Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझ्या आठवणी

प — प्रणया, Tue, 02/27/2018 - 16:12
मिटलेल्या नयनांची ओलावते पापणी आसवांनी सांगितले न दिसे तू मज या क्षणी मग आठवणींचा पाऊस पडू लागला मनी अन् अधरांवर हास्याची अलगद सुरु झाली पेरणी चालले होते चार पाऊले, पावलांवर तुझ्या ठेऊनी न उरले तुझे असे काही, मज तुझ्यात सामावुनी मग वाटले, तुझ्या निश्चयी पाऊलखुणांना साथ देत होती माझ्या पैंजणांची गाणी न पाहता मज चालताना, काय पाहिले मागे वळूनी न बोलताच तेव्हा, शब्दांचे काम केले भावनांनी काय उमगले बोलणे तुझे, ना जानो मज त्यावेळी पण वाटले हाती न घेता हात, जोडले भाग्यरेखांनी पाहता हे सारे, पारव्याची कुजबुज वाऱ्याच्या कानी कोणते नाते यांचे, विणले जात आहे रेशीमधाग्यांनी समजावे सारे मज, एवढ्यात नाहीसे झाले असणे तुझे गोडवा नकळत मग सोबतीचा साठविला त्या क्षणांनी - प्रणया

प्रतिक्रिया द्या
1656 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
प्रचेतस Tue, 02/27/2018 - 16:30 नवीन
छान, मला तुमचं सदस्यनामही फार आवडलं.
  • Log in or register to post comments
प
प्रणया Tue, 02/27/2018 - 16:53 नवीन
धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
श
शार्दुल_हातोळकर Tue, 02/27/2018 - 16:57 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments
प
प्रणया Tue, 02/27/2018 - 17:07 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर
प
प्रणया Tue, 02/27/2018 - 17:07 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर
प
प्राची अश्विनी Wed, 02/28/2018 - 02:52 नवीन
कविता आवडली .
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा