तप्त झाली धारा सारी , दहाही दिशा त्या पेटल्या
तप्त झाली धरा सारी
दहाही दिशा त्या पेटल्या
दिनकराशी हात मिळवुनी
उग्र होऊनि परतल्या ॥
मरूत व्यस्त, घाले गस्त
थैमान चहूकडे माजले
पशु, प्राणी, झाडे, पक्षी
नद्या नाले भाजले ॥
रुक्ष झाले वृक्ष सारे
सावलीपण महाग ती
यत्र तत्र वणवा पेटला
स्वस्त झाली आग ती ॥
कोपला तो, झोपला तो
भक्ती कमी जी जाहली
मोह मायेत प्राण सारे
म्हणुनी झाली काहिली ॥
{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}
💬 प्रतिसाद
(3)
प
पद्मावति
Tue, 05/01/2018 - 09:53
नवीन
कविता आवडली.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Tue, 05/01/2018 - 12:40
नवीन
छान लिहिली आहे
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
ख
खिलजि
Wed, 05/02/2018 - 09:30
नवीन
आता माउली फक्त तुमचीच नाय काय , माझीपण हाय . ह्ये बघ अभिप्रायाचा प्रसाद दिलाय . धन्यवाद माउली आणि पद्मावती ताई . त्रिवार धन्यवाद ..
सिद्धेश्वर विलास पाटणकर
- Log in or register to post comments