हे ही खरंय !
हे ही खरंय !
मनात नेहमी तीच हुरहूर
काहूर करून टाकणारी !
तीच आठवण मन व्यापून टाकणारी ,
रोज आठवण काढायलाच हवी ....... असं नाहीये खरं तर
पण रोज आठवण येते ..... हे ही खरंय !
पाण्याने वाहतं असलं पाहिजे
त्याने सगळं पुसलं गेलं पाहिजे
डोळे, मन, अंगण, आभाळ
ते नेहमी भरून वाहीलंच पाहिजे....... असंही नाहीये खरं तर
पण रोज आसवे भिजवून जातात ..... हे ही खरंय !
विरह विसरता आला पाहिजे,
नवा डाव मांडता आला पाहिजे,
आचारात, विचारात, वागण्यात, जगण्यात,
नेहमी हसणं जमलंच पाहिजे....... असंही नाहीये खरं तर
पण रोज हसून फक्त क्षण साधायचे ...... हे ही खरंय !
प्रत्येक कविता रेखाटली पाहिजे ,
तुझ्या आठवणीने ती शहारली पाहिजे,
वहीमध्ये कागदावर, ओळींवरच्या शब्दांवर
नेहमी तू असलाच पाहिजेस ..... असंही नाहीये खरं तर
पण तुझ्याशिवाय कविता अपूर्ण असते ... ...... हे ही खरंय !
बरीच वर्ष उलटून गेलीत .......असं आहे खरं तर
आठवांचे क्षण पुसट झालेत ..... असंही आहे खरं तर
तो आता वहीमध्ये बंद आहे ...... असंही आहे खरं तर
पण वहीवर धूळ साचली तरी ........ वहीतली गोष्ट बदलत नाही ..... हे ही खरंय !!
------------फिझा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोहराच्या दारावर कैर्या मागनं... [ * काय बाई एका-एकाच वागनं ] :- बबन