Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वाल्मिकी रामायणावरील पहिल्या चित्राकृती कोणत्या ?

म
माहितगार
Mon, 04/02/2018 - 10:31
🗣 0 प्रतिसाद
माझ्या काही जिज्ञासा. १) रामायणावर आधारीत सर्वात जुनी ज्ञात (सर्वप्रकारातील) चित्रे, शिल्पाकृती कोणत्या हे शोधण्यासाठी गूगल शोधले तर मला त्याचे चटकन उत्तर मिळाले नाही. २) रामायणावरील पटचित्रे कुठेकुठे उपलब्ध आहेत आणि त्यातली सर्वात जुनी कोणती असतील असाही प्रश्न पडला ३) त्यातच ऋग्वेद आणि रामायणात चित्र हा शब्द मुख्यत्वे सुंदर / आकर्षक आणि इतर अर्थानी विशेषण स्वरुपात येतो असले दिसले. मग आकृती अथवा पेंटींग या अर्थाने 'चित्र' शब्द कोणत्या संस्कृत ग्रंथात कोणत्या श्लोकात सर्वप्रथम येतो असाही प्रश्न पडला तसेच आकृती अथवा पेंटींग साठी इतर समानार्थी शब्दांपैकी पहिले उल्लेख कोणते हेही जाणून घेण्यास आवडेल. ४) वाल्मिकी रामायणाच्या बालकांडात 'नाना चित्र कथाः च अन्याः विश्वामित्र सहायेन' चित्र हा शब्द विशेषणम्हणून येतो आहे का चित्रासोबत कथा या अर्थाने येतो आहे ५) महाभारतात 'चित्र' शब्द येत असावा पण समहाऊ माझ्या गूगल शोधात हा शब्दाचे काही खास शोध हाती लागले नाही. 'चित्र' हा शब्द रामायणात बर्‍यापैकी येतो पण महाभारतात कमी का की माझा शब्दशोध चुकीचा जात आहे ?

प्रतिक्रिया द्या
1377 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा