जालफ्रेझीची सोय
भोपळ्याने सर्व भाज्यांना दमात घेतलं
सांगितलं मी आजपासून आहे तुमचा राजा
शेपू पालक सर्वानी शेपूट घालून मान दिला
अन बनल्या भोळी प्रजा
शेपूला केला मंत्री त्याने
पालक झाला प्रधान
धुसफुसणारी भेंडी वझीर केली
देउनी खास सन्मान
कसेबसे ते राज्य उभारले
कांदे बटाटे रुसले
संख्येने ते जास्त म्हणोनि
आरक्षण मागत सुटले
कोथिंबीरही मिरचीसंगे चूल मांडते वेगळी
कडीपत्ताही राग आळवतो तर पुदिन्याची बंडाळी
वांगे आपले अलिप्त तेथे , ना कसलीही चिंता
गनिमीकावा गवार वापरते , वाढवत सुटते गुंता
भोपळा झाला येडा पुरता
डोकं झालं बधिर
भेंडी देई आधार त्याला
तर पालक देई धीर
दोन घडीचा डाव मांडला
सुरीबाईचा झाला हल्ला
कापत सुटली दिसेल त्याला
त्यातुन भोपळाही ना सुटला
कसले राज्य नि काय
राजासकट सारे कापून काढले
कुणाचीही केली नाही गय
केली जालफ्रेझीची सोय
{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}
💬 प्रतिसाद
(3)
श
श्वेता२४
Sat, 05/05/2018 - 13:01
नवीन
त्यात मीठ,मीरची, मसाल्याचे प्रमाण तेवढे सांगायचे होते. बाकी माझ्या छोट्याला चाल लावून म्हणायला चांगली आहे. त्या निमित्ताने त्याला भाज्यांची नावे शिकवता येतील.
- Log in or register to post comments
ख
खिलजि
Mon, 05/07/2018 - 09:14
नवीन
धन्यवाद श्वेता ताई
सिद्धेश्वर विलास पाटणकर
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 06/19/2018 - 07:34
नवीन
अत्युत्तम पाकृ, एकच प्रतिसाद ? अन्याव, अन्याव !!
- Log in or register to post comments