तलवारी आणि अन्य पाते असलेली शस्त्रे
तलवारी आणि अन्य पाते असलेली शस्त्रे भारतात पूर्वापार कुठे बनवली जात असत यावर लेख किंवा पुस्तके असतील तर संदर्भ हवेत...
एक संदर्भ मला मिळाला...
https://thecustodiansin.wordpress.com/2016/03/12/a-brief-history-of-wootz/
अशी शस्त्रे बनवायला लागणाऱ्या धातूंच्या खाणी सध्या कुठे आहेत...
अशी शस्त्रे बनवायला लागणाऱ्या धातूंच्या खाणी सध्या कुठे आहेत...
तुम्ही चीनमध्ये शिआन शहराजवळील Terracotta Warriors Museum पाहायला गेल्याचा उल्लेख आहे. मीहि तेथे दोन वर्षांपूर्वी गेलो होतो. तेथे निवडक वस्तूचे जे म्यूझिअम आहे तेथे चार घोड्यांच्या रथाची प्रतिकृति आहे. ती पाहिली का? महाभारतात आणि संस्कृत ग्रन्थांमध्ये अनेकदा वर्णिलेले रथ असेच असणार. तसेच शिआनमधील Grey Goose Pagoda ला भेट दिली का? Xuanzang (ह्युएन्त्सांग) येथून भारताकडे निघाला आणि भारतातून परतल्यावर ह्याच शहरात राहिला आणि बरोबर नेलेल्या सुमारे ६०० संस्कृत ग्रन्थांचे चिनी भाषेत भाषान्तर करण्यात त्याने आपले उरलेले आयुष्य वेचले.