कल्लोळती रंगरेषा
गूढ जांभळ्या कोन्यात
क्लांत आदिम श्वापद
माझ्या मातीच्या पायांची
लाल, रांगडीशी याद
कधी शुभ्र झळाळतो
एक कोना आरस्पानी
अद्भुताची निळी हाक
मग गुंजतसे कानी
कुतूहलास पारव्या
केशरीशी ज्ञानफळे
हिर्वळीस सर्जनाच्या
किल्मिषांचे खत काळे
कल्लोळती रंगरेषा
अशा रात्रंदिन मनी
इंद्रधनूची कमान
शोधू कशाला गगनी
💬 प्रतिसाद
(11)
प
पद्मावति
Wed, 03/07/2018 - 13:54
नवीन
केवळ क्लास्स!!
कल्लोळती रंगरेषा हा शब्दही खुप आवडला.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 03/08/2018 - 03:53
नवीन
+१
- Log in or register to post comments
स
सत्यजित...
Wed, 03/07/2018 - 22:00
नवीन
ही रंगपंचमी-विशेष आवडली!
>>>इंद्रधनूची कमान
शोधू कशाला गगनी>>>आपण चितारलेल्या अक्षरचित्रांतील गूढ रंगसंगती कितीतरी मोहक आहे!
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 03/08/2018 - 04:48
नवीन
सुरेखच
फार म्हणजे फारच आवडली
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
गुरुवार, 03/08/2018 - 16:32
नवीन
मनःपूर्वक धन्यवाद.
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Sat, 03/10/2018 - 03:59
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Sat, 03/10/2018 - 14:51
नवीन
धन्यवाद.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 03/10/2018 - 15:12
नवीन
मस्त कविता!
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Sun, 03/11/2018 - 07:19
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments
ख
खिलजि
Mon, 03/12/2018 - 14:51
नवीन
अनंत यात्रींसाहेब ,, आपल्या बऱ्याच कविता खरंच खूप सुंदर असतात .. मी आज कविता वाचली आणि परत या सांजवेळी धुळवड अनुभवली .. तीही निसर्गाची ... छान अप्रतिम कल्पना ...
सिद्धेश्वर
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Tue, 03/13/2018 - 09:50
नवीन
धन्यवाद.
- Log in or register to post comments