Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झेब्र्याचा जन्म

ख — खिलजि, गुरुवार, 03/01/2018 - 09:57
एकदा वाघ शिकारीस निघाला शोधत शोधत शिकार तो कुराणाशी गेला डौलदार अजस्त्र तो, डोळे शिकारीकडे गाढवांचा कळप तेथे चरण्यासी आला हेरली एक बाकदार, सुंदर, नाजूक गाढवीण त्याने असेल फर्लागभर अंतरावर घेऊन पावित्रा मारणार उडी इतक्यात नजरभेट झाली त्या सुंदर गाढविणीच्या नजरेने केली, शिकाऱ्यावरच कडी अन शिकारी खुद्द शिकार झाला तारीख ठरवली गेली लग्नसोहळ्याची घेतल्या आणाभाका शिकार न करण्याच्या यथेच्छ जोड्याने चरण्याच्या मंगला समयी लग्न लागले सोहळ्यास सारे जंगल लोटले सर्व सुखांत ते तृणभक्षक आता भय नसे कुणाचे वाघच आपला रक्षक मंगलाष्टक म्हंटली गेली कालांतराने गाढवीण व्यायली दिलं नवीन रुपडं जंगलाला अय्या, नवलच झालं बछडं आलं कि गधडं आलं ? कि अजून काय भलतंच आलं ओ जन्माला ? गाढविणीची कांती आणि वाघाचे पट्टे उड्या मारुनी घोड्यावानी खिंकाळते गधडं गुरकावुनि खिंकाळी फोडी गवत खाउनी लाथा झाडी गधडं कि बछडं , पण एक नवीनच रुपडं अहो , गाढवच ते फक्त वाघांचं कातडं बघता बघता झाला जंगलभर बभ्रा घटस्फोट घेऊनि नाव ठेवलं " झेब्रा " सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
941 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा