आहे हे असं आहे...
"वॉटसन, डॉक्टरला वॉकिंग स्टिक कोण देईल? अर्थात एखादं हॉस्पिटल, जिथे तो काम करत होता. मग 'सीसीएच' म्हणजे चेरिंग क्रॉस हॉस्पिटल असण्याची शक्यता जास्त आहे."
"बरं तर मग. चेरिंग क्रॉस हॉस्पिटल. आणखी कोणते निष्कर्ष काढता येतील?"
"तुला माझी पद्धत ठाऊक आहे, वॉटसन. वापर!"
"मला सुचणारा एकच निष्कर्ष म्हणजे या माणसाने खेड्यात आपली प्रॅक्टिस सुरू करण्याआधी लंडनमध्ये काही काळ काम केलं असावं."
"बरोबर आहे. आणखी थोडं पुढे जाऊन, हॉस्पिटलने ही काठी भेट देण्याचं कारण म्हणजे डॉक्टरसाहेब लंडनची नोकरी सोडताहेत हे असू शकेल. ही गोष्ट आपल्याला काय सांगते? हा गृहस्थ फार उच्चपदावर नसावा - कारण तो अशी मोठी नोकरी सोडून खेड्यात गेला नसता. म्हणजे नोकरी सोडतेवेळी हा नवशिका डॉक्टर होता - हाऊसमन. आता आपल्यासमोर उभा राहिलाय तिशीच्या आत-बाहेर असणारा एक डॉक्टर. बऱ्यापैकी मित्रमंडळी असलेला, फारशी महत्त्वाकांक्षा नसणारा, थोडा वेंधळा. त्याच्याबरोबर त्याचा लाडका कुत्रा असतो - टेरियरपेक्षा मोठा, पण मास्टिफपेक्षा लहान."
- दि हाऊंड ऑफ बॅस्करव्हिल्स, लेखक: आर्थर कॉनन डॉईल
माणूस सामाजिक प्राणी आहे. त्याला इतर माणसांबरोबर राहायला, वावरायला आवडतं. एकलकोंडेपणा हा स्वभावातला दोष मानला जातो, आणि एकटेपणा ही अप्रिय स्थिती. माणसाच्या समाजातल्या वावरावर समाजातल्या इतरांचे डोळे रोखलेले असतात. एखाद्याच्या वावराचा उपयोग समाजातल्या इतरांनी आपली उद्दिष्टं साध्य करण्यासाठी करून घेतला तर ते गैर समजलं जात नाही, किंबहुना अशा वर्तनाला प्रोत्साहनच दिलं जातं. त्यानेच एकमेकांत देवाणघेवाण असणारा एकसंध समाज तयार होणार असतो. त्यातच सर्वांचं हित असतं.
वर दिलेल्या उताऱ्यात एका विसरून राहिलेल्या वॉकिंग स्टिकवरून शेरलॉक होम्स त्या स्टिकच्या मालकाबद्दल निष्कर्ष काढताना दिसतो. वावरावरून, हावभावावरून मनाच्या पार खोल तळातलं ओळखण्याची उदाहरणं होम्स कॅननमध्ये अन्यही आहेत. (चट्कन आठवलेलं म्हणजे 'दि रेसिडंट पेशंट' या कथेमध्ये वॉटसनच्या डोक्यातले युद्धविषयक विचार होम्स क्षणार्धात सांगतो.)
तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर समाजातला वावर प्रत्यक्ष वावरापुरता मर्यादित न राहता आभासी (virtual) ही झाला. मग मोबाईल तंत्रज्ञानातली क्रांती आणि स्वस्त इंटरनेटमुळे प्रत्यक्ष आणि आभासी वावरातल्या सीमारेषा पुसट होत आहेत. एक साधा प्रयोग करून बघा. गूगलकडे असलेल्या तुमच्या विद्याची प्रत https://takeout.google.com/ येथे मिळेल. त्यातली लोकेशन हिस्ट्रीची जेसन फाईल आणि ही साईट वापरून तुम्ही कुठेकुठे गेला होतात याचा साद्यंत इतिहास अगदी नीटस नकाशावर बघायला मिळेल!
थोडक्यात काय, तर ते बघतायत. बिग ब्रदर इज वॉचिंग यू.
बर्मंग वॉचायचं तर बसा वॉचत. आपण कोणाला घाबरत नाय. कर नाही त्याला डर कशाला, वगैरे.
कर नसला तरी डर असू शकतो हे नुकतंच केंब्रिज ॲनालिटिका आणि फेसबुकच्या कृपेने पहायला मिळालं. हा विषय इतका चावला जातो/गेला आहे, की त्याचे आणखी तपशील देण्यात हशील नाही.
आपल्याच वावराचे बारकावे वापरून आपल्या विचारांवर, आचारांवर प्रभाव टाकला जातोय. हम सब इस रंगमंच की कठपुतलियाँ. किस की डोर कब खींच जाए कोई नहीं कह सकता. ती डोर खींचून कोणी साबण विकतंय, कोणी राजकीय विचार.
पण ... जेवायला बाहेर जायच्याआधी झोमॅटोवर रिव्ह्यू पाहायचे आहेत. ठोस पत्ता हाताशी असूनही मला गूगल मॅप्स वापरायचे आहेत. दाराशी उबर पाहिजे. रेस्टॉरंटात वेटिंग आहे - बसल्याबसल्या दोन पोस्टी लाईक आणि तीन शेअर करायच्यात. "फीलिंग हंग्री विथ अन्या, गन्या अँड थ्री अदर्स" अशी क्याप्शन मारून फोटो शेअर करायचे आहेत. पान खाताना मल्लूॲप्सवर 'मी द्वापारयुगात कोण होतो' ही मौल्यवान माहिती मिळवायचीय.
म्हणजे ... समाजातल्या माझ्या वावराचा विदा मीच गावभर हगून ठेवला आहे.
पण मी ही ॲप्स वापरताना गोपनीयतेच्या शपथेवर दिली होती. फेसबुकवाले आणि ते ॲपवाले म्हणाले की कोणाला विदा देणार नाही...
असं तुम्हाला वाटत असेल, तर आप xxx (भाबडे) है!
सगळी बोंबाबोंब थांबेल, तेव्हा उरेल ते इतकंच : एका कंपनीकडे एक बायप्रॉडक्ट होतं. ते त्यांनी विकलं आणि पैशे केले.
तुम्हाला फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, दगड आणि धोंडे वापरायचे आहेत ना? त्याचे फायदे पाहिजेत ना? मग हे असंच चालणार. आहे हे असं आहे. घ्यायचं तर घ्या. नाहीतर भो...
💬 प्रतिसाद
(78)
ज
जेम्स वांड
Mon, 03/26/2018 - 13:16
नवीन
गंमत म्हणजे इलियट ऍल्डरसन हे जे कोणी पात्र आहे ते सिक्युरिटी एक्स्पर्ट नसून एक अँड्रॉइड एप डेव्हलपर आहे , असे तो स्वतः सांगतो! दोहोंत जमीन असमानांचे अंतर आहे.
आता
ऍल्डरसन जे काही करतोय ते नमो एप ते काँग्रेस एप व्हाया आधार एप, अशी ही सगळी एप ऍनलाईज करत सुटलाय, कुठलं एप किती परमिशन घेते काय काय डेटा ऍक्सेस करते अन तो कुठे सेव करते हे तो बरोबर सांगतोय पण
आधारचे एप काढले म्हणजे त्या एप मार्फत सगळाच डेटा बाहेर गेला असे नाही. अन बायोमॅट्रिक डेटाची तर चिंताच नको
एक काल्पनिक सिनेरीयो घ्या, तुम्ही आधार एप डाउनलोड केलेत, केल्यावर तुम्ही त्यावर गरजेच्या परमिशन दिल्या अन तुमचा फोनचा डेटा आपण आजकाल जे युनिकॉर्न सारखे मिथकीय जीव समजतो अश्या एखाद्या हॅकरच्या हाती पडला तर तो काय करू शकेल?
परत लक्षात घ्या, त्याला फोन डेटाला ऍक्सेस मिळालाय, म्हणजे काय तर तो तुमच्या नंबरवर एखादा एसएमएस मिळवून तुमचा आधार डेटा ओटीपीच्या सहाय्याने अनलॉक/लॉक करू शकेल, वाईटात वाईट म्हणजे काय तर तो ओटीपी वापरून तुमच्या आधारवरचे डेमोग्राफीक डिटेल्स बदलू शकेल, ठीक, हे झालं वाईट वाईट दुस्वप्न वाईट, आता हॅकर ने पिलीयन रायडर, रहिवासी कोथरूड, पुणे हे बदलून समजा लेडी रायडर, राहणार हडपसर पुणे, असे बदलले, तर? तर काहीच नाही, पिलीयन रायडर ह्यांचा आधार 'फोर्ज' घेऊन त्या दुसऱ्या लेडी समजा सिमकार्ड घ्यायला गेल्या तर तिथे अंगठा लावावा लागणार, तो कुठून डुप्लिकेट करणार? अजूनतरी मानवी तंत्रज्ञानात सिनेमे सोडून फिंगर प्रिंट डुप्लिकेट करणे साधले नाहीय! म्हणजे इतकी मेहनत करून शेवटी मिळालं काय? तंबोरा, बरं इतकं व्हायच्या आधी, तुमच्या आधारावर नकली ऍड्रेस चढवायला सुद्धा त्यांना लोकल आधार तेव्हा केंद्रात जावेच लागेल. झालेले बदल त्या 'हॅकर' ला तुमच्यापासून लपवायचे असतील तर मोबाईल नंबर बदलायला लागेल, तो बदलायचा म्हणजे एक लास्ट ओटीपी तरी तुमच्या जुन्या नंबरवर यायलाच हवा! तो रिमोट ऍक्सेस ने त्याने पुसून टाकायचा म्हणलं तरी पहिले तो डिलिव्हर व्हायला हवा न तुमच्या मोबाईल मध्ये!. असे सगळे आहे.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Mon, 03/26/2018 - 13:26
नवीन
हे इतक गुंतागुंतीचे असल्याने सामान्य माणसाला कळणे अवघड वाटतेय. त्यामुळेच त्याच्या मनाचा गोंधळ उडवून देणे सोपे जातेय.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
Mon, 03/26/2018 - 13:39
नवीन
मी ही हौशी तंत्रज्ञान प्रेमी आहे व्यावसायिक नाही. नीट चवीचवीने वाचा भागवतजी, सोपेच आहे. मुख्य म्हणजे आधार काही मला महिने पैसे देत नाही पण यूएस सोशल सिक्युरिटी प्रोग्रॅम पेक्षा अंदाजे तिप्पट मोठा कार्यक्रम, एक नवं औद्योगिक देश राबवतो काय, १.१९ अब्ज लोकांना कार्ड्स देतो काय हे माझ्यासाठी महान आहे अन उत्तम आर्किटेक्चर असलेला हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोचवणे मला कर्तव्य वाटलं इतकंच.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Mon, 03/26/2018 - 15:32
नवीन
_/\_
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
Mon, 03/26/2018 - 14:46
नवीन
पण मी काय म्हणतो, आधार बनवतानाच आम्ही दिलेले अंगठे आणि डोळ्यांच्या बाहुल्या त्यांनी प्रतिनिर्मिती (क्लोन) केली नसेल कशावरून ?
बघा हं, मी आरोप करतोय की माहिती हॅक झालीय. आता ती झाली नाहीये ह्याचे पुरावे द्या. मी केलेल्या आरोपांसाठी पुरावे द्यायला मी बांधील नसतोच.
तसंपण इतके वर्ष CID बघितल्याने काहीही शक्य आहे असं वाटतं.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
Mon, 03/26/2018 - 15:15
नवीन
मानवी तंत्रज्ञानाला तरी अजून (सिनेमा सोडुन) फिंगर प्रिंट्स अन आयरीस कॉपी करायचं तंत्र अवगत नाहीये. ह्याउपर अधिक बोलणार तरी काय आम्ही? रच्याकने सीआयडी तर काही काही एपिसोड मध्ये अतींद्रिय शक्ती असलेले गुन्हेगार पण धरते, त्यांच्या धरण्याला काही धरबंधच नाही :)
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Mon, 03/26/2018 - 14:58
नवीन
थोडं लक्षात आलं, पण मला तरीही एक प्रश्न पडलाय.
आपण सिम घेताना अंगठा वगैरे कुठे देतो? फक्त आधार नंबर (किंवा कार्ड म्हणू) तेवढाच देतो ना. मग माझे आधार कार्ड असे वापरता येईलच ना? बऱ्याच ठिकाणी आपण कार्डच तर देतो.
कार्ड as डॉक्युमेंट म्हणून जिथे वापरले जात आहे, तिथे गैरवापर होऊ शकतो त्याचे काय?
बादवे, बायोमेट्रिक डेटा कधी लागतो आपल्याला व्हेरिफिकेशन साठी?
@ म्हात्रे काका, प्रतिसाद आवडला.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
Mon, 03/26/2018 - 15:44
नवीन
टाईप केलेलें प्रतिसाद गायब होतायत माझे, परत जमलं ते आत्ता लिहितो नाहीतर उद्या सावकाश कॉमेंट करतो
- Log in or register to post comments
स
सॅगी
Mon, 03/26/2018 - 15:48
नवीन
आता नवे सिम कार्ड घेण्यासाठी आधार क्रमांकाबरोबर अंगठा लावावाच लागतो की...
तुमचा अंगठा हाच तुमची सही म्हणुन ग्राह्य धरला जातो.
नुसतं आधार कार्ड काही कामाचे नाही सिम घेण्यासाठी तरी
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Mon, 03/26/2018 - 15:55
नवीन
हो का?? सॉरी, ही माहिती नव्हती मला. मग मोबाईल कंपनी कसं व्हेरिफाय करते? कारण डेटा तर सरकार कडे आहे ना.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 03/26/2018 - 16:05
नवीन
हो आणि ६० वर्ष्यापेक्षा मोठी लोकं, यांना तर फारच प्रॉब्लेम येतो, त्यांचे फिंगर प्रिंट्स तुलनेने गुळगुळीत झालेले असतात. ते व्यवस्थित सेन्स होत नाही सेन्सरवर ,
माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, एक सिनिअर सिटीझन त्यांना कोणीच नाही (मुलं दूर आहेत व त्यांना सांभाळत नाही) त्यांना सिम घेताना व्हेरिफिकेशन झालं नव्हतं ...
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 03/27/2018 - 15:44
नवीन
हा बहुतांशी सेन्सर चा दोष आहे. हाताच्या बोटांच्या टोकाला सूज आली जशी काही रोगात/ संधिवातात येते किंवा कर्करोगाची केमोथेरपी घेणाऱ्या रुग्णामध्ये येते तर ठसे अस्पष्ट होऊ शकतात. अत्यंत कष्टाचे काम करत असल्यास तात्पुरते ठसे सपाट होतात पण काही दिवसात ते परत
परंतु चांगल्या सेन्सर मध्ये हा ठसा पकडला (capture)/ नोंदला जाऊ शकतो.
आजमितीस बोटांचे ठसे हे एकमेवाद्वितीय अशी ओळख म्हणून वापरता येतात.
आपल्या माहितीसाठी खालील दुवा वाचून पाहावा.
https://www.scientificamerican.com/article/lose-your-fingerprints/
- Log in or register to post comments
स
सॅगी
Mon, 03/26/2018 - 16:12
नवीन
सिम कार्ड घेतानाच आधार क्रमांकाच्या आधारे आपला पत्ता, फोटो वगैरे माहिती आधार डेटाबेस कडुन घेतली जाते.
त्यानंतर तुमची सही म्हणुन तुमचा अंगठा (किंवा कोणत्याही बोटाचे) फिंगरप्रिंट घेतले जातात, जे आधार सर्वरवरील माहितीबरोबर पडताळले जातात.
फिंगरप्रिंट मॅच झाल्याशिवाय तुमच्या नावे सिम दिले जात नाही.
- Log in or register to post comments
स
सॅगी
Mon, 03/26/2018 - 16:21
नवीन
आणि हे व्हेरिफिकेशन काही सेकंदात पार पडते.
- Log in or register to post comments
M
mayu4u
Mon, 03/26/2018 - 16:55
नवीन
माझ्या जुन्या क्रमांकाला आधार जोडताना अंगठ्याचा ठसा बायोमेट्रिक (जैवमापन?) यंत्रावर घेतलेला. नवीन क्रमांक घेताना पण आधार क्रमांक देऊन त्या जोडीला अंगठ्याचा ठसा द्यावा लागला होता.
- Log in or register to post comments
स
सतिश म्हेत्रे
Tue, 03/27/2018 - 21:25
नवीन
सिम घेताना अंगठा द्यावा लागतो. मी दोन सिम अंगठा देवूनच खरेदी केली आहेत.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Mon, 03/26/2018 - 20:20
नवीन
आधारचे तीन मुख्य उपयोग केले जातातः
१. पत्रव्यवहारासाठी अधिकृत पत्ता देण्यासाठी :
हा बँक, वीज/गॅस कंपनी, इत्यादी मागतात आणि त्यासाठी तुमचे नाव जुळणारा पत्ता पुरेसा असतो. यासाठी आधार कार्डाची फोटोकॉपी पुरेशी असते. या संस्था, अधिक सुरक्षेसाठी मोबाईल क्रमांक ('आधार'चा अप्रत्यक्ष आधार !) आणि इमेल अॅड्रेस मागतात... मल्टीप्राँग्ड आयडेंटिफिकेशन.
२. अचूक व्यक्तीगत ओळख पटवण्यासाठी :
हे केवळ नावाच्या कागदी पुराव्याने पुरेसे अचूकपणे होत नाही. अचूकतेसाठी (उदा: सिम कार्ड देताना फोन कंपनी, इ) नावाबरोबर बायोमेट्रिक डेटा वापरतात. अचूकतेसाठी बायोमेट्रिक UIDAI डेटा मॅचिंग (UIDAI डेटा अॅक्सेस किंवा डेटा कॉपी नाही) कायद्याने जरूर असणार्या कंपन्याना; UIDAI कडे रजिस्ट्रेशन करून त्यांच्या बायोमेट्रिक डेटा मॅचिंग प्रणालीचा उपयोग करण्याची परवानगी काढावी लागते. कंपनीकडे असलेल्या प्रणालीवरून, कंपनीचा अधिकृत अधिकारी, UIDAI मध्ये लॉगइन करून, (अ) आधार क्रमांक आणि (आ) कंपनीच्या बायोमेट्रिक रीडरवर घेतलेले रिडिंग, UIDAI च्या डेटा मॅचिंग प्रणालीकडे पाठवतो. त्या प्रणालीकडून डेटा मॅचिंग झाल्याचा संदेश (डेटा नाही) मिळाल्यावर पुढची कारवाई होते. अर्थातच, अश्या कंपन्यानाही UIDAI मधिल बायोमेट्रिक डेटाला "डायरेक्ट अॅक्सेस" नसतो आणि अश्या कामाला आधार कार्डाची प्रत देण्याचीही गरज नसते (केवळ आधार क्रमांक पुरतो).
याशिवाय, अश्या दर वापराची देखरेख आणि नोंद करण्याची 'किंडरगार्टन स्तराची' व्यवस्था UIDAI ने केली नसेल असे म्हणणे म्हणजे... !
३. आस्तित्वात नसलेल्या माणसाचे व्यक्तिमत्व किंवा आस्तित्वात असलेल्या एका माणसाची एकापेक्षा जास्त व्यक्तिमत्वे (प्रोफाईल्स) तयार करून त्यांचा गैरवापर करू नये यासाठी:
महत्वाच्या व्यवहारांतले गैरव्यवहार टाळण्यासाठी ऑनलाईन बायोमेट्रिक डेटा हा अत्यंत अचूक आणि तातडीने पडताळणा करणे शक्य असलेला उपयोग आहे. भूतकालात गैरव्यवहार केलेल्यांची आणि/किंवा भविष्यात तसे करण्याची इच्छा असणार्यांची हीच नेमकी दुखती रग आहे. हे कारण समजल्यावर, "अमेरिकन किंवा शेंगेन (किंबहुना आजकाल बहुतेक सर्व महत्वाच्या देशांचे) व्हिसा काढताना अनेक तास रांगेत उभे राहून हसतमुखाने बायोमेट्रीक डेटा देवून, नंतर हसतमुखाने मुलाखतीसाठी दुसर्या रांगेत उभे राहणारे हे लोकच" आधारविरोधाच्या रांगेत हिरीरीने घोषणा देत उभे आहेत, याचे आश्चर्य वाटणार नाही ! :) ;)
"एक व्यक्ती एक कार्ड/डॉक्युमेंट/फायदा (उदा: पासपोर्ट/रेशनकार्ड/पॅनकार्ड/सरकारी मदत/सबसिडी/इ)" असा कायदा असणार्या व्यवहारांत, आधार लिंकिंगमुळे जुन्या "चुका (पक्षी: भ्रष्टाचार)" सुधारणे आणि/किंवा नवीन चुका टाळणे सुरु केले आहे. लाखोंच्या संखेने रेशनकार्ड/पॅनकार्ड रद्द झाल्याच्या आणि सरकारी मदत/सबसिडी.इ मध्यस्त/एजंट टाळून योग्य व्यक्तिंच्या बँक अकाऊंटमध्ये तडक जात असल्यामुळे गैरव्यवहार कमी झाल्याच्या बातम्या माध्यमात पाहिल्या असतीलच. यामुळे, अनेकांची पिढीजात भ्रष्ट दुकाने बंद होत आहेत/होत राहतील. सहाजिकच अश्या लोकांनी 'आधार'चा तीव्र द्वेष करणे आणि त्याची प्रतिमा मलिन करण्याचे उद्योग, जीवनमरणाच्या कराराने केले नसते तरच आश्चर्य !
वास्तवामधल्या जगात हे असे होणारच... हे दुर्दैवी आहे पण अपरिहार्य सत्य आहे. मात्र, सरकारने केवळ माध्यमातल्या विरोधाकडेच लक्ष देवून त्याचा उपाय करणे भागणार नाही. हताश झालेल्या विरोधकांकडून, आपले आरोप खरे ठरविण्यासाठी, आधार प्रणालीला धोका पोचविण्याचे व त्या बळावर जितं मया म्हणत 'आधार'ला कमकुवत/निरुपयोगी/धोकादायक ठरविण्याचे अनेक प्रकारचे प्रयत्न होणेही शक्य आहे आणि सरकारने त्यांच्या संबधातही प्रतिबंधात्मक उपाय करणे जरूर आहे... तसे आधीच केले नसल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 03/27/2018 - 15:46
नवीन
+१००
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Fri, 04/06/2018 - 06:55
नवीन
.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Mon, 04/02/2018 - 13:08
नवीन
आज माझ्या एक चेपु मित्राने एक किस्सा टाकला आहे. एका पन्नाशी उलटून गेलेले जोडप्याच्या घरी प्रेग्नन्सी सम्बन्धात काही वस्तू विकणारे एक लिफलेट आले. यांचा संताप झाला . कारण आत्ता ऑपारेशन झाले होते .घरात१६ वर्षाची मुलगी होती. यांनी आमच्या कडे हे का पाठवले अशी पाठवणार्या एजन्सी कडे विचारणा केली . त्य्यानी सांगितले तुमची मुलगी गरोदर आहे. आम्ही शोधून काढलेय. कसे तर ती ज्यावेळी मोठ्या मोल मध्ये जाते त्यावेळी ती काय वस्तू पुन्हा पुन्हा हातात घेऊन पहाते यावर चे चित्रण आम्हाला मिळते आम्ही तिच्या चेहऱ्यावरून नाव पत्ता शोधला व आम्हाला वाटले ती गरोदर असावी कारण ती त्या संबंधित वस्तू सारखी हातात घेऊन पहात होती . सदर पिता डॉकटर होता . त्याला ही पत्ता नव्हता पोरीने काय केले पण एजन्सीला माहीत होते . आता बोला कुठे राहिली प्रायव्हसी ?
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Tue, 04/03/2018 - 12:43
नवीन
हाच का तो किस्सा ?
http://www.aisiakshare.com/node/6570
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Tue, 04/03/2018 - 15:06
नवीन
होय पण मी मुळात तो संपादित स्वरूपात वाचला व आठवल तसा लिहिला .
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Tue, 04/03/2018 - 02:28
नवीन
@चौरा: किस्सा मजेदार आणि सावध करणारा आहे.... "आत्ता ऑपारेशन झाले होते" ते कुणाचे हे कळले नाही.
मी माझ्या लॅपटॉप आणि टॅबचा आपल्याकडे सदोदित रोखलेला कॅमेरा जाड्या कागदाचा तुकडा सेलोटेपने लावून बंद करून ठेवलेला आहे. फालतू जाहिराती कमी येतात असा अनुभव आहे, कोण कोण आपल्यावर नजर ठेऊन असते कुणास ठाउक.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Tue, 04/03/2018 - 11:19
नवीन
आई किवा बाबा यातील. प्लानिन्ग चे.
- Log in or register to post comments
ल
लई भारी
Sat, 04/07/2018 - 08:31
नवीन
आधार वर चर्चा चालू आहे म्हणून त्या अनुषंगाने ही लिंक देतोय. नेमकी कालच वाचनात आली.
https://www.quora.com/Why-do-people-in-India-hate-the-Aadhaar-card/answer/RaghuVamshee-M?share=2a7c9f7a&srid=ObDh
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 04/07/2018 - 09:42
नवीन
खुद्द आधार प्रणालित काम करणार्या माणसाचे हे निवेदन माझ्या या प्रतिसादातील मुद्दा क्रमांक ३ सिद्ध करत आहे. धन्यवाद !
- Log in or register to post comments
ल
लई भारी
Sat, 04/07/2018 - 12:38
नवीन
आपला प्रतिसाद आज वाचला आणि मग काल वाचलेली लिंक शोधून काढली.
आपल्या प्रतिसादाची लिंक बऱ्याच जणांना पाठवून झालीय :)
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Sat, 04/07/2018 - 08:50
नवीन
ह्याच विषयावरचा हा एक मस्त लेख
https://www.loksatta.com/lekha-news/april-fool-article-by-mandar-bharde-1655332/
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2