Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

घुंगरू

J — Jayant Naik, Mon, 04/02/2018 - 10:22
पायातल्या घुंगरानी मला विचारले …. “खरे खरे सांगशील? ...तू नाचतेस की मी नाचतो ? तूच नाचतेस तर माझी जरुरी काय ? जर मीच नाचतो तर तुझा उपयोग काय ? केव्हा केव्हा अशीच श्रांत उगाचच बसलेली असतेस … माझ्याकडे नजर जाताच … सारी सारी फुलून येतेस ! माझ्यासवे तू आणि तुझ्यासवे मी .. मग नाचच नाच होतो … तू तू नसतेस ..मी मी नसतो …..” प्रश्न माझेच घुंगरानी विचारलेले …. नाच होतो तेव्हा नेमके काय होते ? मी आणि घुंगरू ...दोघे असतो ही आणि नसतो ही .. दोघे मिसळून जातो … एकच एक ….फक्त नाच जन्मतो . सारे प्रश्न गळून जातात .. उत्तरे मग असतच नाहीत . असेच केव्हातरी मग मला समजते …घुंगरांच्या प्रश्नांचे उत्तर ... नाचणारा आणि नाचवणारा खरे तर एकच असतो … आरश्या पुढे ठेवलेला दुसरा आरसा .. काहीच खरे नाही आणि काहीच खोटे नाही ! माझ्याशिवाय घुंगरू निर्जीव ...कोपऱ्यातील अडगळ .. आणि घुंगरू नसतील तर माझ्या कलेचा अविष्कार नाही !

प्रतिक्रिया द्या
1148 वाचन

💬 प्रतिसाद (3)
च
चांदणे संदीप Mon, 04/02/2018 - 12:56 नवीन
शेवटच्या दोन ओळी नसत्या तरी चाललं असत असं माझं मत! Sandy
  • Log in or register to post comments
J
Jayant Naik Tue, 04/03/2018 - 06:21 नवीन
लिहिताना लिहिल्या पण आता तुम्ही म्हणताय ते पटते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
S
Sanjay Uwach Tue, 04/03/2018 - 08:57 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा