सालं, आज जीव कासावीस झालाय
सालं, आज जीव कासावीस झालाय
तिकडं अकरा कळ्यांचा विनाकारण बळी गेलाय
आज मी पण एक बाप आहे
पण खरं सांगू मित्रानो
या देशात बाप होणं , श्राप आहे
केलं असेल त्यांनीही त्यांच्या मुलांना टाटा बाय बाय
त्यांना थोडंच ठाऊक होतं
पुढे होणार आहे काय ?
त्या माउलींचा तीळतीळ तुटला असेल जीव
पण इथे कोणालाच पडली नाही आहे त्याची जाणीव
आजूबाजूच्या लोकांनी केली असेल चौकशी
आपली मुलं कुठे आणि आहेत कशी ?
जो तो आपापलं बघून सांत्वनाला गेला असेल
थोडा वेळ रडेल तिथं आणि परत कामाला लागेल
त्या मायबापाचे अश्रू असेच ओघळत राहतील
बाराव्यानंतरही आणि भरणीलाही
पुन्हा कुठे तरी अजून कळ्या खुरडल्या जातील
बातम्या अश्याच येत राहतील
बातम्या अश्याच येत राहतील
हि श्रद्धान्जली त्यांना नाही वाहत आहे मी देवा
हि तुला वाहतोय
थांबव हे सारं , थांबव
नाहीतर तुझंच श्राद्ध घालेन म्हणतोय
{{{सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}
💬 प्रतिसाद
(5)
प
पद्मावति
Fri, 04/27/2018 - 20:16
नवीन
फारच दुर्दैवी घटना
ड्राइवरने इयरफोन्स लावले होते. समोर ट्रेन बघून मुलं जिवाच्या आकांताने ओरडून त्याला सावध करत होती पण त्याला ऐकूच आले नाही :(
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Sat, 04/28/2018 - 06:51
नवीन
शब्दच नाहीत
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 04/28/2018 - 08:36
नवीन
:(
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Tue, 05/01/2018 - 07:47
नवीन
चटका लावणारी कविता. असेच सकस लिखाण येउ देत.
- Log in or register to post comments
ख
खिलजि
Wed, 05/02/2018 - 09:32
नवीन
धन्यवाद
सिद्धेश्वर विलास पाटणकर
- Log in or register to post comments