Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कशी वाटली आमची दहा बाय दहा ?

ख — खिलजि, Mon, 03/12/2018 - 14:42
कशी वाटली आमची दहा बाय दहा आनंद ओसंडून चाललाय पहा शेजारी शेजारी मांडलीय चूल छोटी सासू लाटतेय चपाती भाजतेय सून मोठी धाकटीने घातलाय कपड्याना पीळ मधली करतेय पोरांचा सांभाळ छोटंसं घर त्याचं इनमीन चार वासं इवल्याश्या घरात राहतात बाराजण कसं ? महालाला लाजवेल अशी घराची शोभा महादेव प्रसन्न हस्ते जागोजागी उभा घराला घरपण माणसांनीच येते भुई चालेल कमी पण लागते घट्ट नाते सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
2549 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ख
खिलजि Mon, 03/12/2018 - 14:58 नवीन
इथे कवितेत चुकून " बारका " टंकल गेलंय. ते " बाराजण" असं पाहिजे होत . एक नम्र विनंती सा सं ना .. चूक दुरुस्त होईल का ?
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 03/13/2018 - 07:29 नवीन
ही कविता कुठल्या छंदात लिहिली आहे?
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Tue, 03/13/2018 - 07:39 नवीन
कविता पटली नाही.
शेजारी शेजारी मांडलीय चूल छोटी
एकापेक्षा जास्त चुली आहेत घरात म्हणजे. मग नाते घट्ट आहे असे कसे म्हणता येईल?
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 03/13/2018 - 08:30 नवीन
नाही हो, चूल एकच आहे. तुम्ही "ऑंखों में. ऑंखों में तेरा ही चेहरा .. "हे गाणं ऐकलंय का? त्यात कसं ऑंखों में दोन वेळा म्हटलंय? तसंच इथे आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
M
manguu@mail.com Tue, 03/13/2018 - 08:48 नवीन
एकाच चुलीवर सगळे कसे होईल ? शेजारी शेजारी २-३ चुली असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
M
manguu@mail.com Tue, 03/13/2018 - 08:48 नवीन
एकाच चुलीवर सगळे कसे होईल ? शेजारी शेजारी २-३ चुली असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
ज
जेम्स वांड Tue, 03/13/2018 - 09:32 नवीन

महारावळ रतनसिंह होऊन तुटून पडलेले दिसतात

  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 03/13/2018 - 09:33 नवीन
अगदी प्रांजळपणे सांगायचे झालं तर मला कवितेतलं काहीही माहित नाही ... मी जे दिसतं ते मांडायचा प्रयत्न करतो ...बहुधा पद्यामध्ये असल्याने त्या तुम्हाला आवडत नसतील ... हि कविता म्हणजे माझं बालपण आहे असं समजा हवंतर ... आम्ही लहान असताना , माझे आई बाबा आणि तीन काका आणि त्यांची कुटुंबं , आजी आजोबा असे सारे मिळून जवळजवळ पंधराजण अक्षरशः दहा बाय दहा मध्ये राहिलो होतो जवळजवळ आठ एक वर्ष ... काळ बदलला आणि त्याबरोबर सर्व काही .. आता प्रत्येकाचा वरळीमध्ये आलिशान फ्लॅट आहे पण ती मजा नाही जी पूर्वी होती ... पूर्वी काका दुकानातून जेवायला घरी येताना काही फळ आणायचा ,, बच्चेकंपनी त्या फळांसाठी लाईन लावायची .. प्रत्येकाच्या वाट्याला फक्त एकेक फोड यायची आणि चिक्कार मजाही ... ते दिवसही गेले आणि ती मजाही ... आता घरी फळांचा ढीग पडलेला असतो पण माझी मुलं त्याकडे चुकूनही बघत नाहीत .. त्यामुळे खरंच हळहळ वाटते ... सिद्धेश्वर
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 03/13/2018 - 11:13 नवीन
"ख" लावून ऊ , "श" ला लावला आ " ल " ला ठेवलं असंच खुशाल झाला पहा " च " ला लावला ए, टिम्ब टाकलं एक " ड " लावला परत ऊ , चेंडू झाला मऊ
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा