नास्तिक गुरु/शिष्यांनी कैद्यांना सुसंस्कारीत कसे करावे ?
समजा तुम्ही यनांसारखे नास्तिक धर्माचार्य किंवा प्राडाँसारखे नास्तिक गुरु किंवा कुणातरी नास्तिक गुरुचे नुसतेच अबकड नास्तिक शिष्य आहात किंवा गुरु शिवाय नास्तिक आहात . समजा एका तुरुंगात काही अस्तीक कैदी आहेत जे त्यांना मिळणार्या विवीध धर्माच्या उपदेशकांचे सुसंस्काराचे उपदेश जेलच्या बाहेर पडल्यावर विसरुन पुन्हा पुन्हा जेलच्या वार्या करतात . आता एका चांगल्या जेलर महोदयांना नास्तिक चळव्ळीबद्दल सकारात्मक माहिती मिळाल्याने आणि आस्तीक उपदेशकान्चा प्रभाव जाणवत नसल्याने , यनांसारखे नास्तिक धर्माचार्य किंवा प्राडाँसारखे नास्तिक गुरु किंवा तुमच्या सारख्या अबकड नास्तिकास नास्तिक असूनही मुल्ये चांगली ठेऊन जगता म्हणून, कैद्यांस्मोर एक आदर्श घालून देण्यासाठी बोलवतात.
तुम्ही कैद्यांना मुल्य आणि सुसंस्काराचा पाठ / आदर्श कश्या पद्धतीने द्याल की त्यांना कैदेतून बाहेर आल्यावर पुन्हा गुन्हे करण्यास उद्युक्त व्हावे वाटणार नाही ?
* हा प्रश्न नास्तिकांना हे जमणार नाही समजून विचारलेला नाही तर जमेल अशा विश्वासानेच विचारला आहे .
१) नाही हे आस्तीक धर्मोपदेशकांचाच प्रांत आहे म्हणून सोडून द्याल ?
२) नाही हे मानसशास्त्र तज्ञांचे काम आहे म्हणून सोडून द्याल ?
३) कि असे आव्हान समोर आले तर पेलाल ? समजा पेलू शकता असे वाटले तर कसे पेलाल म्हणजे कैद्यांना मुल्य आणि संस्कारांचा किंवा इतर जो काही तुम्हाला योग्य वाटतो तो उपदेश नेमका कसा कराल ? म्हणजे जेलर महोदयांचे कैदी चान्गल्या मार्गाला लागणे हे उद्दीष्ट सफल होईल.
* ( नास्तिकांना कोणत्याही जेल व्हिजीटचे खरोखरचे आमंत्रण नाही , केवळ समजा समजून चर्चेत भाग घ्यायचा आहे त्यामुळे दुसरी कडे जाण्यास वेळ नाही हे कारण चर्चेत सहभागी न होण्यास नास्तिकांसाठी पुरेसे नाही,
* किंवा हे काम करण्यात आस्तीक का कमी पडतात अथवा अंधश्रध्देमुळे होणारे गुन्हे हेही या चर्चेतून टाळणे अपेक्षीत आहे . चर्चेचा ओघ कैद्यांच्या मुल्य / संस्कार संवर्धनात नास्तिक म्हणून तुम्ही किंवा तुमच्यासारखे नास्तिक योगदान नेमक्या कोण कोणत्या पद्धतीने करु शकतात हे जाणून घेणे आहे. )
* हि धागा लेख चर्चा जेल मधील आस्तीक अथवा नास्तीकांची संख्या किती असते या वादासाठी काढलेली नाही , आस्तीक आहेत हे ह्या उदाहरणापुरते गृहीत धरले आहे .
* मुख्य उत्तरांची मिपावरील जाणकार नास्तिकांकडून अपेक्षा आहे. आणि मिपाकर आस्तीकांनी संबंधीत शंका विचारल्यास आपल्या परीने शंका समाधानात सहभागी होणे सुद्धा.
* आस्तीकांनी मुख्य उत्तरे देण्ञाचे टाळून नास्तिकांचे प्रतिसादातील कोणता भाग तुम्हाला पटतो आणि कोणता पटत नाही याची चिकित्सा जरुर करावी.
* अपेक्षा व्यक्तिलक्ष्य तर्कदोष टाळून मुद्द्यांवर तर्कसुसंगत व्हावी अशी अपेक्षा आहे.
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार.
आस्तीक-नास्तिकपाव जिंदाबाद जय हिंद जय महाराष्ट्र
तसंच नास्तिकांचंही आहे हे लक्षात न घेता, त्यांची ठराविक धर्मविरोधी, उद्धट अशी संभावना करण्यातून, कुचेष्टा करण्यातून कोणता सद्गुण जोपासला जातो ते त्यांचा देवच जाणे.तसंच आस्तिकांचंही आहे हे लक्षात न घेता तलवारबाजी करणारे, निवाडा करण्याची उतावीळ असणारे, बुद्धीला गंज चढलेले, मेंदू न वापरणारे, अंधश्रद्ध, मूर्ख अशी त्यांची संभावना करण्यातून, कुचेष्टा करण्यातून कोणते बुद्धीप्रामाण्य जोपासले जाते ते त्यांचा चार्वाकच जाणे.त्यावर नास्तिक बाजू मांडणारे चार-दोन प्रतिसाद आणि बाकी सर्व स्वतला आस्तिक म्हणवणाऱ्याची तलवारबाजी. खरंतर हे आस्तिक नव्हेतच.आपला तो बाब्या, दुसर्याचं ते कार्टं!त्यांचा ईश्वरावर खरोखरचा विश्वास असता तर नास्तिकांचा प्रश्न त्याच्यावर सोपवून ते निर्धास्त झाले असते.आस्तिक हे फार पूर्वीपासून सांगताहेत. तुम्ही नास्तिक असलात तर आमची हरकत नाही. पण आस्तिकांना उपदेशाचे डोस पाजायला येऊ नका. आम्ही आस्तिक कसेही असलो तरी आमचे प्रश्न आमच्यावर सोपवून निर्धास्त व्हा. पण नाही. नास्तिकत्वाची खाज स्वस्थ बसू देत नाही आणि म्हणून नास्तिक सारखे खाजवून खरूज काढायला बघतात.पण त्यांना निवाडा करण्याची जी उताविळ असते ना की बस्स.आस्तिकांना निवाडा करायची उतावीळ? काहीतरीच काय? नास्तिक हे वैज्ञानिक दृष्टीकोन असणारे, बुद्धीप्रामाण्यावादी, विचारवंत, विवेकवादी इ. विशेषणे नास्तिकांना फार पूर्वीच स्वतःला लावून घेतलेली आहे. नास्तिक परीषदा बोलावून एकमेकांचा सत्कार करून पुरस्कार वगैरे देऊन 'अहो रूपम् अहो ध्वनीम्' हा वाक्प्रचारही त्यांनी सिद्ध करून दाखविला आहे. त्याचवेळी आस्तिक हे तलवारबाजी करणारे, निवाडा करण्याची उतावीळ असणारे, बुद्धीला गंज चढलेले, मेंदू न वापरणारे, अंधश्रद्ध, मूर्ख असा निवाडा नास्तिकांनी फार पूर्वीच केलेला आहे.तेव्हा वालावलकर सर, काही चिंता करु नका. तुम्ही व्यक्त केलेल्या आशावादानुसार नास्तिकांची संख्या वाढली आहेच.वालावलकर सरांना कोणत्याच प्रश्नांची उत्तरे देणे बंधनकारक नसल्याने ते कधीच चिंता करीत नाहीत. 'हिट अॅण्ड रन' धोरण असले की हिटरला चिंता नसते. आणि नास्तिकांची वाढलेल्या संख्येबद्दल बोलायचं म्हटलं तर पु. लं. चं वाक्य स्मरलं. . . . "बेंबट्या, या जगात गाढवे फार, कुंभार थोडे. तस्मात कुंभार हो.".फक्त त्यांनी घेतलेलं आस्तिकत्वाचं पांघरुण दूर होण्याची गरज आहे. तसं वातावरण मिळालं की ते स्वत:हून हे पांघरुण दूर करतील.नास्तिकांनाही आस्तिकत्वाचं पांघरूण लागतंच असं दिसतंय. पण हे पांघरूण दूर केलं तर ते उघडे पडतील ना (तसेही ते उघडे पडतातच). त्यापेक्षा राहू देत ते पांघरूण.हा प्रकार धार्मिक वाटतोय. एक्सपर्ट्स टू कन्फर्मधार्मिकच आहे. याबरोबरीने योगासने, सूर्यनमस्कार इ. सुद्धा धार्मिक प्रकार आहेत. म्हणून तर मुस्लिम, खांग्रेस, डावे इ. निधर्मी पक्श शाळेत या गोष्टी करायला विरोध करतात.