्यात काय तर देव आहे किंवा नाही असे सरधोपटपणे दुराग्रही विधान करण्याऐवजी आपला सांस्कृतिक वारसा असलेल्या अध्यात्मशात्रात लिहिल्याप्रमाणे स्वतः प्रयत्न करून पहा आणि मगच आपले मत ठरवा...बघा पटतंय का?

प्रतिक्रिया द्या
88615 वाचन

💬 प्रतिसाद (127)
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 02/27/2018 - 08:29 नवीन
छान डीक्रिप्ट केले आहेस रे क्रिप्टा.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 02/27/2018 - 09:18 नवीन
नास्तिक व आस्तिक यात वाद काहीही असोत. एक प्रश्न असा आहे की देव हा साक्षीदार आहे की पक्षकार . त्याला भावना आहेत का ? तो असलाच तर त्याच्या ठायी निर्णयक्षमता आहे का ? या प्रश्नाची उत्तरे उपनिषदात मिळतात का ?
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 02/27/2018 - 09:20 नवीन
देवाची भूमिका न्यायाधीशाची असेल तर तो ज्या निकषावर न्याया देतो त्या निकषांचा निर्माता कोण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 10:33 नवीन
सध्याच्या न्यायाच्या निकषांचा निर्माता कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 10:51 नवीन
जगाचं जे अध्यात्मिक स्ट्रक्चर आहे त्यात ज्यूडिशिअरी आहे नि तिच्या प्रोसिजर्स या आपल्या मानवांच्या ज्यूडिशिअरीसारख्याच आहेत हे कसं गृहित धरलंत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा Wed, 02/28/2018 - 12:11 नवीन
जगाचं जे अध्यात्मिक स्ट्रक्चर आहे त्यात ज्यूडिशिअरी आहे नि तिच्या प्रोसिजर्स या आपल्या मानवांच्या ज्यूडिशिअरीसारख्याच आहेत हे कसं गृहित धरलंत? आमचं ग्रुहीत चूक असेल तर आध्यात्मिक ज्यूडिशिअरी आहे याचे भान आपल्याला आहे हे गृहित आपण कसं धरलंत ते सांगा ! इथं तुमची अध्यात्मिक खोली आहे तरी किती हे कळू द्या सर्वाना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 18:00 नवीन
आध्यात्मिक ज्यूडिशिअरी आहे याचे भान आपल्याला आहे
माझी वाक्ये पुनश्च वाचा. मी कोणतंही गृहितक केलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
म
मराठी कथालेखक Tue, 02/27/2018 - 09:19 नवीन
पण हे सगळं नाही अभ्यासलं तरी काही बिघडणार नाही. ज्यांना देव मानायचा त्यांनी तो मानत रहावा आणि ते मानत राहतीलच. ज्यांना तो नाही मानायचा ते नाही मानणार. माझ्या मते विज्ञानाच्या पुस्तकात देव नाही, 'देवाच्या अस्तित्वाचा पुरावा /दाखले देणारे' शोध प्रसिद्ध झाले नाहीत तर मला देव मानत बसायचे काही कारण नाही. इलेक्ट्रॉन , प्रोटॉनही मी स्वतः बघायला गेलो नाही पण अनेक शास्त्रज्ञांनी त्याचे अस्तित्व मान्य केलेय तर मी ही ते मान्य केलंय. आता माझा पोटापाण्याचा उद्योग सोडून मी शास्त्रज्ञ बनू शकत नाही.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 10:34 नवीन
'देवाच्या अस्तित्वाचा पुरावा /दाखले देणारे' शोध प्रसिद्ध झाले नाहीत तर मला देव मानत बसायचे काही कारण नाही.
प्रत्येक सत्यास पुरावा असतोच हे मानत बसायचे कारण काय असावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Sat, 03/03/2018 - 15:15 नवीन
देवाच्या अस्तित्वाचा पुरावा /दाखले देणारे' शोध प्रसिद्ध झाले नाहीत तर मला देव मानत बसायचे काही कारण नाही.
यातला 'मला' हा शब्द महत्वाचा आहे असं नाही वाटत नाही का तुम्हाला ? वाटत असेल तर मला 'देव आहे' असं न मानण्याचं स्वातंत्र्य आहेच आहे हे तुम्ही मान्य कराल अशी माझी अपेक्षा. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 02/27/2018 - 10:27 नवीन
देव माना किंवा मानू नका, त्याने फारसा फरक पडत नाही, पण... १. आपल्यासारखाच इतरांनाही आपले स्वतंत्र मत असण्याचा हक्क आहे, हे ध्यानात ठेवा... याला समता (equality) म्हणतात. २. आपल्या मताचा इतरांना उपद्रव होणार नाही याची काळजी घ्या... याला सभ्यता (civility) म्हणतात. ३. दुसर्‍याचा मताचा आदर करा आणि आपले मत दुसर्‍याला पटवून देताना ते त्याच्यावर जबरदस्तीने लादले जाणार नाही याची काळजी घ्या... याला सहिष्णुता (tolerance) म्हणतात. ४. अनेक मतमतांतरे असली तरीही किमान मानवी मुल्यांच्या पायावर समाज सामंजस्याने राहू शकतो व विकास साधू शकतो, यावर विश्वास ठेवा... याला बंधुभाव (brotherhood) म्हणतात. वरचे सर्व मुद्दे समजून उमजून वर्तन केले तरच मानवी समाज स्वातंत्र्यात व सुखसमाधानात राहू शकेल. मानवी हक्कांच्या सद्य कल्पना मानवी विचारातूनच निर्माण झालेल्या आहेत. काळाबरोबर परिस्थिती जसजशी बदलत जाईल तसतशा या कल्पनांत विकास/बदल होत राहील. त्याकरिता देवाचे, धर्माचे किंवा एखाद्या विचारधारेचे अधिष्ठान असणे नसणे ही गोष्ट महत्वाची नाही, किंबहुना ते आवश्यकसुद्धा नाही. मानवी मनाचा प्रामाणिकपणा, समजूतदारपणा, चांगुलपणा व न्यायभावना पुरे होतील.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 02/27/2018 - 16:52 नवीन
या साठीच मी निरीश्वरवादी असलो तरी पूजा करतो , आरती करतो.भजन म्हणतो . प्रसाद घेताना मस्तकी लावतो . देवळात गेलो की तेथील सर्व नियम पाळतो . ( उदा लुंगी घालून जाणे - पदमनाभ मंदीर त्रिवेंद्रम ) . पण हे सर्व करताना मागत काहीच नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 10:36 नवीन
जितक्या निरर्थकपणे आपण धार्मिक कर्मकांडे करता तितक्याच निरर्थकपणे आपण निरिश्वरवादी असण्याची संभावना आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा Wed, 02/28/2018 - 11:59 नवीन
जितक्या निरर्थकपणे आपण धार्मिक कर्मकांडे करता तितक्याच निरर्थकपणे आपण निरिश्वरवादी असण्याची संभावना आहे काय? जगात प्रत्येकाला अर्थ असलाच पाहिजे असा नियम आपला आहे काय ? आत खरे उत्तर - मी जे करतो त्यास मी उपासना म्हणत नाही भक्तांप्रमाणे . त्यात करमणूक आहे ! बस इत्तकेच ! ती करमणूक मधुबालेचा पिकचर पाहिल्यावर मिळते. या दोन्ही आनंदात मी फरक करीत नाही. सबब ती करमणूक असल्याने खाली गावडे यानी म्हटल्याप्रमाणे कुणालाही त्याचा त्रास नाही. देवळाच्या लाईनीत रखडताना ज्याना अत्यानंद मिळतो त्यानी तो जरूर घ्यावा . मला त्यात देवळाचा नियम पाळल्याचा आनंद मात्र नक्कीच मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 18:05 नवीन
जगात प्रत्येकाला अर्थ असलाच पाहिजे असा नियम आपला आहे काय ?
हे माझ्या प्रश्नाचं हो असं उत्तर आहे. =======================
मी जे करतो त्यास मी उपासना म्हणत नाही भक्तांप्रमाणे . त्यात करमणूक आहे !
धर्म पाळणं करमणूक तर आहेच. पण केळ खाणारानं ते पांढरं असतं म्हणून खावं, ते मऊ असतं म्हणून खावं, ते स्वस्त असतं म्हणून खावं पण त्यात अन्नमूल्य आहे म्हणून खाऊ नये ही देखील आमच्यासाठी एक करमणूकच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा गुरुवार, 03/01/2018 - 02:43 नवीन
इरतत्र खडवहीवर ही तुम्ही हे प्रतिसाद गमतीने लिहित असता असे लिहिले आहे. नास्तिकांच्या " चिकित्सक " व्रुतीची शाब्दिक चिरफाड हा तुमचा छंद आहे करमणूक आहे हे वाचून आनंद वाटला. असाच आनंद घेत रहा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
प्रकाश घाटपांडे Wed, 02/28/2018 - 10:37 नवीन
मग कडवे नास्तिक तुम्हाला बूर्झ्वा बूर्झ्वा करुन अस्तिकांच्या गटात ढकलतील व तुम्हाला अस्पृश्य मानतील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
स
सतिश गावडे Tue, 02/27/2018 - 18:15 नवीन
हा प्रतिसाद कट्टर नास्तिक लोकांनी देवभोळ्या लोकांवर तुटून पडण्यापूर्वी मार्गदर्शक तत्वे म्हणून वाचला तर ते नास्तिक आस्तिक लोकांवर तुटून पडणारच नाहीत. =)) सरसकट श्रद्धेला विरोध न करता श्रद्धेच्या अनुषंगाने येणाऱ्या अपप्रवृत्तींना विरोध व्हायला हवा. उदा. कुणी घरात भक्तिभावाने गणपतीची पूजा करत असेल तर तो त्या व्यक्तीचा व्यक्ती म्हणून असलेला अधिकार आहे, त्याला विरोध नको. मात्र गणपती पूजेचा उत्सव होऊन रस्त्यावर मंडप घालून वाहतुकीला जो अडथळा होतो, लाऊड स्पीकर आणि ढोल वाजवून जो मोठ्या आवाजाचा त्रास होतो त्याचा कडाडून विरोध करायला हवा. किंबहूना असा विरोध होण्यापेक्षाही सश्रद्ध लोकांनी विवेकी वृत्तीने वागून आपल्या श्रद्धेचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
आ
आनन्दा Wed, 02/28/2018 - 04:37 नवीन
सामान्यपणे सश्रद्ध लोक देवाच्या कृपेसाठी यातले कोणतेही प्रकार करत नाहीत. हे सगळे करणार्‍यांचे हेतू वेगळे असतात, इतके नमूद करून खाली बस्तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Wed, 02/28/2018 - 05:50 नवीन
सामान्यपणे सश्रद्ध लोक देवाच्या कार्यक्रमात असे प्रकार करतात असे निरीक्षण आहे. इथे मिपावरच गणेशोत्सवात ढोल बडवण्याचे समर्थन झाले होते एके काळी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
श
श्रीगुरुजी Wed, 02/28/2018 - 08:20 नवीन
रस्त्यावर साज-या होणा-या सर्व जातीधर्मांच्या सर्व सण/उत्सव/समारंभांवर बंदी हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
प्रकाश घाटपांडे Wed, 02/28/2018 - 10:40 नवीन
खरच घालावी. पण तुम्ही जाणता हे भारतात लोकशाहीत शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 10:46 नवीन
धर्म ही एक सार्वजनिक गोष्ट आहे. लोकशाही विफल आहे म्हणून लोकशाही बर्खास्त करायची का? सार्वजनिकता हा धर्माचा अविभाज्य भाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
आ
आनन्दा Wed, 02/28/2018 - 08:58 नवीन
श्रद्धा आणि परंपरा या वेगळ्या गोष्टी आहेत.. श्रद्धा आणि श्रद्धेचा बाजार या देखील वेगळ्या गोष्टी आहेत.. आणि ढोल वाजवणे ही श्रद्धा तर नाहीच, पण परंपरा पण नवीनच आहे.. व्यक्तिशः मी श्रद्धाळू असूनदेखील कधीही मिरवणूक बघायला जात नाही, ढोल एक वेळ ठीक आहे, डीजे तर मला सहनच होत नाही.. जिथे गर्दी असेल तिथे मी सामान्यतः जात नाही.. माझं यनावालांच्या बरोबर पण हेच भांडण आहे.. ते सांगत असलेलया बऱ्याच गोष्टी मी मुळातच करत नाही, पण मी श्रद्धाळू आहे.मी व्यक्तिगत आयुष्यात ईश्वर मानतो. मग सरसकटीकरण करून तीच सगळी विशेषणे ते मला पण का लावतात हा मुख्य प्रश्न आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 10:49 नवीन
सही पकडे हो. आणि हे सगळं दीडशहाणे लोक नास्तिक झाल्यामुळं झालं आहे. धर्म पाळणारे लोक मंजे नुसता गाळ उरला आहे. आणि धर्म न पाळणारे लोक व्यवस्थाविकृतीकरणात गुंतले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 10:42 नवीन
घरीच काय सार्वजनिक स्थळी देखील ईश्वर मानावा या विचाराचा असलो तरी पुण्यात आल्यापासून गणपती हा शब्दही मला आवडत नाही. इथले गणेशोत्सव बिभत्स असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
म
मार्मिक गोडसे Wed, 02/28/2018 - 11:19 नवीन
कुणी घरात भक्तिभावाने गणपतीची पूजा करत असेल तर तो त्या व्यक्तीचा व्यक्ती म्हणून असलेला अधिकार आहे, त्याला विरोध नको. अगदी बरोबर, परंतू त्याचरोबर घरातील नास्तिक व्यक्तीवर सोवळे ओवळे व खाण्यापिण्याची बंधनेही घालू नये. श्रद्धा स्वतःपूर्ता मर्यादित ठेवल्यास कोणालाच त्रास होणार नाही. विनाकारण बंधने कोणीच स्वीकारणार नाही मग तो आस्तिक असो वा नास्तिक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 18:09 नवीन
परंतू त्याचरोबर घरातील नास्तिक व्यक्तीवर सोवळे ओवळे व खाण्यापिण्याची बंधनेही घालू नये.
राष्ट्रगीताच्या गायनाच्या वेळी ज्यास घटनात्मक संचारस्वातंत्र्य आहे त्यास एकाच ठिकाणी थांबण्याचे बंधन घालू नये. त्याला सैरावैरा पळू द्यावे. त्या वातावरणाची एकूणता अशी काही नसते. प्रत्येक जण सुटा सुटा असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 03/01/2018 - 04:10 नवीन
राष्ट्रगीताबाबत तसं काही बंधन नसल्यास ,हो. मुळ मुद्द्याला बगल देण्यासाठी असंबद्ध उदाहरण देऊन विषय भरकटवणे हाच तुमचा कायम उद्देश असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
मराठी कथालेखक Sat, 03/03/2018 - 15:24 नवीन
असा समंजसपणा असला की वाद होत नाहीत. माझी पत्नी अस्तिक तर मी नास्तिक आहे पण आमचे (निदान या विषयावरुन) कधी वाद होत नाहीत. शिवरात्रीलाही ती माझ्याकरिता नेहमीचा स्वयंपाक करते तर तिच्या इच्छेखातर मी तिच्यासोबत शिर्डीच्या मंदिरात रांगेत तासभर उभा होतो (कारण तिला एकटीला रांगेत उभ रहायला सांगणे मला योग्य वाटलं नाही) आणि मग दर्शनाची वेळ आल्यावर मी हात न जोडताच पुढे सरकलो याबद्दल तिलाही काही वाटले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ब
बापू मामा Fri, 03/02/2018 - 17:25 नवीन
आपल्या प्रतिक्रियेशी पूर्णत: सहमत आहे।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सतिश गावडे Tue, 02/27/2018 - 18:20 नवीन
देव कसा आहे याबद्दल विविध धर्म, पंथ, ग्रंथ इत्यादींमध्ये एकवाक्यता नाही मग देव आहे की नाही याचा पडताळा कसा घ्यायचा बरे?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/27/2018 - 18:55 नवीन
त्यासाठी एखाद्या सत्पुरूषाचे मार्गदर्शन घ्या किंवा गतकाळातील सत्पुरूषांनी लिहिलेल्या ग्रंथात सांगितलेल्या मार्गाने जा किंवा कोणाच्याही मदतीशिवाय स्वत:च शोध घ्यायचा प्रयत्न करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Tue, 02/27/2018 - 19:16 नवीन
माझा प्रश्न पुन्हा वाचा. हवं तर धर्म, पंथ आणि ग्रंथ या यादीत सत्पुरुषही जोडा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 02/27/2018 - 19:35 नवीन
माझे उत्तर पुरेसे स्पष्ट आहे. ते पुन्हा एकदा वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Tue, 02/27/2018 - 20:05 नवीन
बरे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
क्रिप्ट Tue, 02/27/2018 - 22:21 नवीन
विविध धर्मामध्ये एकवाक्यता खरे तर आहे. फक्त माणसांनी ग्रंथांमधील अर्थाचा अनर्थ केला. जर रूढार्थाने पहिले तर सर्वच धर्म ईश्वराचा/उच्च अध्यात्मिक शक्तीचा स्वीकार करतात. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मात निर्गुण, निराकार ईश्वराचा उल्लेख आढळतो. बायबल मध्येही ईश्वराचा उल्लेख आहे. हिंदू धर्मात ओम तत् सत हि संकल्पना आहे तशी ख्रिस्त लोकांमध्ये Trinity आहे. बुद्ध जैन आणि शीख हे धर्म हिंदू धर्माच्याच शाखा मानल्या जातात आणि बर्याचश्या ईश्वरीय संकल्पना हिंदू धर्मातूनच आल्या आहेत. सारांश विविध धर्मामध्ये एकवाक्यता खरी तर आहे. परंतु समस्या तेंव्हा निर्माण होते जेंव्हा माझा धर्म दुसऱ्या धर्मापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याची चढाओढ लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 10:58 नवीन
नास्तिकांचे प्रकार अस्तिकांच्या प्रकारांपेक्षा अगणित आहेत. सतिशजींना नास्तिक बनताना हाच प्रश्न का पडत नसावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रिप्ट
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 10:56 नवीन
सतिशजी, विविध धर्म, पंथ, विचारधारा, इ चा संदर्भ घ्यायचाच कशाला? आपल्याला कोणते प्रश्न पडतात, त्यातल्या कोणत्या प्रश्नांची उत्तरे आवश्यक आहेत नि ती काय आहेत हे पुरेसं नाही का? बाकी लोकांनी अनालिसिस करताना काय दिवे लावले त्याच्याशी आपल्याला संबंध नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
च
चौकटराजा Wed, 02/28/2018 - 12:04 नवीन
गौतम बुद्धाला॑ देवाचे अस्तित्व मान्य नव्हते हे खरे का ? ते असेल तर बौद्ध धर्म इतका जगात का पसरला ? की गौतमाचे तत्वद्नान ही " निरर्थक " म्हणायचे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 18:12 नवीन
गौतम बुद्धाला देव, दानव, भूते इ सर्वांचे अस्तित्व मान्य होते, नेतृत्व नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा गुरुवार, 03/01/2018 - 00:48 नवीन
आपल्या वरील विधानाला संदर्भ॑ द्या अथवा आपण फक्त शाब्दीक युक्तीवाद करता असे मी समजेन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/27/2018 - 18:24 नवीन
देव बीव काय नसतं. वास्तवात आणि स्वत:वर विश्वास ठेवून जगा....आधुनिक विचारांची कास धरा. देवा बिवाच्या नादी लागू नका. असतील दिवस वाईट तर खचू नका, तेही दिवस निघून जातील. ''जब अच्छे दिन रुक नही सकते तो बुरे दिनों की क्या औकात है'' असं म्हणून जगा इंजॉय करा आयुष्य. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 02/27/2018 - 19:19 नवीन
आयुष्य हे शेअर मार्केटसारखे असते. चढउतार येणारच. जेव्हा आयुष्य उंची गाठते तेव्हा राजा असल्यासारखे वागू नका. त्या उंचीचा अंदाज घेऊन आयुष्याचं कल्याण करा. आणि जर पडता काळ असेल तर घाबरुन जाऊन माघार घेऊ नका. पुन्हा चांगले दिवस येणारच असतात. जसा सेन्सेक्स बराच पडून पुन्हा उसळी मारतो तसे. शुभ रात्रकाळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 11:01 नवीन
पुन्हा चांगले दिवस येणारच असतात.
काय संबंध? उगंच काहीही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे गुरुवार, 03/01/2018 - 18:38 नवीन
लय भारी पेटून उठता राव तुम्ही. तुमचे हे पेटून उठणेच आम्हाला प्रतिसाद द्यायला मजबूर करते बघा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
क
क्रिप्ट Tue, 02/27/2018 - 22:24 नवीन
----देव बीव काय नसतं. देवा बिवाच्या नादी लागू नका -----दिलीपजी, हेच सरसकट विधान अनुभवाच्या जोरावर तपासून घ्या असे आपले अध्यात्म सांगते. मी लेखात म्हणल्याप्रमाणे ज्यांनी तो प्रयत्न पूर्वी केला त्यांना अगदी याउलट अनुभव आला आहे. आणि असे अनुभव कालातीत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विजुभाऊ Wed, 02/28/2018 - 09:26 नवीन
'जब अच्छे दिन रुक नही सकते तो बुरे दिनों की क्या औकात है'' मास्तर अच्छे दिन कधी येणार आहेत ते तरी सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/28/2018 - 17:16 नवीन
>>>>>मास्तर अच्छे दिन कधी येणार आहेत ते तरी सांगा ! विजुभौ, भक्तांचं देवाचं वेड गेल्याशिवाय अच्छे दिनाची शक्यता वाटत नै. बाय द वे, विजुभाऊ तुम्हाला कोंचा देव आवडतो ? तेहतीस कोटी पैकी, भारी वगैरे वाटतो ? प्रसन्न वगैरे होईल आणि म्हणेल बेटा मांगो, तुम्हे जो मांगना है वह मांगो ? काय मागाल तुम्ही ? :) -दिलीप बिरुटे (विजुभौच्या लेखनाचा भक्त) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 18:15 नवीन
६ कोटी लोक मारणार्‍या माओला पुजणारे पु ल देशपांडे इत्यादि अज्ञानी लोक जोपर्यंत नास्तिक अंधपणे फॉलो करणे सोडणार नाहीत....तोपर्यंत अच्छे दिन येणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा