Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गांजाला भारतात कायदेशीर मान्यता मिळावी का?

प
पुंबा
Wed, 04/11/2018 - 17:37
🗣 158 प्रतिसाद
गांजाचे व्यसन असणारी शरीराचे खोके झालेली, डोळे निस्तेज झालेली समाजाच्या निम्न स्तरातली मंडळी नेहमी दिसून येत, तेव्हा त्यांच्याविषयी अनुकंपा वाटत असे. समाजात नेहमीच त्यांची गांजाडा म्हणूनच संभावना होत असे, दारूड्यांपेक्षा वाईट प्रतीचे व्यसनाधीन म्हणून त्यांची घृणा केली जाई. मी लहानपणी 'लोकमत' या वृत्तपत्रात डॉ. कल्याण गंगवाल यांची ड्रग्जचे दुष्परीणाम सांगणारी एक लेखमालिका वाचली होती, तीतदेखिल गांजाचे भरपूर दुष्परीणाम सांगितले होते, जे वाचून अंगावर काटा आल्याचे आठवते. आता मात्र ऑफिसमधील कलिग्ज किंवा कॉलेजमधले मित्र यांच्याकडून गांजाविषयी निराळीच माहिती समजते. एक तर ह्या सगळ्याच लोकांत गांजा हे निरूपद्रवी व्यसन असल्याबद्दल खात्री आहे. ह्यांच्या तब्येतीवर किंवा कार्यक्षमतेवर कुठला वाईट परीणाम झाल्याचे दिसत नाही. (माझा सँपल सेट खुप छोटा आहे याची जाणीव निश्चित आहे.) अमेरिकेत झालेल्या संशोधनाचा किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या गांजाच्या सुरक्षीत आणि अंमली पदार्थ नसण्याबद्दलच्या रिपोर्टचा(संदर्भ) हवाला देत ते भारतात गांजा कायदेशीररीत्या उपलब्ध असावा अशी मागणी करत असतात. अमेरिकेत ९ राज्यांत डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गांजा सेवन करण्याची परवानगी २१ वर्षांपुढील व्यक्तिस आहे. २९ राज्यात मेडिकल प्रिस्क्रिप्शन असेल तर गांजा मिळू शकतो. पॉप्युलर कल्चरमधूनदेखिल गांजा सेवन केल्याचे उल्लेख(एआयबी किंवा टिव्हीएफच्या वेबसीरीजमधून वगैरे) होताना दिसतात. गांजा बर्‍याचदा अ‍ॅंटी- एस्टॅब्लिशमेंटचे चिन्ह म्हणून देखिल मिरवले जाते. गांजा हे अगदीच निरूपद्रवी आणि व्यसन न लागू शकणारी वनस्पती आहे असे मत वैद्यकिय क्षेत्रात देखिल बहुसंख्य तज्ञांत आढळेल. मात्र मानसरोगतज्ञांत व मेंदूतज्ञातील काही वर्तुळात गांजाच्या दुष्परीणामांबद्दल भिन्न मते असल्याचे आढळते. इतर अंमली पदार्थांच्या सोबत गांजा असणे हे सिगारेट व दारू कंपन्यांचे कारस्थान असल्याचे बंदीविरोधकांचे म्हणणे दिसते. बंदीविरोधकांचे युक्तिवाद खालीलप्रमाणे: १. गांजामुळे उलट इतर अंमली पदार्थाकडे वळण्याचे प्रमाण कमी होईल. २. सिगारेट ओढण्याचे किंवा तंबाखूचे दुष्परीणाम सर्वांसमोर आहेत, ते शास्त्रिय संशोधनातून सिद्ध देखिल झाले आहेत. तंबाखू सेवनाने ७० लाखांहून अधिक व्यक्ति एका वर्षात मरतात(स्रोतः वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) मात्र तरीही तंबाखुवर बंदी नाही मात्र गांजाच्या थेट सेवनामुळे मृत्यू झाल्याचे उदाहरण नसतानासुद्धा गांजावर बंदी हे तंबाखू लॉबीचे कारस्थान आहे. तसेच दारूमुळे झालेल्या मृत्यूंशी देखिल तुलना केली जाते. ३. बंदी असूनसुद्धा नार्कोटिक्स डिपार्टमेंट आणि अंमली पदार्थाचे व्यापारी-स्मगलर्स यांच्या संगनमताने भारतात निर्धोकपणे गांजा मिळतो. मात्र त्याचे पैसे दहशतवादी व समाजविरोधी तत्वांना मनी लाऊंडरींगस्वारे मिळतात. एक नगदी पिक जे शेतकर्‍यांना बरेचसे उत्पादन मिळवून देऊ शकते त्यापासून शेतकर्‍यांना वंचित ठेवले जाते. ४. भारतात गांजाच्या परीणामांवर फारसे सम्शोधन न होताच बंदी घातली गेली आहे. जे अन्याय्य आहे. ५. टिपिकल लिबर्टेरियन युक्तिवादः लोकांच्या वैयक्तिक बाबीत जसे व्यसन ढवळाढवळ करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला असू नये. तर बंदी चालू ठेवण्याच्या बाजूच्या लोकांचे मुख्य युक्तिवाद खालीलप्रमाणे असतातः १. गांजा ही इतर अंमली पदार्थाच्या सेवनाची पहिली पायरी असू शकते. किंबहूना बर्‍याच केसेसमध्ये तसेच असते. २. गांजामुळे होणारे भास- भ्रम हे मेंदूला हानीकारक ठरतात असेदेखिल काही संशोधनात सिद्ध झाले आहे. मेंदूतील पेशी मरण्यासंबंधीचे संशोधन बर्‍यापैकी गाजले आहे. संदर्भ ३. अंमली पदार्थावर बंदी असणेच योग्य, खरे तर सिगारेट- दारूवरदेखिल बंदी असावी पण गांजावरील बंदी उठवू नये. ४. भारत आणि अमेरिकेत फरक आहे, तिथे मेडिकल मरियुवानाचे नियम्ट्रण व्यवस्थित होऊ शकते मात्र भारतातल्या भ्रष्ट व्यवस्थेत त्याची पायमल्लीच होईल. त्यामुळे परवानगी नकोच. ५. गांजा तंबाखूप्रमाणे प्रक्रिया करून मग सेवन करायचा नसतो, थेट वापरता येतो. अधिकृत परवानगी दिली तर किती मोठ्या प्रमणात गांजा सेवन करण्याचे प्रमाण वाढेल? शिवाय देशासाठी अतीमौल्यवान असणारे मनुष्यतास गांजाच्या नशेत वाया जातील त्यामुळे हे आजिबात करू नये. आणखी एक उपमुद्दा: सत्पुरूष, संत किंवा सदगुरू वगैरे म्हणून पुज्य असणार्‍या धार्मिक गुरूंच्या हातातील चिलिम हे गांजाच्या गौरवीकरणाचं उदाहरण वाटतं का? या विषयावर मिपाकरांची मते जाणून घ्यायला आवडतील. चर्चा गांजा व त्याचे उपप्रकार जसे भांग इत्यादीपर्यंतच मर्यादीत रहावी. शक्यतो राजकिय सुंदोपसुंदी टाळाच. १. या विषयावर द हिंदूत झालेला वादविवादः इथे २. गांजाविषयीची WHO वरील माहिती इथे: http://www.who.int/substance_abuse/facts/cannabis/en/ ३. क्वोरावर या विषयावर ढिगार्‍याने चर्चा झाल्या आहेत त्यातील महत्वाच्या चर्चा: इथे व इथे ४. अमेरिकेतील गांजासंबंधी: इथे
वर्गीकरण
समाज

प्रतिक्रिया द्या
77448 वाचन

💬 प्रतिसाद (158)
श
श्रीगुरुजी Fri, 04/13/2018 - 10:48 नवीन
एक इतकुसे खुस्पट डॉक्यात आले ते म्हणजे गांजाचे समर्थन करणार्‍या मंडळीला त्यांची यत्ता ५ व्वीत शिकणारी मुलगी, किंवा इंजिनिअरिंगला शिकणारा मुलगा, किंवा आयटीत लेट आवर्स शिफ्ट करणारी बहीण, शिक्षिका असलेली बायको यापैकी कोणी, किवा इव्हन घरातले नको तर मुलांचे शिक्षक गांजाच्या तारेत दिवसाचा बराच काळ असतात असे कळले तर त्यांचे हेच मत कायम असेल का ये रे डिअर, दोघेही बसू म्हणून गळ्यात गळे घालून जोडीने कारेक्रम होईल. जस्ट कुतुहल बरं का! एका धाग्यावर न्यूड मॉडेलिंगचे तावातावाने समर्थन करणा-यांना मी विचारले होते की तुमच्या कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तीने हे केलं तर त्याचे समर्थन कराल का? यावर एकाही समर्थकाने स्पष्ट भूमिका न घेता हिंदुत्ववादी, कर्मठ, टिपिकल पुरूषी मानसिकता अशा शब्दात माझी संभावना केली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ज
जेम्स वांड Fri, 04/13/2018 - 10:53 नवीन
ह्यात काय हिंदुत्ववादी! खजुराहोच्या कामशिल्पांचा धर्म अन देश आपला, हे लिब्रांडू काय आपल्याला लिबरल आर्ट शिकवणार का आता! उलट तुम्हाला टीपीकल एकपुस्तक एकेश्वरवादी , बुरका समर्थक, स्त्रीला वस्तू समजणाऱ्या दुसऱ्या एखाद्या बेकार धर्माचे पाईक म्हणले असते तर चालले असते, पण तशी जीभ वळणाऱ्याला लिब्रांडू नाही म्हणत ना!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 04/13/2018 - 14:03 नवीन
असा प्रतिसाद येणार हे वाटलंच होतं. असो. फाटे न फोडता फक्त हो किंवा नाही या शब्दात तुम्ही सांगा. १) न्यूड मॉडेलिंगचे तुम्ही समर्थन करता का? २) समर्थन करीत असाल तर तुमच्या कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तीने हे केलं तर त्याचे समर्थन कराल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
श
श्रीगुरुजी Sat, 04/14/2018 - 04:37 नवीन
प्रतिसादाची वाट पहातोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ज
जेम्स वांड Sat, 04/14/2018 - 06:52 नवीन
न्यूड मॉडेलिंग वगैरे नाही आवडणार मला, पण तुम्ही का मनाला लावून घेतले, मी उलट लिब्रांडू जनतेस शिव्या देऊन एक पुस्तक एकेश्वरवादी जनतेचा दांभिकपणा हायलाईट करावा म्हणत होतो, काय राव गुरुजी आपलं परकं ओलं सुकंही न ओळखता येण्या इतका द्वेष अन तिरसटपणा नका ठेऊ इतकी विनंती करतो फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
M
mayu4u Sun, 04/15/2018 - 10:20 नवीन
१. न्यूड मॉडेलिंगचे तुम्ही समर्थन करता का? उत्तर: हो. मिटक्या मारत पहातो. 2. समर्थन करीत असाल तर तुमच्या कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तीने हे केलं तर त्याचे समर्थन कराल का? उत्तर: नाही. कारण मी दांभिक आहे. याउप्पर, मी गांजाचे समर्थन करता का? उत्तर: हो. समर्थन करीत असाल तर तुमच्या कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तीने हे केलं तर त्याचे समर्थन कराल का? उत्तर: हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
M
mayu4u Sun, 04/15/2018 - 10:17 नवीन
... जग आहे, हे का विसरता नेहमी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 04/12/2018 - 10:18 नवीन
छ. शिवाजी महाराजांविषयी बोलत असताना प्रा. शिवाजीराव भोसले यांनी ,तरुणांनी शिवाजी महाराजांचा कोणताही आदर्श घेतला नाही तरी हरकत नाही, परंतू त्यांना कसलेही व्यसन नव्हतं हे लक्षात ठेवून तेवढाच आदर्श घेतला तरी पुरे आहे अशी जाणीव करून दिली. अक्षरशः कानाखाली वाजवल्यासारखं जाणवलं. छ. शिवाजी महाराज की जय! हेच एकमेव व्यसन. कुठलेही द्रव्य सेवन करून शरीर व मेंदू गहाण टाकणे हे केव्हाही वाईटच.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 04/12/2018 - 12:02 नवीन
कुठलेही द्रव्य सेवन करून शरीर व मेंदू गहाण टाकणे हे केव्हाही वाईटच.
लै येळा सहमत. या एका वाक्यात सगळं आलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
प
पुंबा गुरुवार, 04/12/2018 - 12:13 नवीन
वरील प्रतिसादात असहमत होण्यासारखे काहीच नाही. मुद्दा गांजा या एकाच पदार्थासंबंधी आहे, ज्याची विक्री, सेवन, लागवड कायदेशीररीत्या वैध ठरवावी का? शिवाय, गांजाचे व्यसन लागत नाही असे WHO चे म्हणणे आहे, मग तो अंमली पदार्थाच्या यादीत का असावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
प
पगला गजोधर गुरुवार, 04/12/2018 - 12:27 नवीन
गांजाचे व्यसन लागत नाही असे WHO चे म्हणणे आहे
गांजा सेवनामुळे मेंदूवर परमनंट डॅमेंज होत का ? गांजा सेवनाचे दुष्परिणाम पुढील पिढीत जेनेटिकली कॅरीफॉरवर्ड होतात का ? गांजाचे व्यसन लागत नाही असे WHO चे म्हणणे आहे तर, रेफ द्या, स्टॅस्टिटीकल डेटा रेफ द्या, WHO ने *डिस्क्लेमर दिलेत का ? निष्कर्ष प्रकाशित करताना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
A
arunjoshi123 गुरुवार, 04/12/2018 - 14:11 नवीन
शिवाय, गांजाचे व्यसन लागत नाही असे WHO चे म्हणणे आहे,
हे म्हणणं चूक आहे. गांजा हे एक व्यसन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
स
सुबोध खरे Fri, 04/13/2018 - 06:16 नवीन
पुम्बा साहेब गांजाचे व्यसन लागत नाही असे WHO चे म्हणणे आहे. हे आपले विश्लेषण चुकीचे आहे. Compound in Marijuana Appears Safe and Nonaddictive, WHO Says" हे शिर्षक आहे आणि पहिले वाक्य A compound in marijuana appears to be relatively safe and nonaddictive, according to a new report from the World Health Organization (WHO). असे आहे गांजातील "कॅनाबिडायॉल" या द्रव्याचे व्यसन लागत नाही असेच वरील दुवा म्हणतो. हे द्रव्य अपस्मार सारख्या काही आजारात उपयोगी पडते. याचा अर्थ गांजा तील "एक द्रव्य" उपयुक्त आहे सर्वच्या सर्व द्रव्ये नाहीत. "कॅनाबिडायॉल" या द्रव्याचे addiction potential अगदीच कमी आहे कारण त्याने "नशा" येत नाही.
पण गांजात सर्वात जास्त प्रमाणात असलेले द्रव्य THC किंवा टेट्रा हायड्रो कॅनाबिनॉल हे द्रव्य नशा आणणारे त्यामुळेच व्यसन लावणारे आहे
Unlike tetrahydrocannabinol (THC), which is another compound found in marijuana, CBD does not have "psychoactive" effects. In other words, CBD won't get you high. कृपया गांजाचे व्यसन लागत नाही असा चुकीचा अर्थ काढू नये. Recent data suggest that 30 percent of those who use marijuana may have some degree of marijuana use disorder. People who begin using marijuana before the age of 18 are four to seven times more likely to develop a marijuana use disorder than adults. Those studies suggest that 9 percent of people who use marijuana will become dependent on it, rising to about 17 percent in those who start using in their teens. https://www.drugabuse.gov/publications/research-reports/marijuana/marijuana-addictive
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा Fri, 04/13/2018 - 08:43 नवीन
हो तुमचे बरोबर आहे. आणखी वाचले असता पुढील माहिती मिळाली:
Some people might argue that marijuana is not addictive, but scientific research indicates that's not entirely true. While marijuana is not physically addictive like alcohol or heroin, it can be psychologically addictive. Scientists call the psychological addiction to marijuana a “cannabis dependence disorder”.
धन्यवाद या माहितीबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अर्धवटराव गुरुवार, 04/12/2018 - 13:25 नवीन
कुठलेही द्रव्य सेवन करून शरीर व मेंदू गहाण टाकणे हे केव्हाही वाईटच.
पर्फेक्ट. लाखो वर्षे लागली मानवाचं शरीर/मेंदु इव्होल्व व्हायला. त्याची अशी माते करणं कधिही समर्थनीय नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
A
arunjoshi123 गुरुवार, 04/12/2018 - 14:08 नवीन
कुठलेही द्रव्य सेवन करून शरीर व मेंदू गहाण टाकणे हे केव्हाही वाईटच.
एकदम बराबर बोले हो गोडसे साहब. ============================== व्यसन कदाचित मानवतेचा अविभाज्य अंग असावं. पण व्यसनी लोक कमीत कमी असावेत. या गोष्टींचे नियमन करणारी केंद्रीय रेग्यूलेटरी बॉडी असावी. ======================== व्यसनाधिनतेला कोणत्याही हालतीत कायदेशीरपणाचे वा नैतिकतेचे अधिष्ठान देऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ज
जेम्स वांड गुरुवार, 04/12/2018 - 14:27 नवीन
तुम्ही जे म्हणताय न
या गोष्टींचे नियमन करणारी केंद्रीय रेग्यूलेटरी बॉडी असावी.
तेच बहुदा धागलेखक म्हणत असावेत, गांजा इललीगल म्हणून फुकणारे थांबत नाहीत. जे खकाने होऊन वाया गेलेत त्यांना पाहून काही कवळी मंडळी प्रयोग करायला जातात अन मातेरे करून घेतात, त्यापेक्षा लीगल असलेलं बरं, सिगरेटच्या पाकिटावर जसे कॅन्सरग्रस्त मंडळींचे फोटो असतात तसे गांजाच्या पुडीवर (होत असल्यास) मेंदूवर होणारे परिणाम दाखवणारा सिटी स्कॅन वगैरे छापावेत, ज्याला ओढून मरायचं आहे त्याला ओढू देत मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
सुबोध खरे Fri, 04/13/2018 - 06:20 नवीन
त्यापेक्षा लीगल असलेलं बरं, सिगरेटच्या पाकिटावर जसे कॅन्सरग्रस्त मंडळींचे फोटो असतात तसे गांजाच्या पुडीवर (होत असल्यास) मेंदूवर होणारे परिणाम दाखवणारा सिटी स्कॅन वगैरे छापावेत, ज्याला ओढून मरायचं आहे त्याला ओढू देत मग. गांजा ओढल्याने झालेल्या आजारावर सरकारने (फुकट) इलाज करावा कि नाही याबद्दल आपले काय मत आहे? तसंच गर्द, हेरॉईन, कोकेन पण ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी घ्यावं आणि मरावं. कुटुंबाची धूळधाण झाली तर करू द्यावी आणि हेल्मेटची सक्ती का करावी? लोकांना डोकं फोडून घेऊन मरायचं असेल तर मरू द्यावं याबद्दल आपले काय मत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Fri, 04/13/2018 - 06:40 नवीन
आमची मते काहीही असो, ती चुकीचीच आहेत अन तुम्ही म्हणताय तितकेच काय ते बरोबर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, चहाचे व्यसन लागू शकते का हो डॉक्टर साहेब?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 04/13/2018 - 07:07 नवीन
व्यसन कुठलंही वाईटच मग ते चहाचं असो किंवा आत्मस्तुतीचं असो बाकी गांजा ओढल्याने झालेल्या आजारावर सरकारने (फुकट) इलाज करावा कि नाही याबद्दल आपले काय मत आहे? तसंच गर्द, हेरॉईन, कोकेन पण ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी घ्यावं आणि मरावं. कुटुंबाची धूळधाण झाली तर करू द्यावी याबद्दल आपला म्हणणं काय ते हि समजू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Fri, 04/13/2018 - 09:58 नवीन
कायदेशीर केले तर ते सज्ञान लोकांसाठीच करणार सरकार, त्यामुळे ज्याला जसे मरायचे आहे (गांजा पिऊन, चरस अफू ओढून ) त्याचे ते त्याने स्वतः ठरवावे बरंका डॉक्टर साहेब. नशा करायचं स्वातंत्र्य तितकं द्यावं, किंबहुना इतरांच्या स्वातंत्र्यात बाधा आणल्यास नशेडी मंडळींस कडक शासनही करावं, एरवी तुम्ही लीगल करा की करू नका गांजा विक्री होणारच आहे, लीगल करून रेग्युलेट केल्याने झाला तर फायदाच होईल असे वाटते, पण म्हणून सरकारने त्यातून होणाऱ्या इफेक्ट वर काही करू नये, नशा करा त्याचं स्वातंत्र्य आहे, परिणाम भोगा स्वतः त्यात सरकारने काही करावे ही अपेक्षा करू नये. बाकी आत्मस्तुतीवर (माझेच खरे) साहेब बोलणे म्हणजे उत्तम विनोदबुद्धी असल्याचं निदर्शक आहे!, लगे रहो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 04/13/2018 - 15:02 नवीन
नशा करा त्याचं स्वातंत्र्य आहे, परिणाम भोगा स्वतः त्यात सरकारने काही करावे ही अपेक्षा करू नये. नशेमुळे, विषारी दारूमुळे माणसं मरतात त्यांच्या निष्पाप बायका मुलांना सरकारने काही मदत करावी का वाऱ्यावर सोडून द्यावे? कां विषारी दारू स्वस्त मिळते म्हणून लोक पितात त्यात सरकारची चूक काहीच नाही. तसंच शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल आपलं काय म्हणणं आहे? म्हणजे अवर्षण अवकाळी पाऊस सुद्धा काय सरकारने आणलेला नसतो. (कृपया पक्षीय राजकारण बाजूला ठेवा केवळ मानवतावादी विचार करा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Fri, 04/13/2018 - 16:36 नवीन
शेतकाऱ्यांवरची मते इथे मांडली तर लैच धुरळा उठेल, ते नंतर कधीतरी प्रसंगोत्पात मांडतो. वरती तुमचा एक प्रतिसाद म्हणतोय त्या प्रमाणे पूर्ण स्वातंत्र्य स्वैराचारकडे झुकते त्यामुळे थोडीफार बंधने हवीतच. मी नेमकं तेच म्हणतोय, स्वैरपणे गांजाचा व्यापारउदीम सुरुये त्याला कडक सरकारी बंधने घाला, मिळणे दुरापास्त करा, त्यातूनही ज्याला खाज आहे तो घेऊन ओढो अन आपली कर्मफळ भोगो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पैसा Fri, 04/13/2018 - 17:39 नवीन
आज गांजाची दुकाने उघड नसतात, ते बेकायदा आहे म्हणून बरीच सरळ मार्गी मुले त्याच्या वाटेला न जाणारी असतात. बंधने घालून कायद्यात आणले तर पिअर प्रेशर म्हणा, इतर काही कारणाने त्याचे सेवन करण्याचे प्रमाण निश्चित वाढेल. पैशासाठी लहान मुलांनाही गांजा विकायला लोक कमी करणार नाहीत. विकत घेणाऱ्या पोराचे आधार कार्ड थोडेच कोणी तपासेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Sat, 04/14/2018 - 03:23 नवीन
कायदेशीर असतात भर बाजारात गावाच्या मधोमध सुद्धा सापडतात, किती पियर प्रेशर वाढलेलं आढळून आलंय पोरांवर (सरळमार्गी पोरांवर) किंवा किती वाढलं आहे प्रमाण दारुबाजी करायचं? वाढलंही असेल तर त्याला फक्त गावात असलेलं दुकान किती टक्के जबाबदार आहे अन फिल्मी प्रभाव, नक्की पियर प्रेशर कश्याने वाढते, हे तुम्ही आकड्यात सांगू शकाल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 04/14/2018 - 05:59 नवीन
पण अन्य एका प्रतिसादात डॉ खरे म्हणतात की गुटख्यावर बंदी घातल्यानंतर त्याचे सेवन ५३% कमी झाले. तेच इथेही लागू असायला हरकत नाही. कायदेशीर रित्या उपलब्धता हा जर परिणाम करणारा घटक असेल तर गांजा सेवन त्यामुळे ५ ते १०% वाढणार असेल तरी भयावह आहे. चरस कोकेन सगळी गांजाची पिलावळ असेल तर नक्की काय कायदेशीर करणार? अनेक सरकारी योजना कागदोपत्री उत्तम असतात, अंमल बजावणी करताना त्यांचे भरीत होते. आपण खूप अपरिपक्व लोक आहोत. परिणामांची जबाबदारी लोकांवर टाकणं आपल्याकडे अजिबात शक्य नाही. त्यामुळे आहेत ते निर्बंध उठवण्यापेक्षा तंबाखू सुद्धा सहज मिळणे दुरापास्त व्हावे अशी मागणी का करू नये? गांजा सेवन regulate म्हणजे काय करणार? पैसे सरकारला मिळणार नाहीत. नुसता डाटा कसाही मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
स
सुबोध खरे Sat, 04/14/2018 - 06:38 नवीन
वांड साहेब सहज उपलब्धता आणि व्यसने यांचा अतिशय जवळचा संबंध आहे हे असंख्य संशोधनांती सिद्ध झालेले आहे. मुळात ते सहज उपलब्ध आहे आणि कायदेशीर याचा अर्थच त्यात काही वाईट नाही असा संदेश तरुणांना मिळतो. यामुळेच वैद्यकीय शास्त्रज्ञ केवळ चरस गांजाच नव्हे तर तंबाखूच्या सर्व उत्पादनावर बंदी आणा असेच जगभर सांगत आहेत. गांजा चरस कोकेन अफू हेरॉईन इ अत्यंत घातक व्यसने( तंबाखू पेक्षा नक्कीच जास्त) आहेत. पण तंबाखू जितक्याजास्त प्रमाणात आणि जितक्या जास्त संख्येने सेवन केला जातो त्या परिमाणामुळे त्याची व्यापकता/ भयानकता वाढली आहे. त्याचे उत्पादन नियंत्रित करणे जास्त सोपे आहे.म्हणून सरकार त्याच्यावर नियंत्रण आणू शकते. दुर्दैवाने तंबाखूची स्थिती वेगळी आहे. सरकार लोकानुनय करणारे अनेक निर्णय घेत असते जे अंतिमतः समाजाच्या हिताचे नसतात. यात विडीवरील कर न वाढवणे आहे. तंबाखूच्या उत्पादन विक्री आणि विपणना( जाहिराती)तून सरकारला भरपूर उत्पन्न मिळते. त्यातून तंबाखूची लॉबी हि फार सशक्त आहे आणि त्यांचे सरकारातील लागेबांधे फार खोल, दूरवर आणि उन्मूलन न करता येण्यासारखे आहेत. शिवाय तंबाखूच्या उत्पादनात वितरणात शेतकरी, शेतमजूर, विडीकामगार, पानवाले इ बरयाच लोकांना रोजगार मिळतो त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे. कोणतेही सरकार इतका दूरगामी विचार करून काम करीत नाही. प्रत्येक पक्ष आपल्याला ५ वर्षे काम करायचे आहे आणि परत पुढची निवडणूक लढवायची आहे एवढाच विचार करते. (असे दूरगामी काम केले असते तर आपली लोकसंख्या १० कोटीच्या वर गेली नसती) असो तात्पर्य -- सहज उपलब्धता हे एक व्यसनाधीनतेचे फार महत्त्वाचे कारण आहे. आपल्याला रस असेल तर खालील दोन दुवे वाचून पहा. In unadjusted city-stratified Cox proportional hazard models, perceived accessibility increased the risk for smoking initiation among nonsmokers and regular smoking among all participants in a dose-response fashion. Perceived accessibility also increased the risk for smoking progression among initiators in a dose-response fashion. The associations between perceived accessibility and smoking were robust to adjustment for peer and parental smoking. Youths with both perceived accessibility and peer-smokers had a higher risk of regular smoking and progression after initiation than either factor alone. These associations were stable to adjustment for potential confounders other than peer smoking. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2478499/ https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/i-was-the-terrorist-in-the-family/articleshow/61898038.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
स
सुबोध खरे Sat, 04/14/2018 - 06:51 नवीन
हा दुसरा दुवा सर्वानी जरूर उघडून पाहावा अशी कळकळीची विनंती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रसाद गोडबोले Sat, 04/14/2018 - 06:51 नवीन
आपली ह्या विषयावर आधीही चर्चा झाली तस्मात जास्त काही न बोलता केवळ खालील एक प्रश्न विचारत आहे > गांजा चरस कोकेन अफू हेरॉईन इ अत्यंत घातक व्यसने( तंबाखू पेक्षा नक्कीच जास्त) आहेत. ह्या विधानाला काहीतरी सबळ आणि विश्वासार्ह सांख्यिकिय आधार द्यावा . सांख्यिकिय आधार नसल्यास " हे केवळ वैयक्तिक मत आहे" इतके तरी मान्य करावे . कारण तुर्तास आम्हाला उपलब्ध असलेल्या माहीती नुसार गांजा हा नक्कीच अल्कोहोल आणि तंबाखुच्या तुलनेत अत्यल्प हानिकारक आहे, शिवाय गांच्या अतिसेवनामुळे मृतु झाल्याचे एकही उदाहरण ( किमान अमेरिकेत तरी) नाही ! विकिपेडीया संदर्भासह खालील चार्ट देतो : Image removed. संदर्भ : Nutt, D; King, LA; Saulsbury, W; Blakemore, C (24 March 2007). "Development of a rational scale to assess the harm of drugs of potential misuse". Lancet. 369 (9566): 1047–53. doi:10.1016/s0140-6736(07)60464-4. PMID 17382831. अवांतर : हा काही आस्तिकनास्तिक धागा नाही आणि आम्ही चणेवालेही नाही तस्मात आपण सबळ पुरावा दिल्यास आम्हाला आमची मते बदलण्यात कमीपणा वाटणार नाही असे विनम्रतेने नमुद करत आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 04/14/2018 - 10:36 नवीन
गांजा चरस कोकेन अफू हेरॉईन इ अत्यंत घातक व्यसने( तंबाखू पेक्षा नक्कीच जास्त) आहेत. यात कोकेन अफू हेरॉईन हे तर तंबाखू पेक्षा जास्त घातक आहेतच. गांजा /चरस/ हे एकाच झाडाचे असल्याने दोघांचा परिणाम एकच आहे. एकटे पाहिले (STANDALONE ) तर गांजा चरस याच्यावर तंबाखू पेक्षा कमी अवलंबित्व (DEPENDANCE OR ADDICTION POTENTIAL) आहे म्हणजे सोडल्यावर होणार त्रास किंवा सोडण्यात येणारे अडथळे नक्कीच कमी आहेत किंवा प्रत्यक्ष तंबाखू पेक्षा चरस/ गांजाने शारीरिक इजा( PHYSICAL DAMAGE/HARM) सुद्धा नक्कीच कमी होते यात अजिबात शंका नाही. परंतु खाली मीच दिलेल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे जसा जसा काळ जातो तशी चरसमुळे येणारी नशा कमी होत जाते. त्यामुळे एक तर चरसचे प्रमाण वाढवावे लागते ज्या ऐवजी बहुसंख्य लोक दुसऱ्या मोठ्या व्यसनाच्या आहारी जातात.
आज कुछ तुफानी करते है
करायला जातात आणि कायमचे व्यसनाच्या विळख्यात अडकतात. दुर्दैवाने अशी द्रव्ये सेवन करणारे किंवा अशी द्रव्ये विकणारे दलाल पण तेच किंवा त्यांच्याच संपर्कात असल्याने या पायऱ्या चढणे फारच सोपे असते. आणि मग हे लोक कोकेन हेरॉईन सारख्या जास्त किक देणाऱ्या आणि मग तीच किक पार्श्वभागावर मारणाऱ्या व्यसनात जातात जेथून कायमचे परत येणारे फार म्हणजे फारच कमी असतात( फार तर १ %) केवळ गांजा किंवा चरस हा तंबाखू इतका अपायकारक नसेल परंतु तंबाखूमुळे तुमचे "व्यक्तिमत्व"(personality) आणि तुमची "कामगिरी"(performance) बदलत नाही. तंबाखू मुले माणूस "ट्रान्स" मध्ये जात नाही. (माझी न मी राहिले अशी स्थिती होत नाही) अगदी चेन स्मोकर असेल तरीही यंत्र गाडी चालवणे किंवा धोकादायक ठिकाणी (उदा. ट्रेकला) गेल्यावर स्वतःला आणि दुसऱ्याला इजा करण्याची शक्यता हि कोणतेच व्यसन नसणाऱ्या माणसाइतकीच असते. ( पॅसिव्ह स्मोकिंगचा दुसऱ्याला धोका सोडला तर) अशी स्थिती चरस किंवा गांजा ची ( दारूची सुद्धा नाही). बँक किंवा कार्यालयातील रखवालदारापासून पोलीस किंवा सैनिक याना चरस किंवा गांजा पिऊन बंदूक सांभाळणे अशक्य आहे. हि स्थिती तंबाखूची नाही. एखादा सैनिक गांजेकस असेल तर त्याला व्यसनातून सोडवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले तर लष्करातून अशा माणसाला सक्तीने निवृत्त केले जाते.(हीच स्थिती दारूचीसुद्धा आहे). पण हि स्थिती तंबाखूची नाही. केवळ लॅन्सेटच्या अभ्यास कागदातून येणारा निष्कर्ष घेऊन आपल्याला चरस किंवा गांजा सारख्या अमली पदार्थावरील बंदी उठवणे हा आत्मघात ठरेल. सहा इंचाचे फुरसे "एवढेसे गोंडस तर आहे" म्हणून त्यावर विश्वास ठेवून ते घरात पाळणे जितके धोकादायक आहे. मी जे लिहिले आहे ते तुम्हाला पटले नाही तर ते माझे वैयक्तिक मत आहे असे समजून सोडून द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
मार्मिक गोडसे Sat, 04/14/2018 - 13:38 नवीन
सहा इंचाचे फुरसे "एवढेसे गोंडस तर आहे" म्हणून त्यावर विश्वास ठेवून ते घरात पाळणे जितके धोकादायक आहे. परफेक्ट. साप म्हणू नये धाकला आणि गांजा म्हणू नये आपला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रसाद गोडबोले Mon, 04/16/2018 - 01:17 नवीन
त्यामुळे एक तर चरसचे प्रमाण वाढवावे लागते ज्या ऐवजी बहुसंख्य लोक दुसऱ्या मोठ्या व्यसनाच्या आहारी जातात.
ह्या विधानालाही काहीही सांख्यिकिय आधार उपलब्ध्द नाहीये ! मी जे लिहिले आहे ते तुम्हाला पटले नाही तर ते माझे वैयक्तिक मत आहे असे समजून सोडून द्या येस सर ! आपल्या वैयक्तिक मताचा आदर आहे आणि त्या मताला तुर्तास तरी कोणताही वैज्ञानिक आधार , सबळ पुरावा नाही , जोवर दुष्परिणाम पुराव्याने शाबित होत नाही तोवर गांजा हे एक निरुपद्रवी पासटाईम आहे आणि तंबाखु आणि अल्कोहोल्च्या तुलनेत तर नक्कीच कमि हानिकारक आहे ! आणि म्हणुनच ते डिक्रिमिनलाईझ करावे असे माझे मत आहे ! आणि त्याच्यावर आधिकाधिक प्रयोग आणि संशोधन व्हावे ! प्रयोग करुन टी.एच.सी आणि सी.बी.डी. चे ऑप्टिमल प्रमाण शोधुन काढावे . रच्याकने ____/\____
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
त
तिमा Sat, 04/14/2018 - 13:21 नवीन
शिवाजी महाराजांबद्दल लिहिताना कधीही छ. असे आधी लिहू नये. नाहीतर तुमचा छिंदम होईल!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
द
दीपक११७७ गुरुवार, 04/12/2018 - 11:29 नवीन
जर गांजा विक्रि अधिकृत केली तर, त्या वर जिएसटी किती टक्के असावा? टक्क्याचा विचार करतांना गांजा हा अत्यंत गरीब व्यक्तीही घेतो हे ध्यानात ठेवावे Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 04/16/2018 - 01:37 नवीन
शुन्य टक्के ! कमर्शियल लेव्हल ला उत्पादन आणि विक्री करु देवु नये , विक्री करताना कोणी सापडला तर त्याचे प्रॉडक्ट सरकार ने जप्त करावे आणि सरकार मान्य दुकानातुन विकावे ! पण उगाच जी.एस.टी सारख्या नसत्या उठाठेवी नसाव्यात कारण शेवटी हे शेतीतील उत्पन्न आहे ! ज्याला हौस आहे त्याला वैयक्तिक जास्तीतजास्त १ झाड लावायची परवानगी असावी. तुळशी वृंदावन असते तसे एक गांजा वृंदावन असावे . आणि रोज आपले एखाद दुसरे पान "खावे" ज्याने त्याने ! बदल हवा असेल म्हणाजे सटाईव्हा च्या ऐवजी इन्डिका किंव्वा हायब्रिड स्ट्रेन्स वगैरे तर स्मॉल स्केलवर कम्युनिटी करुन छोटेसे गार्डन मेंटेन करावे ( अर्थात प्रत्येकी एक झाड हा नियम न मोडता ) :) दररोज मोजुन एकच पान खाणार्‍याला काही मेजर दुष्परिणाम होतील असे वाटत नाही . ( कारण मुळातच दुष्परिणाम होतात ह्याला कोणाताच सबळ पुरावा नाहीये !) कन्ट्रोल्ड कंझम्शमन इज की टू ह्यॅप्पीनेस !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
म
मराठी कथालेखक गुरुवार, 04/12/2018 - 13:02 नवीन
मला गांजाचा अनुभव नाही पण कुतुहल आहे. जसे दारु बद्दल म्हणता येईल की - साधारण ६० च्या एका पेग नंतर (व्हिस्की) डोक जरा हलकं वाटत.. छान /प्रसन्न वाटतं.. दोन तीन पेग झाले की की पावले , जीभ अडखळू लागतात.. पण जसं जसं अन्न पोटात जाईल तसतसं पुन्हा जीभेवर , अडखळणार्‍या पावलांवर नियंत्रण येतं.. रात्री घेतल्यावर कधी दुसरे दिवशी डोके दुखणे, मळमळ्णे ई हँग ओव्हर होतं. अशा नशेत गाडी चालवणे वा दुसरी महत्वाची कामे करणे धोक्याचे असते. तर सिगरेटमुळे असे काही परिणाम होत नाही..जसे अडखळणे वगैरे .. त्यामुळे सिगरेट ओढून वाहन चालवण्यात काही धोका नसतो. तसं गांजाबद्दल काय सांगता येईल ? वर कुणी स्लो मोशन वगैरे म्हंटल आहे त्यावरुन मेंदूवर परिणाम होवून वाहन चालवणं धोक्याचं असेल असं वाटतं पण तरी अधिक विस्ताराने कुणी सांगू शकेल काय ?
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 04/12/2018 - 14:21 नवीन
वर कुणी स्लो मोशन वगैरे म्हंटल आहे त्यावरुन मेंदूवर परिणाम होवून वाहन चालवणं धोक्याचं असेल असं वाटतं गाडीच्या आरशावर सुरक्षा सूचना असते "Obects in mirror are closer than they appear" सवयीने अंदाज येऊ लागतो तसंच काहीतरी असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
ख
खिलजि गुरुवार, 04/12/2018 - 14:06 नवीन
भांगेचा अनुभव आम्ही कॉलेजला असताना ,, आमच्या ग्रुपमध्ये मोनीश अमृते नावाचा मुलगा होता .. हिंदू कॉलनीत राहायचा .. बाबा नव्हते त्याला ... आमचे त्याच्या घरी येईन जाणे असायचे .. त्याची आईही फार प्रेमळ होती ... कधी घरी आम्ही गेलो तर मस्त खाण्यापिण्याची रेलचेल असायची ... मोनीश मस्तीमध्ये /अभ्यासातही खूप हुशार असल्याने जवळजवळ ताईत होता सर्व ग्रुपचा .. एकदा रंगपंचमीला आम्ही कॉलेजमध्येच जमायचे ठरवले होते ... तिथून कुणीतरी खुळचट कल्पना काढली कि आपण भंगपण प्यायचे ... थोडा अनुभव घ्यायला काय हरकत आहे ... झालं .. सर्व तयारी झाली .. यथेच्छ रंगपंचमीचा कार्यक्रम आटोपल्यावर आम्ही जमलो ... तिथेच रस्त्यावर भंगप्रश्न सुरु झाले .. मी आणि इतर काही मित्रांनी जरा बेतानेच दबकत दबकत स्वाद घेतला ... आमची गाडी रुळावर होती ... दोन एक ग्लास रिचवल्यावर आम्ही नाद सोडून दिला .. पण आमचे मोनीश भाऊ काही ऐकायलाच तयार नव्हते .. चालू होती सुस्साट गाडी ... आणि अचानक त्याला किक बसली ... तो बसल्या जागीच वेड्यासारखा बडबडायला लागला .. रास्ता वाकडा होतोय ... पकड .. पकड मला .. आम्हाला सुरुवातीला वाटलं कि हा साला टाईमपास करतोय .. च्यामारी पंधरावीस मिनिट होऊन गेली तरी याची गाडी काही रुळावर येईना ... कितीही झालं तरी आम्ही त्यावेळी जुनिअर कॉलेजातले .. बाजूलाच सिनिअर लोकांचा प्लॅन चालला होता .. त्यात आम्ही जरा अननुभवी .. म्हंटल त्यांची मदत घ्यावी ..म्हणून मदत घ्यायला गेलो ... ते लोकही धावून आले .. पण हे भाऊ काय ऐकायलाच तयार नाहीत .. रस्ता वाकडा होतोय .. धाव धाव .. इकडे तिकडे नुसती पळापळ चाललीय .. काय करायचे तेच कोणालाच काहीच सुचत नव्हते .. सरळ आम्ही त्याला उचलला आणि थेट घरी घेऊन गेलो .. पायऱ्या चढताना पण तेच चाललेलं साहेबांचं ... मला चांगलं आठवतंय त्याच्या घरच्यांसमोर आमचा पुरा पंचनामा झाला होता .. त्याची आई काही सोडायला तयार नव्हती आम्हाला .. दोष आम्हालाच देत होती ... मी तर त्या प्रकरणाचा एव्हढा धसका घेतला कि काही विचारू नका .... हे साहेब नंतर चार दिवसांनी कॉलेजात उगवले .. तेव्हा खूप दिवस चर्चेचा विषय होते .. सर्व पोरी एकदम वाघ मारल्यावानी त्याला बघायच्या नि हसायच्या .... गांजा प्रकरण हे सर्व धंदे कॉलेजात केलेले बरं का ...आता नाही ... कॉलेजात आम्ही एकदा गांजाचा अनुभव घ्यायचा ठरवलं .. उदानी नावाच्या मित्राने सर्व तरतूद फ्रीमध्ये केलेली होती ... चिलीम आणि इतर ... कुठेतरी एक फक्त पडीक जागा बघायची आणि ठोकायची .. सर्व बालगोपाल उत्सुक होते .. तशी सिगारेट जवळचीच होती त्यामुळे हे प्रकरण काही अवघड जाणार नाही याची खात्री होती ... तर आम्ही सारे जमलो ... तो सुट्टा ठोकण्यासाठी ... कधी एकदा ठोकतोय असं झालं होत ... चला सुरुवात झाली उदानीपासून .. तो आधीच सारीत होता .. चिलीम सुलगावली आणि थेट आत .. डोळे गच्चं मिटून एखाद्या ध्यानस्थ संन्याश्यावानी त्याचा थाटमाट होता .. एकेक करत फिरत माझ्यापाशी आली .. मी कसे प्यायचे ते त्यालाच विचारले ... तो फक्त एव्हढेच बोलला कि "" बम भोले बोल और सीन फैलाके जोरदार खिच "" .. झालं .. अशी ओढली कि काही इचारू नका ... बस्स .. तेव्हढाच पुरेसा होत नंतरच्यांसाठी .. मला काहीच बोलता येत नव्हतं .. नाकातोंडातून धूर आणि धूर ... आत छातीत काहीतरी ढवळून ढवळून बाहेर येतंय असं वाटत होत ... जवळजवळ दोनएक मिनिट तरी धूर बाहेर येण्याचा कार्यक्रम चालला होता.. मग मात्र बाकीचे धास्तावले ... उदानी असं काही हसत होता कि काय इचारू नका ... नंतर मात्र एक विचित्र ग्लानी येत होतीआणि ती जवळजवळ प्रॅक्टिकल संपेपर्यंत येताच होती ... प्रॅक्टिकल झाल्यानंतरही तिचा प्रभाव कायम होता .. एक विचित्र कंटाळा .. कशातच काडीचाही रस नव्हता .. सर्व साले उगाच धावपळ करतायत असं वाटत होत ... एकेकाच्या पेकाटात लाथ मारून त्यांना थोडं गप्प बसवावंसं वाटत होत .. पण लाथ मारणार कोण ? पाय उचलायचाही त्राण नव्हतं .. साल पाय उचलून लाथ मारायला कोणातरी भाड्याने विकत घ्यावंसं वाटत होत .. कि बाबा ये .. हा माझा पाय उचल आणि घाल एकेकाच्या पेकाटतात ... हाण त्याच्या मायला एकेकाला .. असा काहीसा प्रकार होता .. गांजानंतर ... एकंदरीत सर्वात घाणेरडा प्रकार गांजाचा तो म्हणजे त्याचा गलिच्छ वास .. सालं कोलगेट पाण्यात मिसळून सरबत करून जरी गुळण्या केल्या तरी त्याचा वास काही तासांपर्यंत दरवळत राहतो ... तर असं हे प्रकरण आहे एकंदरीत .. याला कायदेशीर मान्यता दिली तर दुसरं काही होनार नाही पण एक मात्र नक्की होईल ...कि जे गांजा ओढणारे आहेत त्यांचा कामाचा ताण कमी होईल आणि घरच्यांचा वाढेल ... सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 04/12/2018 - 15:01 नवीन
तुमचा अनुभव विस्तृतपणे लिहिल्याबद्दल धन्यवाद. मी तंबाखू एकदाच चाखली होती. ऑफिसमधल्या एका मित्राने तंबाखू चुन्यासोबत मळून दिली.. जीभेवर थोडावेळ तंबाखू ठेवून तिचा रस पोटात गेल्याव्र फार विचित्र वाटलं. शरीरात उष्णता वाढली , डोकं दुखायला लागलं. पण तेच सिगारेटनी इतकं काही होत नाही... (काही वर्षांपुर्वी मी नियमितपणे दिवसाला पाच-सहा तरी सिगारेट्स ओढायचो)... म्हणजे सिगरेट ही तंबाखूची सौम्य आवृत्ती आहे असं म्हणता येईल. पण सिगरेटचा मेंदूवर फारसा परिणाम होत नाही वा नशा आणि त्याआधारे तणावाचे तात्पुरते विस्मरण असे होत नाही. थोडक्यात सिगरेट्ने माणूस वेगळ्या जगात जात नाही. दारुने तसा माणूस वेगळ्या जगात जातो आणी तणाव विसरतो. पण दारु चढायला अणि उतरायलाही बराच वेळ लागतो. आणि दारु पुर्ण चढलेली असताना साधे सरळ चालणेही कठीण होवून जाते .. वाहन चालवणे वगैरे तर अशक्यच गांजा किंवा तत्सम पदार्थ वापरुन असे काही नशेचे साधन बनवता येईल का की ज्याने मेंदूवर त्वरीत पण अगदी सौम्य परिणाम होईल.. चिंता/तणाव तात्पुरत्या विसरता येतील पण त्याचवेळी अगदी तोल सांभाळणेही कठीण झाले असे मात्र होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
ग
गामा पैलवान गुरुवार, 04/12/2018 - 16:18 नवीन
म.क., कमी दारू प्यायली की सौम्य परिणाम होतो. पण त्याने किक बसंत नाही. सांगायचा मुद्दा काये की मात्रा उत्तरोत्तर वाढवंत न्यायची अनिवार इच्छा होते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी_माणूस Fri, 04/13/2018 - 06:36 नवीन
मित्राचे नाव खरे असल्यास तसे करणे टाळा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/12/2018 - 15:51 नवीन
"बंटा"ची गोळी काय असते?
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Fri, 04/13/2018 - 06:41 नवीन
भांग, कंपाउंडेड, घोटलेली, अशी गोळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Fri, 04/13/2018 - 06:45 नवीन
<<<एक नगदी पिक जे शेतकर्‍यांना बरेचसे उत्पादन मिळवून देऊ शकते त्यापासून शेतकर्‍यांना वंचित ठेवले जाते.>> ==>> लखनौच्या आसपास अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची सरकारी कर्मचारी काय फरफट करतात याची द्रावक हकीकत ऐकली होती. लोकांच्या संसाराची राख रांगोळी करून गब्बरच करायचंय ना मग गांज्याची शेती करण्यापेक्षा सरकारने प्रत्येक शेतकऱ्याला दारू दुकानाचे लायसेन्स मोफत काढून द्या. कधीच आत्महत्या करायची वेळ येणार नाही. (उपरोधिक प्रतिक्रिया आहे)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 04/13/2018 - 07:04 नवीन
एक सुरस वैज्ञानिक सत्य चरस किंवा गांजाच्या जुन्या व्यसनामुळे amotivation syndrome नावाचा आजार होतो. याचे मूळ असे आहे. आपल्या मेंदूत चरसमधील द्रव्यांशी साधर्म्य असणारे संवेदक (endocannabinoid receptors) असतात. आपल्याला आनंद उल्हास आल्हाद वाटतो त्यावेळेस मेंदूत 2-Arachidonoylglycerol (2-AG) आणि anandamide हि द्रव्ये तयार होतात आणि हि द्रव्ये वरील संवेदकाना उद्दीपित करतात आणि आपल्याला वरील "सुंदर भावनांचा" अनुभव येतो. गंमत म्हणजे आपण जेंव्हा मलईयुक्त चरबीयुक्त पदार्थ खातो तेंव्हा पण मेंदूत याच द्रव्यांचा स्त्राव वाढतो यामुळे असे पदार्थ खाल्ले कि आपल्याला एक सुखद अशी गुंगी येते. म्हणून आपल्याला मलई, रबडी, बासुंदी, लोणी, तूप, चिकन तंदुरी, मटण, मिसळीवरील तर्री सारखे पदार्थ सारखे खावेसे वाटतात. याच संवेदकात अडथळा आणणारे एक द्रव्य रिमोनाबंट ( अकॉम्पलिया या नावाने) युरोपात लठ्ठपणावर औषध म्हणून बाजारात आले होते. यामुळे असे चरबीयुक्त पदार्थ पाहावेसे/खावेसे वाटणार नाहीत आणि त्याबद्दल नॉशिया येईल. दुर्दैवाने या औषधाचा दुष्परिणाम म्हणजे नैराश्य आणि आत्महत्येचे विचार असे असल्याने हे औषध बाजारातून परत काढून घेतले गेले. पण या अनुभवातून वैद्यकीय शास्त्रज्ञ एक महत्त्वाचा धडा शिकले ते म्हणजे आपले दैनंदिन जीवन सुख समाधानाने व्यतीत करण्यासाठी या संवेदकांचे काम व्यवस्थित चालू असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे आणि जेंव्हा हे संवेदक नीट काम करीत नाहीत तेंव्हा माणूस नैराश्य आत्महत्येचे विचार अशा आजारांची शिकार होतो. गांजेकस/ चरस पिणारे लोक असतात त्यांना सुरुवातीला चरस मधील THC या द्रव्याने असाच उच्च आणि उत्तुंग अनुभव येतो म्हणून ते परत परत चरस पीत राहतात. परंतु जसा काळ जातो तसा या संवेदकांची संवेदना बोथट होत जाते आणि त्या माणसाला असा परिणाम होण्यासाठी/उच्च आणि उत्तुंग अनुभव येण्यासाठी जास्तीत जास्त चरस/ गांजा प्यावा लागतो. आणि या संवेदकांची संवेदना बोथट झाल्यामुळेहे गांजेकस निरुत्साही औदासिन्य नैराश्यवादी आत्महत्येचे विचार या विकारांना बळी पडतात. या गांजेकसांचे आयुष्य म्हणजे केवळ गांजा पिऊन पडून राहणे एवढेच होऊन राहते. अर्थात अशी स्थिती बरेच दिवस गांजा पिणाऱ्यांची होते. सठी सहामासी पिणाऱ्यांच्यात अशी स्थिती होत नाही पण केवळ थ्रिल साठी परत परत चरस पिणाऱ्यांपैकी १५-१७ % टक्के लोक अंती अशा आजाराचे शिकार होतात. लोकांना नम्र विनंती आहे कि आपल्या चरस गांजा किंवा भांग यांच्या सेवनाच्या अनुभवांचे उदात्तीकरण करू नये कारण याचा संवेदनशील तरुणांच्या मनावर चुकीचा ठसा उमटू शकतो. सिगरेटच्या माचो जाहिरातींचा पडतो तसाच.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 04/13/2018 - 07:17 नवीन
<<<लोकांना नम्र विनंती आहे कि आपल्या चरस गांजा किंवा भांग यांच्या सेवनाच्या अनुभवांचे उदात्तीकरण करू नये कारण याचा संवेदनशील तरुणांच्या मनावर चुकीचा ठसा उमटू शकतो.>>> ==>> करोडो की बात ...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पुंबा Fri, 04/13/2018 - 08:44 नवीन
लोकांना नम्र विनंती आहे कि आपल्या चरस गांजा किंवा भांग यांच्या सेवनाच्या अनुभवांचे उदात्तीकरण करू नये कारण याचा संवेदनशील तरुणांच्या मनावर चुकीचा ठसा उमटू शकतो. सिगरेटच्या माचो जाहिरातींचा पडतो तसाच.
बेलाशक सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कपिलमुनी Fri, 04/13/2018 - 10:57 नवीन
डॉक्टरांनी माहितीपूर्ण प्रतिसाद दिला आहे . धन्यवाद डॉक्टर !! कोणत्याही अंमली पदार्थापासून दूर राहिले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
न
नाखु Sat, 04/14/2018 - 07:15 नवीन
अंमली धाग्यांपासून सुद्धा !!!!!! भेंडी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ग
गवि Fri, 04/13/2018 - 09:29 नवीन
ज्या पदार्थाच्या सेवनाने मानसिक अवस्थेत इतका जबरदस्त बदल होतो तो पदार्थ अपायकारक किंवा किमान मानसिकदृष्टया एडिक्टिव नसेल यावर विश्वास बसत नाही. डॉ. खरे यांच्या प्रतिसादांना सुप्परलाईक..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा