Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

करणी, काळीजादु , जादुटोणा , भानामती कसे शिकावे ?

प
प्रसाद गोडबोले
Fri, 03/16/2018 - 05:22
🗣 58 प्रतिसाद
नुकतेच मराठी व्रुत्तपत्रात जादुटोणा भुताटकी विषयक बातम्या वाचनात आल्या. अत्रे रंगमंदिरात भुताची अफवा धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटमध्ये जादूटोणा ह्या बातम्या वाचल्यापासुन आश्चर्याचा धक्कच बसला ! मुंबईत ते लोकल मध्ये जाहिरात करणार्‍या गोल्ड मेडालिस्ट बाबा #वशीकरणस्पेशालिश्ट "मेरे किये काम को काटने वाले को नगद ईनाम" फेम साईबाबांनाचा ट्रेडमार्क पैसे न देता वापरणार्‍या बाबांचे लोण प्रत्यक्ष पाहिले होते पण ही लाट आमच्या पुण्या पर्यंत पोहचली असेल असे वाटले नव्हते ! बाकी रंगीबेरेंगी जादु चे आम्ही आधीपासुनच फॅन आहोत ! मिपावर आल्यापासुन आम्ही लाल जादु नक्की शिकलो , मित्रांच्या कट्ट्यांमध्ये चीअर्स म्हण्त सोनेरी रंगाची जादु शिकलो , पण महत्वाचा शौक म्हणुन आम्ही आमची गणिताची नीरस जादुच शिकत राहिलो. त्यानिमित्ताने हिरव्या रंगाची जादु अशी जमली की बास , मजा आगया ! गुलाबीरंगाची जादुही अगदीच एक्स्पर्ट नाही पण, सांगता येईल इतक्या बर्‍यापैकी जमुन गेली ! पण ह्या सार्‍या नादात काळ्याजादुचा अभ्यासच करायचा राहुन गेला ! ते असो ! नुकतेच मराठी वृत्तपत्रात ह्या बातम्या वाचल्या पासुन काळ्याजादुचे मार्केट वर आल्याचे जाणवते, तसेहि इकडे हिरव्या जादुचे गारुड आमच्या मनावरुन उतरायला लागले असल्याने आम्ही काळी जादु शिकायचे मनावर घेतले आहे . मिपावर सर्व विशयांचे जाणकार आहेतच ! सवज्ञही होते पण त्यांच्यावर परत एकदा भानामती झाल्याचे ऐकीवात आले आहे ! म्हणुन गुगल करण्या आधीच इथे विचारावे म्हणले ! क्रुप्या सर्वांनी गांभीर्याने मदत करावी . काळीजादु कशी करावी, संदर्भग्रंथांची नावे लिन्का सुचवाव्यात . प्रयोग सुचवावेत . भानामतीची पाककृती द्याव्यात . अगदीच काहीच खात्रीलायक माहीती नसल्यास जानापावट्यास्टाईल अर्धवट माहीतीवरुन दिलेले अर्धवट लेखन प्रतिसादही चालतील , बाकीचे आम्ही शोधु. आता काळी जादु शिकायची मनावरच घेतले आहे तर प्रयत्न तर केचे पाहिजेत ना ! अभ्यासपुर्ण प्रतिसादांच्या प्रतिक्शेत ... #हस्ताक्षरास_हस_नये
वर्गीकरण
जानापावट्या
अध्यात्म
मोदी
फडणवीस
वगैरे वगैरे

प्रतिक्रिया द्या
40568 वाचन

💬 प्रतिसाद (58)
ग
गवि Sat, 03/17/2018 - 18:18 नवीन
आम्हालाही बोलवा. आठवण ठेवा. नच जमल्यास उत्तरेकडे दोन थेंब उडवूनच सुरुवात करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ग
गवि Sat, 03/17/2018 - 18:34 नवीन
वाईज वाईज ओल्डमॉन्क घेईपर्यंत मस्त शिजेल
. ओल्ड माँकसाठी खालील फॉर्म्युलाच हवा राव. कोंबडी नव्हे, बकरा. मटण रटारटा चुलीवर रश्शासहित शिजत पडलेलं असताना जवळच आगीच्या उबेला जंगलातल्या बंगल्यावर / गेस्ट हाऊसवर / फार्म रिसॉर्टवर / शेतावर पैकी एका जागी बैठक असावी. रीजन प. महाराष्ट्र. मदतीला भडंग, कोल्हापुरी चिवडा वगैरे प्राथमिक (प्रथम पेगास फक्त) चखणा असावा. म्हातारा साधू उघडलेला असावा. बैठकीतल्या ज्युनियर मेंबरला उठवून उकळत्या पातेल्यातून मटणाचे तुकडे सुक्के सुक्के उचलून ताटलीत भरून आणायला पाठवावे. ते सुकया मटणाचे तुकडे वृद्ध साधूसोबत खात खात शेवटी चुलीवर फक्त रस्सा (विना पीसेसवाला) शिल्लक उरावा आणि तो सर्वांनी शेवटी भातासोबत विनातक्रार ओरपावा. क्या बोलते सर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Sat, 03/17/2018 - 18:55 नवीन
खंप्लीट अणुमोदन ! पण मालक , बकरा कापायचा म्हणजे मोठ्ठे अनुष्ठान करणे आले , २-४ खंबे तरी आणावे लागतील , शिवाय कंपुही मोठ्ठा हवा किमान २० लोक तरी पाहिजेत ! मोठ्ठी तयारी लागेल ! गेस्ट हाऊस पेक्क्षा रानातच असले बेत उत्तम जमु शकतात ! फार पुर्वी सीनीयर दादा लोकांच्या गटा सोबत वासोट्याचा ट्रेक केलेला , तेव्हा कुसापुर गावात दोन कोंबड्यांचा बेत जमुन आलेला ते आठव्ले ! ( अर्थात तेव्हा मी लिंबुटिंबु होतो हि बात अलहिदा ) पण ह्या सार्‍या जमवा जमवीत मुळ मुद्दा काळी जादु शिकण्याचा तो मागेच पडतोय , त्याचे काय ... लोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/17/2018 - 19:06 नवीन
तुमी काळजी नगा करू. दोन दोन पेग पोटात गेल्यावर काळ्या जादूचे प्रकार, ते करण्याच्या पद्धती आणि त्यासंबंधीचे किस्से... सगळे कसे बैजवार घडाघड बाहेर येतील =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ग
गवि Sat, 03/17/2018 - 19:37 नवीन
२-४ खंबे तरी आणावे लागतील , शिवाय कंपुही मोठ्ठा हवा किमान २० लोक तरी पाहिजेत ! मोठ्ठी तयारी लागेल !
या सर्व गोष्टी मान्यच. रानांतच असले बेत जमून यावेत हेही योग्यच. प्रश्न फक्त तारखेचा आहे. म्हाताऱ्या साधूचे चार मोठे पेग आत गेल्यावर काळी जादु शिकण्याचा मुद्दाच काय पण सर्वच बारा गडगड्यांच्या विहीरीत जाईल अशी अपेक्षा...!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अभिजीत अवलिया Sun, 03/18/2018 - 15:04 नवीन
हे असले आयुष्यात दोनदा अनुभवले. कडाक्याची थंडी, घरून नेलेल्या भाकऱ्या, चंद्राच्या प्रकाशात शेतात शिजवलेले मटण आणि .... ह्याच्या नखाची पण सर हॉटेल/बार मधे बसण्यात येत नाही. कितीही हायफाय असो. आता सगळ्यांची लग्ने झाली. त्यामुळे हा आनंद पुढे कधी घेता येईल असे वाटत नाही. गेले ते दिवस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
व
विजुभाऊ Sun, 03/18/2018 - 01:32 नवीन
काळी जादू , पलंगावरुनच मिश्री ची पिंक बाथरुम मधे थेट टाकणार्‍या काळी मावशी आणि चोराला विचारा. ते सांगतील तुम्हाला....
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 03/21/2018 - 06:53 नवीन
आता हा एका दुसर्‍या डॉक्टरच्या अंधश्रद्धा निर्मुलन समिती समोरील भाषणाचा वृत्तातं (वृत्तांत जरा अपूर्ण वाटतो)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा