प्रेम रंग
प्रेम रंग ही कविता प्रेमाच्या विविध रंगांवर केली आहे . तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू शकता.
प्रेम रंग
रंगते मी नेहमीच
तुझ्या रंगांमध्ये
हसते मी नेहमीच
तुझ्या हसण्यामध्ये
खरंच खूप सोपी नसत
दुसऱ्यान मध्ये रंगण
तुझ्या साठी केलंय मी
माझं सोपी जगणं
तुझ्या माझ्यातले रंग
अशेच नेहमी उमलु दे
तुझ माझ प्रेम
कायमच मनी बहरूदे
रंगताना मला तुझी
साथ असुदे
चुकली जरी वाट माझी
तरी हाथी हाथ असुदे....
तुमी माझा ब्लॉग वर पण खूप मराठी कविता वाचू शकता आणि फ्रेंड्स ला सेंड करू शकता.
तृप्ती समीर टिल्लू
Prem Rang
💬 प्रतिसाद
(16)
ए
एस
Sun, 03/11/2018 - 22:10
नवीन
प्रेमाचं वंगण चांगलंय.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 03/12/2018 - 04:26
नवीन
अरे व्वा..!
सहजसुंदर कविता.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 03/13/2018 - 10:59
नवीन
+१ .
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 03/13/2018 - 10:59
नवीन
+१ .
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Mon, 03/12/2018 - 04:37
नवीन
बऱ्याच शब्दांमध्ये तुम्ही अनूला अक्षरावर स्वार होऊ दिले नाही त्यामुळे वाचताना मनातल्या मनात भावनांचे घर्षण झाले.
- Log in or register to post comments
र
राजाबाबु
Mon, 03/12/2018 - 08:47
नवीन
खुप मस्त......
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Mon, 03/12/2018 - 09:14
नवीन
मला माझ्या फ्रेंड्सला ही कविता सेण्ड करायची आहे पण नाही जमत. काशी कराची हे कुणि सांगू शकेल का?
- Log in or register to post comments
त
तृप्ति २३
Mon, 03/12/2018 - 19:29
नवीन
तुमी माझ्या ब्लॉग http://www.truptiskavita.com उघडा आणि कोणतीपण कविता उघडा मग तुमाला Whatsapp चा सिम्बॉल दिसेल क्लिक करा आणि share करा कोणालापण.
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
Tue, 03/13/2018 - 14:48
नवीन
"फ्रेंड्स ना सेंड " ?
" कविता उघडा" ?
"share करा कोणालापण." ?
हे कुठले मराठी आहे ?
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 03/13/2018 - 11:12
नवीन
मा. किसनचंद्ररावजी शिंदे साहेब,
आपणाला एकूण किती फ्रेंड्सआहेत ?
त्यापैकी gफ्रेंड्स किती आणि bफ्रेंड्स किती ?
आपण ही कविता gफ्रेंड्स ना सेंड करणार की bफ्रेंड्सना ?
एकाचवेळी अनेक फ्रेंड्सना सेंड केल्यावर ईतर फ्रेंड्स रागावणार नाहीत का ?
कृपया वरील प्रश्नांची सविस्तर उत्तरे देऊन त्यावर पुनर्विचार करावा, अन्यथा तगडे हाथ पड जायेंगे !!
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Tue, 03/13/2018 - 11:37
नवीन
काशी की कराची ?
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Tue, 03/13/2018 - 08:34
नवीन
हाथ?
असूदे! असूदे!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 03/13/2018 - 13:14
नवीन
त्रुप्तीजी, तुम्ही खोचक प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा, आणि नवनव्या कविता लिहा.
- Log in or register to post comments
ए
एस
Tue, 03/13/2018 - 13:22
नवीन
त्रुप्तीजी, प्रचेतसजींनी फक्त नवनव्या कविता लिहा असे सांगितले आहे, मिपावर प्रकाशित करा असे म्हटलेले नाही. बघा बुवा! :-D
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 03/13/2018 - 14:16
नवीन
बघा त्रुप्तीजी, आलाच पहा खोचक प्रतिसाद.
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Tue, 03/13/2018 - 14:33
नवीन
कविता वाचून जुने दिवस आठवले (११ वी, १२ वीचे)
सगळी पोरं फुल टू एकतर्फी प्रेमात. मुला मुलींनी एकमेकांशी बोलणं दूर, एकमेकाकडे बघायचं पण नाही असलं वातावरण. मग असल्या कविता लिहून काॅलेजच्या वार्षिकात छापून आणायच्या. 'ती' वाचेल आणि काहीतरी होऊन प्रेमाचं गाडं पुढं सरकेल ह्या आशेत जगायचं.
गेले ते दिवस.
- Log in or register to post comments