Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लाल करा ओ माझी लाल करा

ख — खिलजि, गुरुवार, 05/03/2018 - 10:18
लाल करा ओ , माझी लाल करा येता जाता लाल करा पुसा मला तुम्ही येता जाता पुसूनि पुरते हाल करा , लाल करा ओ लाल करा येता जाता लाल करा भजा मज तुम्ही भाई दादा तुमचाच राहीन , हा पक्का वादा गॉड बोलुनी बेहाल करा लाल करा ओ माझी लाल करा येता जाता लाल करा समजू नका मज ऐरागैरा नीट बघून घ्या माझा चेहरा या गोंडस, लोभस मित्रासाठी प्रेमाची पखाल करा लाल करा ओ माझी लाल करा येता जाता लाल करा नका कटू कधी बोलत जाऊ बनेन मग मी शंभू न शाहू च्छाताड पुढे , मग फुगतील बाहू कशाला स्वतःला हलाल करा लाल करा थोडी लाल करा ओ येता जाता लाल करा क्रोध द्वेष जरा लांब राहू दे प्रतिसादाने न्हाऊन जाऊ दे पाठीवरती कशाला उगाचच या छातीवरती वार करा लाल करा ओ माझी लाल करा येता जाता लाल करा कल्पनेत मी रमतो गातो एकलाच मी प्रेम वाटतो बिनडोक्याच्या या वाघासाठी मायेची तुम्ही शाल धरा चुटकीसरशी काम करा लाल करा माझी लाल करा येता जाता लाल करा {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

प्रतिक्रिया द्या
17113 वाचन

💬 प्रतिसाद (19)
अ
अभ्या.. गुरुवार, 05/03/2018 - 10:32 नवीन
व्वा, जियो लाल
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 05/03/2018 - 10:36 नवीन
धन्यवाद मित्रा . आज तुझ्या अभिप्रायाच्या खुशीमध्ये काही टिम्ब फ्री ....... सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/03/2018 - 17:43 नवीन
. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी गुरुवार, 05/03/2018 - 18:19 नवीन
लेखनाचा दर्जा सुधारा. तुम्ही चांगले लिहू शकता. उगाच भारंभार लिहीण्यापेक्षा मोजकेच आणि सकस लिहा.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/03/2018 - 18:51 नवीन
दुत्त दुत्त ! लोकांचे मणोरंजण झालेली बघवत नाही ना तुम्हाला =)))) खिलजीराव तुम्ही घाब्रु नका , मिपा हे कुठल्याही एका ठरावीक विचारसरणीचे समर्थक नाही. तुम्ही रोज किमान एक तरी कविता पाडाच ! प्रतिसाद देत नसलो तरीही आम्ही वाचत आहोच ! आस्तिकनास्तिकपाव अन मोदी अन पप्पु वादा पेक्षा तुमच्या कविता नक्कीच भारी आहेत ! आणि हो कवितेत शेवटी " खिलजी म्हणे " किंव्वा " खिलजी अल्लाउद्देनपीरु" किंव्वा " कहे खिलजी" अशी काहीतरी स्वाक्षरी घ्या की !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
ज
जेम्स वांड Fri, 05/04/2018 - 19:38 नवीन
खिलजि नाव वाचून खालचे खचाखच तलवार काम वाचले की बरे असते पण एकदम खाली 'सिद्धेश विलास पाटणकर' वाचले की खिलजि शेंडी उडवत बोधगयेत तर्पणाला बसल्यागत फीलिंग येतं. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 05/03/2018 - 18:50 नवीन
...कब मुझे छोडेगा?
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 05/07/2018 - 06:36 नवीन
औरभी रंग लायेंगे काव्य पानिपत धारातीर्थी वाचक नाखु वाचकांचीच पत्रेवाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री
च
चित्रगुप्त गुरुवार, 05/03/2018 - 19:15 नवीन
कवितेच्या बाबतीत तरी ज्या ज्या वेळी जे जे मनात उमटत राहील ते ते तात्काळ लिहीत रहाणे बरे, त्या वेळी बर्‍या-वाईटाचा विचार करत बसलो तर लिहीणेच खुंटण्याची शक्यता असते. नंतर प्रसिद्ध करण्यापूर्वी शक्यतो पुन्हा पुन्हा वाचून काही सुधारणा केल्या जाऊ शकतात. मात्र चित्रकलेप्रमाणेच काही सुचल्यावर पटकन केलेल्या स्केचमधे जो ताजेपणा आणि जोम असतो तो त्यावर जास्त काम करण्यातून हरपत जावा, तसे कवितेच्या बाबतीतही होऊ शकते. एकंदरित खिलजींचा कविता प्रवास जोमात चालला आहे, हे छान. घ्या तुमची (कविता) लाल करतो: Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/03/2018 - 19:18 नवीन
ख्या ख्या ख्या ह्या निमित्ताने मला माझ्या मॉडर्न आर्ट चित्रकलेची आठवण आली http://www.misalpav.com/node/31366 =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/03/2018 - 19:42 नवीन
सिविपा, काय प्रेमळ कविता आहे हो. कुणाच्या तरी गाली लाली चढेल. थोडी लाल मात्रा कमी करा म्हणतो! ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 05/04/2018 - 11:36 नवीन
धन्यवाद चित्रगुप्त साहेब तीन चित्रांची भेट त्रिमूर्तीवानी भासली पाहिल्यात प्रसन्न उधळण आनंदाची दुसऱ्यात काळजीची लाल लकेर दाटली तिसरं असंच काहीसं पण जरा येगळं त्या दोघांपेक्षा वर रात्र तर खाली दूर कुठेतरी चूल पेटली या लाल रंगात खरंच आहे साऱ्या रंगांची लाली कुठे मुक्त उधळण आनंदाची तर कुठे पेटतात मशाली मी खरंच आता विचार करतोय कल्पना येऊ द्यायच्या अश्याच बाहेर कि मूग गिळून गप्प बसायचं कसं नि कुठे आणि किती थांबायचं सांगा असं तोंड दाबून अजून किती जगायचं मलाही वाटतं साऱ्यांनी मला एकदा तरी समजावं काय लिहिलंय त्यापेक्षा काय सांगतोय ते उमजावं दुसऱ्यानी नाही केली तरी चालेल पण आयुष्यात एकदा तरी स्वतःची लाल करावं सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 05/04/2018 - 16:43 नवीन
वा. मस्त शीघ्रकवन.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Fri, 05/04/2018 - 18:17 नवीन
काय अचाट वेग आहे तुमचा कविता पाडण्याचा. साॅरी करण्याचा. विराट कोहलीला पण इतके सातत्य जमले नाही शतके ठोकताना.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Sat, 05/05/2018 - 10:23 नवीन
धन्यवाद मित्रा
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sat, 05/05/2018 - 12:00 नवीन
स्वमुखाने माझी स्वतःचीच लाल करा हो म्हणण्याला लैच दम लागतो, नाहीतर लोक! आयुष्यात आलेले पसाभर अनुभव आढयपणे मांडून लोकांनी आपली लाल करावी ही अपेक्षा बाळगून असतात (ते ही जालावर) रच्याकने, तुम्ही इथे स्वतःच स्वतःची लाल का करून घेताय? Image removed.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Sat, 05/05/2018 - 12:16 नवीन
मी एक लाल बावटा आहे पाटणकर घराण्याचा दिवटा आहे शेंडीपासून गरापर्यंत पवित्र नारळ व्हायचं व्हतं पण आज एक पावटा आहे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही लाल झाल्याशिवाय दिवस काय पुढे जात नाही कुणी नाही केली तर स्वतःहून केल्याशिवाय राहत नाही
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 05/05/2018 - 12:20 नवीन
काय लाल करा, ते जरा संदिग्ध आहे. पण बहुतेक, 'माकड म्हणतं, माझीच लाल', या म्हणीतलाच अवयव अभिप्रेत असावा. लोकांनी नाही केली तर , खूप मिसळ खा, पाव न खाता! त्यानेही कार्य सिद्धीस जाईल. -- खिल(वा)जी
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Sat, 05/05/2018 - 12:26 नवीन
अवयव , आपण त्याला अवयव म्हणालात . हहपुवा .
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा