Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपाकरांच्या सेलेब्रिटीज, प्रथितयश, मोठ्या लोकांच्या जवळीकतेचा सर्व्हे - २०१८

A
arunjoshi123
Fri, 04/06/2018 - 14:26
🗣 59 प्रतिसाद
तर दोस्तानु, प्रत्येकाची रुची वेगवेगळी असते. छंद वेगवेगळे असतात. अस्मिता वेगवेगळ्या असतात. तसंच प्रत्येकाचं नशीब वेगवेगळं असतं. सर्वसाधारणपणे मी स्वतःला एक सामान्य माणूस मानतो. आपल्यापैकी अनेक मिपाकर देखील असंच मानत असणार असं वाटतं. पण आपल्यापैकी प्रत्येकास प्रसिद्ध, मोठ्या लोकांवद्दल एक कुतुहल असतं. (साहेबांच्या केबिनमधे देखील कोणी बिनकामाचा एक तास जास्त बसला तर इर्ष्या वाटते.). म्हणजे इतकं कि थेट त्यांचेशी भिडायची, भेटायची, वैयक्तिक ओळख करून घ्यायची, इ इच्छा होते. अर्थात आपण ती दाबून टाकत असतो. बिस्मिल्ला खानांची शहनाई ऐकताना त्यांनी एकांतात वाराणसीच्या घाटावर खास आपल्यासाठी एक राग गायला असता तर मजा आली असती असा विचार येऊन जातो. सचिननं आपल्या बॉलवर चौका मारला तर .... अडानी आपल्याला त्याच्या चार्टड फ्लाइटमधे बसवून आला तर ... रामदेवने आपले हातपाय पकडून एक आसन शिकवलं तर... शारुखने आपल्याला एक कश* दिला तर... पण असं कधी होत नाही. तरीही सर्वच जण आपल्यासारखे अभागी नसतात. आणि आपणही स्वतःस समजतो तितके अभागी नसतो. -------------------------------------------------------------------------------------------- या संदर्भात या धाग्यावर मिपाकरांचा एक सर्व्हे घ्यायचा माझा उद्देश आहे. प्रत्येकाला सिरियल नंबर, आपल्याला भेटलेल्या "प्रसिद्ध" माणसाचं नाव, ० ते १०० या रेंजमधे "भेटीच्या जवळीकतेचा" एक स्कोअर, आणि ब्रिफ डिटेल्स लिहायचेत. अधिक डिटेल्स लिहिणे इज एंकरेज्ड. याबद्दलच्या सर्वसाधारण गाइडलाईन्स अशा: १. मोठा माणूस, प्रसिद्ध माणूस हा तुमच्यामते वा काही विशीष्ट लोकांच्या मते वा जनतेच्या मते मोठा वा प्रसिद्ध असला पाहिजे. उदा. सुधीर चौधरी वा राजदीप सरदेसाई तुमच्या डोक्यात जात असला नि (दुर्दैवाने) तुम्हाला भेटला असला, तरी त्याच्या उल्लेख करायचा. नावडता म्हणून उल्लेख टाळायचा नाही. २. खेळ, राजकारण, सिनेमा, व्यवसाय, उद्योग, वकीली, धर्म, कला, समाजसेवा, अर्थशास्त्र, साहित्य, सोशल मिडिया, गुंडगिरी, सिविलायझेशनची अनेक इतर क्षेत्रे, पुरस्कार विजेते, इ इ इ इ काहीही क्षेत्र चालेल. ३. प्रसिद्धी ही "तुमच्यामते" असली पाहिजे. मग नगरसेवकाचे देखील नाव तुम्ही लिहू शकता. ४. प्रसिद्धीचे ऐवजी तुम्हाला थोरपण आढळले आहे तर ते देखील गृहीत धरू शकता. उदा. आदिवासी क्षेत्रात ५०० शाळा उभारणाराचे नाव कोणालाच माहित नाही पण तुम्ही त्याला भेटला आहात, तर अवश्य उल्लेख करायचा. जगात, देशात, राज्यात, विभागात, जिल्ह्यात, तालुक्यात व्यक्ति 'सामान्य माणसाच्या जिभेवर ' असलाच पाहिजे असं नाही. कर्तृत्ववान नि प्रसिद्धीपरांमुख असला तरी चालेल. कदाचित या धाग्यावर अनेक नविन महान लोकांची माहीती होईल. ५. तो माणूस आत्ता जिवंत हवा असं नाही. पण अजून उत्क्रांत वा उत्पन्न व्हायचेयत ते लोक टाळावेत. ६. जुनी अतिमहान माणसे (म्हणजे टिळक, गांधी, टागोर, नेहरू, सावरकर, पटेल, बोस, इ स्तरावरचे) तुमच्या पालकांना, पॅरेंट-इन-लॉज ना भेटली असली तरी उल्लेख करायला हरकत नाही. स्कोअरिंगः ७. प्रत्येक भेटीचा जवळीकतेचा स्कोअर टाकणे आवश्यक आहे. नाहीतर ती एंट्री गृहित धरली जाणार नाही. जितकी खास भेट तितका स्कोअर जास्त. ८. सर्वसाधारणपणे ५ ते १० म्हणजे तुम्ही सामान्य प्रेक्षक म्हणून मैफल ऐकली असणे, राजकीय भाषण ऐकले असणे. पण थेट तुमचा संबंध कमी. नंतर ऑटोग्राफ घेतला असेल, एखादे वाक्य बोलले असेल तर स्कोअर वाढव्वा. ९. तुमची एकमेकांची ओळख असेल, नाव माहित असेल, हून बोलावले असेल, चांगला परिचय असेल तर स्कोअर ७० पेक्षा जास्त असावा. १०. अगदी घरी सहकुटूंब बोलावून खाऊ पिऊ घालून ठेवून घेऊन निवांत गप्पा अनेकवार झाल्या असतील तर ९५ ते १०० स्कोअर द्यावा. ११. कामाच्या निमित्ताने अनेक भेटी झाल्या असतील, गहन चर्चा असतील तर ८० च्या आसपास स्कोअर येईल असं वाटतं. मिटींग मधे तुम्ही एक कोपर्‍यातले भागीदार असाल तरी स्कोअर कमी. १२. बस, ट्रेन, विमान यांच्यात शेजारी बसल्याने गप्पा, हँडशेक झाल्या तर २० ते ४० असा स्कोअर. नुसतं गल्लीतून जाताना नजरानजर झाली तर कमी. १३. महान व्यक्तिमत्त्वाची भेट घेऊन विद्युतचुंबकीय क्षेत्रात आल्याप्रमाणे एकतर्फी भारावून जाऊन प्रचंड सद्द्गतित इ इ झाला असाल, पाया पडला असाल, मिठी मारली असेल तर स्कोअर तुमचं तुमी ठरवा. १४. चप्पल, शाई इ इ फेकलं असलं तर ते ही तुमचं तुम्ही स्कोअर ठरवा. १५. ५ च्या पटीत स्कोअर देणे टाळा. इतर ८० आकड्यांचे देखील महत्त्व आहे. १६. काही नावे विसरली असाल तर नवा प्रतिसाद द्या. १७. इथे प्रतिसाद देणे हि फुशारकी नव्हे वा उलट स्वतःची झाकली मूठ उघडणे नव्हे. शक्य तितका प्रांजळ प्रतिसाद द्या. १८. ज्या व्यक्तिंचं नाव देणं अनुचित असेल वा कायदेशीर नसेल तिथे काहीतरी सूचक लिहा. १९. काही काही गंमतशीर, वा महत्त्वाच्या वा भावनिक भेटीचे वृत्तांत लिहाल तर अजूनच रंगत येईल. २०. जो कोणी ज्याला कोणाला भेटला, भेटली तेव्हा काय करायला पाहिजे होते यावर इतर वाचकांचा टोमणा असेल तर अवश्य लिहा. २१. मोठ्या लोकांकडून सोशल मिडीयावर (टिवी, रेडिओ, फोन ऑर फ्रेंड, पत्र, इ इ इ) प्रतिसाद किती जास्त मिळतो याप्रमाणे ० ते ४० स्कोअर असेल. फक्त सोशल मिडीयावरचे रिलेशन असेल तर जास्तीत जास्त ४० स्कोअर, मग तो माणूस तुमचा नवरा/बायको का बनणार असेना भविष्यात. २२. भीमसेन जोशी आणि शेजारसेन दोषी या दोघांच्या मैफिली पहिल्या रांगेत बसून १-२ तास ऐकल्या तर स्कोअर समानच. शेजारसेन तितके प्रसिद्ध नाहीत म्हणून कमी स्कोअर द्यायचा नाही. नावात सगळं आलं, नाव लिहिलं कि कळेल कि किती मोठी हस्ती आहे. स्कोअर हा फक्त जवळीकता मोजण्यासाठीच आहे, व्यक्तिचे मोठेपण मोजण्यासाठी नाही. ---------------------------------------------------- अजून काय शंका असतील तर सांगा. मी जितक्या अडचणी पटकन इमॅजिन करू शकतो तितक्या लिहिल्यात. ------------------------------------------------------ हा धागा खर्‍या माहितीचा असला तरी फुल टू टाईमपास असावा. --------------------------------------------- वशिलेबाजी इ इ मागताना धाग्याचा संदर्भ देऊ नये. ------------------------------------------------------------- साईड बिझनेस म्हणून लोकांनी मोठ्या लोकांच्या जवळच्या लोकांकडून ऐकलेल्या त्यांच्याबद्दलच्या गोष्टी सांगीतल्या तर अजून मजा येईल. ------------------------------------------------------------------------ जवळीकता हा भावनिक, वैयक्तिक विषय आहे. स्कोअर कसा द्यावा याचे नियम केवळ मार्गदर्शनपर आहेत. बाकी आप की मर्जी!! =============================================== *त्या पवित्र संवैधानिक इशारों के साथ.
वर्गीकरण
गंमत

प्रतिक्रिया द्या
15732 वाचन

💬 प्रतिसाद (59)
S
shashu Tue, 04/10/2018 - 12:28 नवीन
मेधाताई पाटकर > रेवस (अलिबाग) येथील प्रस्तावित विमानतळास विरोध सभेसाठी आल्या होत्या (साधारण २० वर्ष्यापुर्वी). माझ्या चुलत आजीच्या भावजय नी त्यांचा काही काळ सांभाळ केला होता. आणि त्याही नेमक्या त्यावेळेस गावी आल्या होत्या. त्या आजींना घेवून आम्ही मेधाताईंना भेटायला गेलो होतो. आजींना पाहताच मेधाताईंनी चरणस्पर्श केले. बाबासाहेब पुरंदरे > जुईनगर (नवी मुंबई) येथे शिवरायांवरील कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळेस गाडीत मागच्या आसनावर बसलेले आणि मी अगदी जवळच उभा होतो. लक्षमिकांत बेर्डे > लहान असताना (मी :)) आमच्या सासवणे (अलिबाग) गावी मराठी चित्रपटाचे चित्रण करण्यासाठी आले होते. अगदी जवळून पाहता आले. प्रिया बेर्डे > एका नातलगांच्या लग्नामध्ये उपस्थिती. जितेंद्र जोशी > मुंबई-पुणे एक्सप्रेस वे च्या खालापूर येथील फूड-मॉल मध्ये. सतीश राजवाडे > विलेपार्ले ईस्ट नेहरू रोड वरील एका केक शॉप मध्ये भेट. अरुण कदम (कॉमेडी एक्सप्रेस फेम) > सांताक्रूझ स्टेशन ला नेहमी भेट व्हायची. संदीप कुलकर्णी (डोंबिवली फास्ट फेम ) > विलेपार्ले वेस्ट कूपर हॉस्पिटल समोर रिक्शा मध्ये होते. आणि मी खूप वेळ निरखून पाहत होतो पण मला नाव आठवत नव्हते. त्यांचेही माझ्याकडे २-३ दा लक्ष गेले. मला एक स्मित देऊन, टाटा करून निघून गेले. अक्षय खन्ना > आमच्या गाव शेजारी मांडावा या ठिकाणी यांचा बंगला व वाडी आहे. संध्याकाळी सायकल वरून आजूबाजूच्या गावात रपेट मारत असतो. काही लोकांना तर ओळखू हि येत नाही. मी मांडव्याला काही कामानिमित्त जात होतो तर हे महाशय काही गवंडी लोकांसोबत स्वतःच्या कंपाउंड गेट चे बांधकाम करत होते म्हणजे स्वतः विटा रचून माल थापत होते. अगदी साधा माणूस. गौतम सिंघानिया (अध्यक्ष्य रेमंड ग्रुप) > यांचा सुद्धा प्रशस्त बंगला, वाडी, ह्याली-प्याड, गाड्यांचा रेसकोर्से आणि बरेच काही आहे आमच्या गावाशेजारी. सुट्टीच्या दिवशी गावी जाणे झाले कि बहुतेक यांचे दर्शन होतेच. (थोडे अवांतर, यांच्या अर्धांगिनी कातरवेळी जॉगिंग साठी निघतात. मागे एक चारचाकी गाडी असते. गाडीत २-३ लोक असतात. एक गार्ड हातात दंडुका व बंदुका घेवून तिच्या सोबत धावत असतो कारण धावताना अंगावर कुत्रे आले तर गार्ड रक्षण करेल. कारण या बाईंचा जॉगिंग करताना अवतारच तसा असतो रंगीबेरंगी कपडे कधी कधी (अगदी)छोटीशी शॉर्ट, कानात भले मोठे हेडसेट आणि जॉगिंग करताना मोठं मोठ्याने गाणी म्हणत असते. अगदी ८-१० कि.मी. सहज पळते. कधी थकलीच तर गाडीत बसून पुन्हा बंगल्यात येते. माझे काही चुलत भाऊ व मित्र यांच्या व इतर शेठ लोकांच्या वाडीत कामाला असतात ते या शेठ लोकांचे असे एकेक किस्से सांगतात कि आपणास खरेच वाटणार नाहीत, अतिशोयोक्ती वाटेल. त्यासाठी एक वेगळा धागा काढावा लागेल. खूप सारे सेलिब्रेटी आमच्या आजूबाजूला वास्तव्यास आहेत. मांडावा जेट्टी वरून स्पीड बोटीने या सर्वांचे येणे-जाणे कायम चालूच असते) रविना टंडन > गौतम सिंघानिया यांच्याकडे हिचे वरचेवर येणे जाणे होते. गावात फेरफटका मारताना दिसली होती. दिया मिरझा > अबुधाबी विमानतळ. बाजूनेच चालत होती पण त्यावेळीस ओळखता आले नाही. कारण चेहऱ्यात इतका फरक होता कि मी लगेच ओळखू शकलो नाही. सध्यातरी इतकेच आठवतेय...
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 04/10/2018 - 14:15 नवीन
त्यासाठी एक वेगळा धागा काढावा लागेल
नेकी और पुछ पुछ.. काढून सोडा बघा धागा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: shashu
A
arunjoshi123 Tue, 04/10/2018 - 12:38 नवीन
धाग्याला मस्त रंग चढला आहे. बाकी लोगां भी कूदो भै।
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 04/10/2018 - 13:30 नवीन
प्रसिद्धी आणि प्रसिद्ध लोकांची मला अ‍ॅलर्जी आहे.
  • Log in or register to post comments
S
shashu Wed, 04/11/2018 - 05:58 नवीन
कधीपासून झालीय हि लागण...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
स
सुमीत भातखंडे Wed, 04/11/2018 - 07:27 नवीन
मिपाकरांच्या एवढ्या मोठ्या-मोठ्या लोकांशी भेटी-गाठी झालेल्या वाचून असुया मिश्रित कौतुक वाटलं.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 04/12/2018 - 15:32 नवीन
मोठ्या लोकांबाबत मी काहीच बोलणार नाही. सामान्य माणसे अधिकांश मोठ्या लोकांपेक्षा फार चांगली असतात.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 04/12/2018 - 17:50 नवीन
पण तुम्ही बोलतात तर तुमची लिस्ट सर्वात भारी असेल. चॅलेंजच नाही, नै का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
आ
आदूबाळ Mon, 04/16/2018 - 12:44 नवीन
मिस इंडिया-युनिव्हर्स, आणि नंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता कॉलेजात माझ्या वर्गात होती. एका मित्राचा आणि तनुश्रीचा किस्सा लय फेमस झाला होता. प्रस्तुत मित्र अत्यंत बुजरा. मुलगी समोर आली की त्याची जी वाचा बसायची, ती थेट ती मुलगी दृष्टिआड झाल्यावर परतायची. कॉलेजात तनुश्री सौंदर्यवतींत गणली जायची, पण 'द सौंदर्यवती'** मानली जात नव्हती. एकदा कॉलेजला अचानक कसलीतरी सुट्टी जाहीर झाली. काही लोकांपर्यंत हा निरोप पोचला नाही, त्यामुळे ते गाफील राहून कॉलेजला पोचले. त्यात हा मित्र आणि तनुश्री होते. दोघेही वर्गात जाऊन बसले. मास्तरही येईना आणि इतरही कोणी येईना. आपण एका सुंदर मुलीबरोबर - पब्लिक प्लेसमध्ये का होईना, पण - एकटेच आहोत या कल्पनेने मित्र प्रचंड अवघडलेला. शेवटी तनुश्री स्वतःहूनच मित्रासमोर आली, आणि फर्ड्या इंग्रजीत "आज सुट्टी आहे का कॉलेजला?" असा वट्ट सवाल केला. मित्राची दातखीळ उचकटेना. तिने बिचारीने तीनचार वेगवेगळ्या प्रकारे त्याला बोलतं करायचा प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. शेवटी ती कंटाळून निघून गेली. ती पार दृष्टीआड झाल्याची खात्री करून साहेब जीव मुठीत धरून तिथून खचकले. पीडी कट्ट्यावर चार मित्रांच्या कम्फर्ट झोनमध्ये आल्यावर त्यांना वाचा फुटली आणि हा किस्सा समजला. **कॉलेजच्या भाषेत : जगाचा टप्पा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा