Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संताप

क — कुसुमिता१, Sat, 04/14/2018 - 22:36
नंदनवनातली ती कोवळी कळी.. ती खुडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुमच्या विखारी वासनेसाठी तिच्या देहाची लक्तर करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असाल धर्मद्वेष्टे तुम्ही.. तुमच्या धर्मांधतेसाठी तिचं आयुष्य कुस्करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? बाईच्याच पोटी जन्म घेतला ना? तुमच्या आई ची कूस अशी अपमानित करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असेल तुमचीही एखादी बहीण बांधली असेल मनगटावर राखी त्या राखीचे असे धिंडवडे काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? इतकं नीच अधम क्रुत्य करुन ही अजून श्र्वास चालू आहे तुमचा.. हा जगण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? वाद होतील..विवाद होतील..खटले चालतील.. शिक्षाही होईल.. इथं काय होईल ते होईल पण त्या परमेशाच्या दरबारात तुम्हाला कधीही क्षमा नाही.. कधीही नाही कधीच नाही...

प्रतिक्रिया द्या
1144 वाचन

💬 प्रतिसाद (2)
ए
एस Tue, 04/17/2018 - 00:54 नवीन
संताप पुरेपूर उतरला आहे. केवळ हेच एक नाही तर जेव्हा जेव्हा असहाय्य जीवांवर जेव्हा वासनांध अत्याचार करतात तेव्हा तेव्हा मन खवळून उठते.
  • Log in or register to post comments
क
कुसुमिता१ Tue, 04/17/2018 - 11:11 नवीन
धन्यवाद! खरच खूप संताप येतो आणि हतबल वाटत की आपण काहीच करू शकत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा