Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लग्नानंतरची गुरुकिल्ली

ख — खिलजि, Mon, 03/05/2018 - 09:23
पाऊल टाकता घरात , उघडावे ते कपाट , बदलावे सारे कपडे , राहुनी गप मुकाट चहा झाला तरीही , प्यावासा वाटला तरीही कप गुमान धुवून घ्यावा , देईल तेव्हढाच प्यावा इथे तिथे बघावे नंतर , ठेवुनी एक माफक अंतर हळूच जेवणाबद्दल पुसावे येता आवाज तो करडा , होईल तेव्हाच खावे चालेल थोडे कमी असले मीठ , चालेल थोडा असला कमी मसाला आवाज ना करता गप्प उठावे , हलकेच टाकावे बेसिनला काडीची चव नसली , तरीही गोडवे खुशाल गावे हलकेच आठवूनी जेवण ऑफिसातले , दात कोरत बसावे येता भांड्याचा आवाज फार , हळूच बंद करावे दार , बेडरूमचे मुलांना जवळ घ्यावे , आणि त्यांच्या अभ्यासात रममाण व्हावे थोडे दटावावे अभ्यासावरूनी , आवाज कमी होईस्तोवर आवाज संपला एकदाचा , ओढोनि चादर झोपून जावे , सूर्य उजाडेस्तोवर लग्न लागता धोपाटण्याशी, करावे मनापासून नाटक संसाराचे दाखवावे तिलाही मजनू बनुनी , गोड मानुनी खावे तिच्याच हाताचे दुसऱ्या जेवणाची उडवावी खिल्ली , हीच आहे लेका , लग्नानंतरची गुरुकिल्ली सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
1300 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा