Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिणमिणता दिवा.

J — Jayant Naik, Fri, 04/20/2018 - 06:51
मिणमिणता दिवा .. मरगळलेल्या मनाला आशेची चाहूल लागली . कंटाळलेल्या वर्तमानाला भविष्याची पालवी फुटली. असाच कोणीतरी देवदूत पहाटे पहाटे समोर आला…. “तुला काही प्रश्न असतील तर उत्तरे मनात फुलवीन” म्हणाला . जीवनाचे रहस्य काय ?संघर्षाचे बीज काय ? आनंदाचे आणि वेदनेचे प्रयोजन काय ? श्री कृष्ण ,मोहम्मद आणि येशूचे साध्य काय ? त्यांना काय करायचे होते ? ते पूर्ण झाले काय ? मी हसलो ...तो गोंधळला …. म्हणाला ..”अरे वेड्या ..मी इथे न बोलवता आलो आहे ! तुला उत्तरे द्यायला ..आणि तू असा हसतोस काय ?” मी म्हणालो ...अरे प्रश्न माणसांचे ...त्यांनीच उत्तरे शोधायला हवीत ! उत्तरे शोधायला देवदूताला यावे लागले,इथेच .. देवाच्या योजनेत नक्की काही तरी चुकले प्रश्न माझ्या मनात असतील तर ..उत्तरेही असलीच पाहिजेत . फक्त शोधण्याची गरज आहे … देवदूताची इथे गरज कुठे आहे ? आता हसण्याची पाळी देवदूताची होती ...तो हसून म्हणाला , “ अरे सगळा गुंता इथेच तर आहे ! सगळा घोळ या मनाचा आहे…. मनाच्या बाहेर गेलास तर सारे काही स्वच्छ आहे ! हे जर तुला जमले तर तूच तुझा देवदूत ! “ देवदूताने आपले काम केले .. मनाच्या कोपऱ्यात एक मिणमिणता दिवा लावून गेला .. मार्गावर माझ्या ..प्रकाश आपोआप पडत गेला ... जयंत नाईक ***********************************************************************************************

प्रतिक्रिया द्या
1891 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
पैसा Fri, 04/20/2018 - 17:24 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Sat, 04/21/2018 - 10:25 नवीन
छान आहे . आवडेश एकदम येगळी . हटके सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 04/29/2018 - 10:25 नवीन
प्रश्न माझ्या मनात असतील तर ..उत्तरेही असलीच पाहिजेत . फक्त शोधण्याची गरज आहे … देवदूताची इथे गरज कुठे आहे ? आता हसण्याची पाळी देवदूताची होती ...तो हसून म्हणाला , “ अरे सगळा गुंता इथेच तर आहे ! सगळा घोळ या मनाचा आहे…. मनाच्या बाहेर गेलास तर सारे काही स्वच्छ आहे ! हे जर तुला जमले तर तूच तुझा देवदूत ! “ देवदूताने आपले काम केले .. मनाच्या कोपऱ्यात एक मिणमिणता दिवा लावून गेला .. मार्गावर माझ्या ..प्रकाश आपोआप पडत गेला ...
व्वा काय बाते , भारी !!
  • Log in or register to post comments
J
Jayant Naik Sun, 04/29/2018 - 13:52 नवीन
मला हा प्रश्न कायम पडलेला आहे कि एखाद्या प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे हे आपल्याला कसे समजते. आपले मन ते कशाशी पडताळून पाहते ? आपल्या स्मृतीत बर्याच वेळा हि माहिती नसते मग ते कश्याशी पडताळून पहिले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा