Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तिच्या कपाळावरचा घामाचा थेम्ब , ओघळून हळुवार हनुवटीपर्यंत आला

ख — खिलजि, Fri, 04/20/2018 - 12:54
तिच्या कपाळावरचा घामाचा थेम्ब ओघळून हळुवार हनुवटीपर्यंत आला आधीच फिल्डिंग लागली होती पण कॅच मी केला कित्येकांनी हाय खाल्ली बऱ्याच जणांनी माघार घेतली सर्वांदेखत चाटून पार फस्त केला गड्या , मी पहिला टप्पा पार केला ॥ दुसऱ्या टप्प्यात दाखल झालो मैत्रिणींच्या कळपात आलो दोन फारच जिवलग होत्या, तिच्या नकळत त्यांचा लाडका भाऊराया झालो बघता बघता सेमीला गेलो ॥ सेमीत गाठ होती तिच्या क्रूर भावांशी नीट खेळलो नाही तर जाणार होतो जीवानिशी एकुलती एक बहीण होती त्यांची शोधत होते शालीन अन संस्कारी मेव्हणा सुटाबुटात अस्साकाही सामोरा गेलो जणू आलाय बाहेरगावचा पाव्हणा अन अंतिम फेरीत दाखल झालो ॥ सर्व सैन्य आधीच झाले होते फितूर तरी विश्वास नव्हता, कारण तिचा बाप होता मोठा चतुर सर्व बोलणी व्यवस्थित पार पडली अचानक कुठेतरी एक माशी शिंकली माझीच जुनी प्रेयसी, तिची चुलत बहीण निघाली बापासमोरच माझी कुंडली मांडली जुन्या आठवणींनी आकाशपाताळ एक केले अंतिम फेरीत सैन्य पलटले शिव्याश्राप देऊन भरपूर बुकलले कप गेला मसनात , माझेच कंबरडे मोडले पुरे पुरे म्हणून हंबरडे फोडले डोळ्यासमोर साक्षात यमदेव आले कसं सांगू गड्या , या मॅचने माझे कायमचे पारणे फिटले ॥ {{{{{{{{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}}}}}}}}}}}

प्रतिक्रिया द्या
5216 वाचन

💬 प्रतिसाद (11)
ट
टवाळ कार्टा Fri, 04/20/2018 - 19:28 नवीन
ख्या ख्या ख्या
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 04/20/2018 - 21:59 नवीन
हात्तिच्या! मला वाटलं की गाडीसोबत स्टेपनी पण लाभणार! पण हा हन्त हन्त .... ! -गा.पै.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sat, 04/21/2018 - 07:05 नवीन
घामाचा थेंब चाटून फस्त केलात? Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sat, 04/21/2018 - 08:12 नवीन
कपाळावरचा घामाचा थेम्ब ओघळून तिचे नाक तोंड पार करून हनुवटीपर्यंत आला म्हणजे केव्हडा मोठा थेम्ब म्हणावा हा. बाय द वे, येऊ द्या अजून अशी विविध विषयावरची काव्ये. तुमच्या कविता वाचून खूपच हसायला येते. नायतर नेहमी फारच सिरीयस लिखाण/चर्चा चालू असतात मिपावर.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Sat, 04/21/2018 - 09:09 नवीन
तिच्या कपाळावरचा घामाचा थेम्ब ओघळून हळुवार हनुवटीपर्यंत आला सर्वांदेखत चाटून पार फस्त केला यावरुन प्रेम आंधळं, बहिरं(की मुकं माहित नाही) आणि अस्वच्छही असतं याची जाणीव झाली !
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Sat, 04/21/2018 - 10:13 नवीन
म्हणजे चार पावलं स्वर्गाकडे सरकलो . मित्रानो या धकाधकीच्या जीवनात निदान चार लोकांना जरी हसवलं ना तर मला वाटत आपण फार पुण्याचं काम करतोय . आजकाल लोक हसणेच विसरत चाललेयत. धन्यवाद माझ्या कल्पनेला अभिप्रायाचा प्रसाद दिल्याबद्दल. सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Sat, 04/21/2018 - 10:24 नवीन
अहो हि कल्पना आहे . आणि असं पण प्रेमात काहीही होतं . कुणी मार खातं तर कुणी थेम्ब पीतं . जेव्हा सगळं काही जुळून येतं तेव्हा आणि तेव्हाच प्रेम होतं सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Sat, 04/21/2018 - 10:36 नवीन
गंमतीने प्रतिसाद दिला . बाकी तुमच्या कविता व त्यवर दिलेले अभिप्राय वाचून नक्कीच हसायला येतं हे खरंय. लिहीत राहा आम्ही वाचत राहू. पुकप्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
ख
खिलजि Sat, 04/21/2018 - 10:40 नवीन
धन्यवाद सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Tue, 04/24/2018 - 05:39 नवीन
हा हा हा !!! मज्जा आली. ;-) फक्त घाम वगैरे चाटत जाउ नका. :-)
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 04/24/2018 - 09:47 नवीन
धन्यवाद दुर्गविहारी साहेब सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा