Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गुंतवणूक

ह — हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर, Wed, 04/04/2018 - 09:54
हातसन डेअरीची बॅलन्सशिट चाळता चाळता मनाला हिसका बसला आणि एकदम आठवलं- कार्तिकातल्या पहाटे गाय व्यालेली, इनकॅन्डेसन्ट पिवळ्या उजेडात कडब्यावर पडलेलं ओलसर वासरू चाटत असलेली, सैरभैर तिच्या उष्ण उछ्वासानं, तुझी छाती भरून गेलेली. तेव्हा तुझ्या पाठीवर थंडीच्या चांदण्या शिरशिरल्या. --- जोखमीचे हिशोब मांडता मांडता जिवंत ठेवायला तुला, त्या क्षणांची हमी कधीच पुरणार नाही हे पक्कं ठाऊक होतं तुला, आणि तशाच शुभ्र आठवणींमुळे सरत्या पावसाळ्यातली एखादी सेपिया संध्याकाळ तुझ्या डोळ्यांना जाणवते आणि तुला वठू देत नाही. --- कॅबच्या दारातनं उतरताना तुझ्या शहरातही, सातवीणीचा आवाहक गंध आला तुला, मॅकार्थीच्या पिच्चरांत पाहिलास तसा एकांडा कश मारलास तुझ्या आवडत्या सिग्रेटीचा, तरी सातविणीची नशा उतरली नाही. म्हणजे तुझ्यात अजूनही शिल्लक आहेत न लिहिलेल्या ओळी. --- काचबंद ऑफिसात तोंडाची जिम करून तावातावानं लोक तुला पटवत होते, नोटबंदीची अत्यावशकता, कानात हेडफोनचे गोळे घालून "जनी जाय पाणियासी" ऐकल्यावर घसा जड झाला. मौनाचा गैरअर्थ, संमती म्हणून काढू दिलंस लोकांना. अंधारल्यावर नदीच्या पैलतीरी जाऊन पुनवेचा, घाटावर दीपोत्सव पाहिलास दूरस्थ कोलाहल पाण्यात विरत जाताना ऐकलास. --- शब्दांची गुंतवणूक न करताही जगता यावं इतकी कविता मिळवायची आहे. जिच्या तळाशी सारे ताळेबंद बॅलन्स व्हावेत.

प्रतिक्रिया द्या
2189 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
प्राची अश्विनी Wed, 04/04/2018 - 10:31 नवीन
कोलटकरचे वंशज.;)
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 04/04/2018 - 11:55 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 04/04/2018 - 12:09 नवीन
<<शब्दांची गुंतवणूक न करताही जगता यावं इतकी कविता मिळवायची आहे.>> ==>> वाह क्या बात है.!!
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 04/04/2018 - 12:09 नवीन
<<शब्दांची गुंतवणूक न करताही जगता यावं इतकी कविता मिळवायची आहे.>> ==>> वाह क्या बात है.!!
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Wed, 04/04/2018 - 12:22 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 04/04/2018 - 13:41 नवीन
जबरदस्त.. फार आवडली
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 04/10/2018 - 21:23 नवीन
सुंदर!!!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Wed, 04/11/2018 - 08:19 नवीन
ही पण भारी!!!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा