Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रेमळ दूध

ख — खिलजि, Wed, 02/28/2018 - 12:32
त्यांचं प्रेम दुधासारखे सफेद होते मस्त पैकी उतू जात होते आनंदाची साय जाऊन जाऊन भांडण एवढे वाढते कि त्याचे घट्ट दही होते विचारांची पकड सैल होतं जाते रंगवलेलं काय वेगळंच पण घडत मात्र दुसरंच असते आता प्रेम, प्रेम नसते , तर त्याच ताक झालेलं असते हेवेदावे मांडले जातात , वादावर वाद घातले जातात भावना घुसळून घुसळून वर येतात " शिल्लक राहिलेल्या आठवणी " प्रेम आता प्रेम नसतं, तर बनतं त्याचं लोणी असंच काही काळ साठवलं जातं "मी कशाला जाऊ ? ती येईल हवंतर " असं काहीसं लिहून पाठवलं जातं वाट बघून बघून हळूहळू लोणीपण चामट होत जातं इतकं कि नंतर त्याचं मेण बनत जातं आजकालच प्रेम हे असं पहिलं दुधावानी असतं नंतर नंतर त्याचं शेण बनत जातं सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
2081 वाचन

💬 प्रतिसाद (7)
अ
अभ्या.. Wed, 02/28/2018 - 13:32 नवीन
एकच लंबर. मस्त रंगलीय प्रेमाची डेअरी.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 03/01/2018 - 08:55 नवीन
डेअरीत शेण आणि मेण पण मिळतं का अभ्याभौ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. गुरुवार, 03/01/2018 - 10:35 नवीन
ते उपपदार्थ आहेत. सब्सिडेअरी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह गुरुवार, 03/01/2018 - 10:50 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ख
खिलजि गुरुवार, 03/01/2018 - 15:35 नवीन
खरंय , उपपदार्थ तेही प्रेमातल्या डेअरीतले :D सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
प
पैसा Wed, 02/28/2018 - 13:57 नवीन
लीलाधराची साय ही अजरामर कविता आठवली.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 03/01/2018 - 08:43 नवीन
अभ्या शेट आणि पैसा ताई .. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा