Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माय गे माय...

प — प्राची अश्विनी, Tue, 02/27/2018 - 15:53
सक्काळपासूनच्या कौतुकाने हरखलेली माय मराठी दमून भागून जरा ओसरीवर टेकली. डोक्यावरचं संदेशांचं, भाषणांचं, योजनांचं ओझं उतरवलं. गळ्यातले हारतुरे काढून बाजुला ठेवले. पिशवीतला श्रीखंडाच्या गोळ्यांचा डब्बा पुन्हा घडवंचीवर ठेवत पुटपुटली, "एवढा मोठा सोहोळा झाला ,सगळी पोरं जमली पण नातवंडं काही भेटली नाहीत. "

प्रतिक्रिया द्या
4586 वाचन

💬 प्रतिसाद (17)
प
पैसा Tue, 02/27/2018 - 19:06 नवीन
ओल्ड fashioned आहे. श्रीखंड गोळ्या? Omg! गिव देम समथिंग सेक्सी यू नो! =))
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 02/28/2018 - 02:48 नवीन
यु सेड इट गं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पद्मावति Tue, 02/27/2018 - 19:14 नवीन
:) मस्तच
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 02/28/2018 - 02:48 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 02/27/2018 - 19:30 नवीन
एका दृष्टीकोनातून मनोगत आवडलं ! पण मराठी काही एवढी वृद्ध झाली नाही... ती बदलत्या कालाबरोबर अधिकाधि तरूण... चिरतरूण... होत राहणार आहे. तिचे बाह्यरूप बदलेल. तिचे कपडे, दागिने, अविर्भाव बदलत्या काळाप्रमाणे बदलत राहतील, इतकेच... तसे बदलणे हाच तर जीवनाचा मूलधर्म आणि जिवंतपणाचे लक्षण असते, नाही का ? सद्या मी मॉलमध्ये, एखाद्या हायफाय ऑफिसमध्ये किंवा इतर चकचकीत ठिकाणी जातो तेव्हा तेथे आलेल्या आणि काम करणार्‍या तरुणाईच्या तोंडात चालणारा मराठीचा सहजपणे चाललेला वापर ऐकतो. असेल तो जरासा इंग्राजळलेला किंवा हिंदाळलेला... पण हे सगळ्या भाषांमध्ये नेहमीच होते, होईल आणि दर पिढीगणिक वाढत राहील (शेपन्नास वर्षांपूर्वीची मराठी वाचताना आपली फेफे उडतेच, नाही का?). केसांमध्ये चांदी डोकावू लागलेल्या पुरुषांनी धोतर सोडून केवळ पँटच नाही तर काहीजणांनी जीनसुद्धा केव्हा स्विकारली आणि त्याच वयाच्या स्त्रियांनीही नऊवारी साडी --> पाचवारी साडी --> पंजाबी ड्रेस असा प्रवास करत काहींनी अगदी जीनसुद्धा केव्हा स्विकारली हे, तसा मुद्दाम विचार केल्याशिवाय आपल्या लक्षातही येत नाही ! अजून दहा वर्षांनी, "माय मराठी जीन आणि टॉप पेहरून, नातवंडांना केक-पास्ता-चॉकलेट्सच्या बरोबरच बेसनाच्या लाडवांचा व उकडीच्या मोदकांचा डेसर्ट स्प्रेड असलेल्या बुफेवर तुटून पडताना कौतूकाने पहात आहे", असे कोणी मिपावर लिहिले तर आश्चर्य वाटणार नाही ! :)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 02/28/2018 - 07:09 नवीन
सहमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्राची अश्विनी Wed, 02/28/2018 - 02:45 नवीन
खरंय.मराठी नेहमीच चीर तरुण राहील. आणि तुम्ही सांगितलेलं चित्र आशादायी आहेच. पण पण पण.. मी मराठी म्हातारी झाली असं नाहीच म्हटलंय.;) जसं प्रत्येक स्त्री आधी मुलगी आई आणि आजी या तीन पिढ्यांतून जाते तशीच माय मराठी पण रूपं बदलत असते. पण आजची आजी आणि आजची नातवंड यांच्यातला सुसंवाद अखंड ठेवायला आपली मधली पिढी कुठेतरी कमी पडतेय असं वाटतं. ं
  • Log in or register to post comments
प
पलाश Wed, 02/28/2018 - 06:02 नवीन
+१.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
भ
भीडस्त गुरुवार, 03/01/2018 - 06:23 नवीन
घरात आजी आणि नातीचा संवाद ऐकत असताना शेवटल्या वाक्याचा प्रत्यय घरात पदोपदी घेतो आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
प
पलाश Wed, 02/28/2018 - 06:01 नवीन
वा!! मस्त लिहिलंय हे.
  • Log in or register to post comments
ह
हरवलेला Wed, 02/28/2018 - 06:46 नवीन
मार्मिक
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 02/28/2018 - 09:17 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरवलेला
प
प्राची अश्विनी Wed, 02/28/2018 - 15:03 नवीन
डॉ म्हात्रे, स्नेहांकिता, पलाश, हरवलेला, एसभाऊ, मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मारवा Wed, 02/28/2018 - 15:17 नवीन
माय गे माय... दारात उभा गे साजण ची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 03/01/2018 - 05:45 नवीन
कविता आवडली अमृतातेही पैजा जिंकणारी माझी माय मराठी आता साता समुद्रापार पोचली आहे. नातवंडे आपल्याकडे येतील अशी वाट न पहाता नातवंडांच्या भाषेतच त्यांच्याशी संवाद साधायला लागली आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 03/01/2018 - 06:03 नवीन
फॉर्वर्ड आलेय, नाव आणि लिंक काढून. त्या मंडळीना मिपाची लिंक पाठवून योग्य रीतीने फॉर्वर्डा म्हणून सांगितले.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 03/02/2018 - 05:18 नवीन
पैजारबुवा, भीडस्त, मारवा, पैताई धन्यवाद! पैताई, तुला स्पेशल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा