पाककृती

ग्रिल्ड पॉम्फ्रेट इन लेमन गार्लिक बटर

Primary tabs

Main 1

साहित्य

३ ते ४ मध्यम आकाराचे पापलेट, अख्खे, साफ करून, चिरा मारून
१/२ वाटी अमूल बटर
१५ ते २० लसूण पाकळ्या
२ चमचे मीठ
२ चमचे काळीमिरी पावडर
१ चमचा मिक्स्ड हर्ब्स/ओरेगॅनो सीझनिंग
१ चमचा रेड चिल्ली फ्लेक्स
एका लिंबाचा रस
बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती

पापलेटला काळीमिरी आणि मीठ, आतून बाहेरून लावून साधारण १५ ते २० मिनिटे ठेवावे. तो पर्येंत लेमन गार्लिक बटर बनवून घेणे.

1   2

एका छोट्या कढईत, बटर घालावे. गॅस मंद ठेवून त्यात बारीक चिरलेला लसूण घालावा. मंद आचेवर लसणीचा छान वास सुटेस्तोवर हलवत राहावे (लसूण जळता कामा नये). लसूण शिजला, कि त्यात मिक्स्ड हेर्ब्स, चिल्ली फ्लेक्स घालून अजून १ ते २ मिनिटे बटर हलवून घेणे. गॅस बंद करून त्यात एका लिंबाचा रस घालावा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. मिश्रणाची चव घेऊन मीठ घालावे.

3 4 5

ग्रिल पॅन मोठ्या गॅस वर चांगला तापू द्यावा. ब्रश ने थोडंसं तेल लावून, पॅन वर पापलेट भाजायला घ्यावा. एका बाजूला साधारण ३ ते ५ मिनिटे भाजून मग पापलेट दुसऱ्या बाजूने भाजून घ्यावा.. दोन्ही बाजूने भाजून झाला कि वरून ब्रशने लेमन गार्लिक बटर दोन्ही बाजूने लावून गरम गरम पापलेट सलाड सोबत सर्वे करावा!
6  6

बटर, लसूण, आणि लिंबा मुळे एक अप्रतिम चव येते. अर्थातच पापलेट जितका ताजा तितकी जास्ती ह्याची मज्जा!

manguu@mail.com

आता माशाच्या आकाराचे वांगे शोधावे लागेल.

विशुमित

वांगी भेटली तर द्या वानवळा पाठवून..!

कपिलमुनी

प्रेझेंटेशन मध्ये तुम्हि जगातल्या टॉप शेफच्या तोडीचे आहात .

केडी

प्रोत्साहाना बद्दल आभारी आहे...
_/\_

विशुमित

खूप सहमत.
ते भाजलेले लिंबू बघा की.. कुठनं सुचते एवढे राव.!

श्वेता२४

पक्की शाकाहारी असले तरी ही पाककृती वाचायला व पाहायला आवडली

पिंगू

प्रेझेंटेशन दिमाखदार आहे. कोपर्‍यांवर स्मोकवलेले कांदा आणि लिंबू आवडले.

सोत्रि

बटर पार वितळून गेलंय, गार्लिक बटर साॅस क्रीमी असता तर झॅक झाले असते!

- (खवय्या) सोकाजी

केडी

साॅस क्रिमी कसा करायचा जरा सांगाल का?

सोत्रि

मंद आचेवर बटर क्युब्स घोळवत घोळवत मेल्ट करायचे.
‘मंद आच‘ हा की पाॅईंट आहे.

https://youtu.be/l9XtQ4bGb_s

https://youtu.be/84zkT4FIaOk

हे दोन व्हिडीयो रेफरंससाठी.

- (खवय्या) सोकाजी

कंजूस

नवनीत अवगुंठीत लसुण अन लिंबू चटणीतील फडफडीत पापलेट, मदनबाणा. पनीरच्या पापुद्र्यांत वांग्याचे काप घालून काम होईल.

वीणा३

मस्त रेसिपी. जबरदस्त सादरीकरण!!!
पनीरच्या पापुद्र्यांत वांग्याचे काप घालून
अरे देवा !!! :प :)