होय, मी वाट पाहतोय त्या दिवसाची.
होय, मी वाट पाहतोय त्या दिवसाची.
लहानपणी शाळेत ६वी 7वी इयत्तेत असताना (१९९६-९७) आम्हाला भूगोल विषय शिकवावयास एक बाई होत्या (त्याकाळी आम्ही बाईच म्हणायचो). शिकवताना नैसर्गिक साधन-संपत्ति याचा उल्लेख कुठे आला तर त्यांची काही ठरलेली वाक्य असायची ती वाक्य त्या आमच्या बधिर मडक्यात सोडली जायची. त्यांची दूरदृष्टि खरेच कौतुकास्पद होती.
ती वाक्य अशी
" नैसर्गिक साधन-संपत्ति (तेल, गैस आणि इतर खानिजे) ही मर्यादित आहे. तुमच्या पिढीने कितीही काळजीपूर्वक ती वापरली तरी नक्कीच एक दिवस ती संपणार आणि पुन्हा मानव जात आपल्या पारंपारिक शेतिकडे वळणार, कारण जगण्यासाठी दूसरा पर्यायच नसणार. पेट्रोलियम साठे व खानिजे संपले की मशीनरी ला तेल मिळणार नाही. उद्योग (धंदे नाही) बंद पडणार. गाड्या बंद पडणार, दळण-वळण साधने बिनकामी होणार. विज उत्पादन बंद होणार. बघा पुढील २०-३० वर्षत हळूहळू याचा 'प्रत्यय' तुम्हाला येइलच. पुन्हा एकदा या पृथ्वी वर सोन्याचे (सोनियाचे नाही) दिवस येतील" इत्यादी इत्यादी.....
लहान असल्या कारणाने यातले गाम्भीर्य तेव्हा उमजत नव्हते. (असे सर्व ऐकल्यानंतर आम्हा बालमनाला प्रश्न पडायचा की जर पुढे जावून आपणास शेतीच करायची आहे तर मग आपण शिकतोय कशासाठी?:))
जसजसे मोठे होत गेलो तसे या विषयीचे (मर्यादित साधन-संपत्ति) गाम्भीर्य समजत गेले आणि मग कधी कधी विचार करू लागलो की खरेच ही साधन-संपत्ति संपलीे तर येणारे दिवस कसे असतील?
तर हे सर्व आठवून लिहायचा मुळ उद्देश असा की
हल्लीच बहरीन या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात ऑइल आणि गैस चे साठे सापडले.
Link
https://m.economictimes.com/news/international/business/bahrain-announces-discovery-of-80-bn-barrels-of-oil/articleshow/63613297.सिम्स
तेथे पत्रकार परिषद घेवुन तशी घोषणाच करण्यात आली.
आणि पुन्हा एकदा त्या बाई आणि त्यांची वाक्य डोक्यात घोंगावु लागली.
खरेच ही साधन सम्पप्ती मर्यादित आहे का? आणि असेल तर मग ती नक्की कधी संपणार? अजुन किती काळ-वेळ लागेल ती संपावयास? कोणी सांगेल का मला? मिपा सदस्य, जाणकार यावर काही सांगू शकतील का? (अगदी भविष्य पाहणारे सुद्धा यावर आपले मत मांडू शकतात. हे चेष्टने नाही म्हणत आहे मी).
योगायोगाने ऑइल, गैस आणि पॉवर याच क्षेत्रात चाकरी करत असल्याने या विषयी कायम मनात द्विधा मनस्तिथि असते. कारण या जगात लहान मोठ्या अश्या हजारो कंपन्या आहेत की ज्या या क्षेत्रात कायम काम करत असतात. वर्ष्यातिल काही दिवस सोडले तर नेहमी नवनवीन प्रोजेक्ट्स वर तेथे काम केले जाते.
क्लाइंट कमीतकमी वेळेत आपला कारखाना उभा राहून उत्पादन कसे चालू करता येइल यावर भर देत असतात आणि ऑइल, गैस चे उत्पादन कसे जास्तीत जास्त घेता येइल याचे प्रयत्न केले जातात.
इतके सर्व असुनही अजुन तरी काही मला तो 'प्रत्यय' आलेला नाही.
म्हणूनच होय, मी वाट पाहतोय त्या दिवसाची.
खरेच ही साधन सम्पप्ती मर्यादित आहे का? आणि असेल तर मग ती नक्की कधी संपणार? अजुन किती काळ-वेळ लागेल ती संपावयास? कोणी सांगेल का मला?पृथ्वीच्या ४.५ बिलियन वर्षाच्या आयुष्यात तिचा प्रत्येक भूभाग अनेकदा लक्षावधी वर्षे पाण्याखाली गेला आहे आणि लक्षावधी वर्षे पाण्यावर आलेला आहे. त्यामुळे, सैद्धांतिकदृष्ट्या (theoretically) आणि व्यवहारातही सद्या पाण्याच्या वर किंवा खाली असलेल्या पृथ्वीच्या सर्व पृष्ठभागाखाली खनिज तेल आहे. थोडक्यात, पृथ्वीने तिच्या ४.५ बिलियन वर्षांच्या कालखंडात जमवलेले हे इंधन व्यावहारीक दृष्ट्या न संपणारे आहे. प्रश्न फक्त असा आहे की, "कोणत्या जागेवरचे तेल बाहेर काढणे व्यापारी दृष्ट्या आणि इतर कोणत्या परिस्थितीत फायदेशीर ठरेल ?" कच्च्या (क्रूड) तेलाचा भाव १९४६ पासून १९७५ पर्यंत $१.६३ पासून $४.७५ पर्यंत वाढला होता. नंतर तो वाढत जाऊन १९८४ ला $२८.७५ झाला. त्यावेळेस, शेल ऑईल एक्स्ट्रॅक्शन तंत्रज्ञान वापरून तेल काढणे करणे फायदेशीर ठरले असते. पण, १९८६ साली भाव $ १४.४४ इतका पडला (काही जणांच्या मते शेल ऑईल एक्स्ट्रॅक्शन आणि इतर तंत्रज्ञान वापरून तेल काढल्यास ओपेकचा दबदबा कमी होईल म्हणून तो मुद्दाम पाडला गेला. आणि त्यामुळे बिलियन्स खर्च करून शोधलेले तंत्रज्ञान व्यापारी दृष्ट्या तोट्याचे झाल्याने खरोखरच बासनात बांधून ठेवले गेले). नंतर भाव परत हळू हळू वाढत $८०-९० च्या पुढे गेल्यावर शेल ऑईल एक्स्ट्रॅक्शन (मुख्यतः कॅनडा) आणि हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग (मुख्यतः अमेरिका) या तंत्रज्ञानांनी तेल काढणे फायदेशीर झाले. त्यामुळे ओपेकच्या तेलाचे भाव $४०-५० इतके आले आणि त्याच्या आसपास राहिले आहेत. यामागे, अमेरिका-कॅनडा यांचे तेल उत्पादन जेवढे कारणीभूत आहे तेवढीच किंवा कांकणभर जास्तच ओपेकमधील दुफळीही (आणि त्यामुळे ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त तेल लपूनछपून उपसून जास्त पैसे कमावण्याची ओपेकमधील देशांची प्रवृत्ती) कारणीभूत आहे. तरीही, जोपर्यंत ओपेकचा तेलाचा भाव $३५ च्या खाली जात नाही तोपर्यंत नवे तंत्रज्ञान फायदेशीर असेल आणि त्यामुळे त्याला नजिकच्या काळात धोका होणार नाही असेच दिसते.