ताज्या घडामोडी - भाग ३०
स्वयंघोषित भोंदू गुरू आसारामबापूवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध होऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आसारामबापू ऑगस्ट २०१३ पासून तुरूंगात आहे. सध्या तो ७८ वर्षांचा आहे. या शिक्षेमुळे तुरूंगातच त्याची अखेर होणार हे नक्की. भारतात असे अनेक भोंदूबाबा आहेत. यांच्यामुळे हिंदू धर्माची बदनामी होत आहे. या सर्वांना पकडून अशीच शिक्षा मिळणे आवश्यक आहे. काही काळापूर्वी राम रहीम सिंग या भोंदूबाबाला सुद्धा शिक्षा झाली होती. परंतु अनेकजण अजून मोकळेच आहेत.
http://indianexpress.com/article/india/asaram-bapu-rape-case-verdict-live-updates-jodhpur-judgment-court-order-5150695/
आता हे धडधडीत फोटोशॉप केलेले ट्रोलिंग चालते का?ज्या काळात आसारामवर आरोप नव्हते त्या काळातील आसारामच्या एखाद्याच्या बरोबर असलेल्या चित्रफिती (चित्रफिती ख-या का खोट्या याविषयी खातरी नाही) व्हायरल करणे याला ट्रोलिंग म्हणता येईल का? काही दिवसांनी आसारामच्या बारश्याच्या घुग-या खातानाच्या एखाद्या नेत्याच्या चित्रफिती व्हायरल होतील.