Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शेंडी असावी कि नसावी ? असली तर का असावी ? किंवा नसली तर का नसावी ?

ख
खिलजि
Fri, 05/11/2018 - 13:10
🗣 58 प्रतिसाद
मित्रहो आणि इतर वाचक मंडळी आज मी आपण सर्वास इथे या मंचावर एक प्रश्न विचारणार आहे . अर्थात मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे आहेच पण ते जर जसच्या तसं अजून एखाद्याकडून मिळालं तर मी स्वतःला भाग्यवान समजेन . खाली मी मला पडलेल्या प्रश्नाचा थोडा पूर्वार्ध सांगत आहे , फ्लॅशबॅक म्हणा हवं तर , एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे . तर पूर्वार्ध खाली आहे तो असा पूर्वार्ध मला लहानपणापासून जादूची /अद्भुत /सत्यकथा /ऐतिहासिक पुस्तके वाचायला आवडायची . ती छोटी असली तर अजूनच मजा यायची . मी बरीच पुस्तके अक्षरशः चाळून काढली . हळहळू माझा काळ देवादिधर्माकडे वाढू लागला . आणि हे आपोआप झाले बरं का . कुणाची जोरजबरदस्ती नाही इथे . मग सुरु झाले स्तोत्र वाचन नि पठाणाचे कार्यक्रम . हळूहळू स्वतःहून त्यामध्ये प्राविण्य मिळवले . अर्थात त्याला शाळेतील बाईंची जोड होतीच . त्या माझ्याकडुन शाळेत आल्याआल्या सर्वांसमोर स्तोत्रे वाचून घेत आणि उच्चारावर जोर देत . नंतर माझा कल " हे असे का ? " नि धार्मिक गोष्टी का आणि कशा पाळतात . त्यामागील उद्देश नक्की काय ? तो पटण्याजोगा असेल तरच ते मान्य अथवा सरळ गंगेला सोडून द्यायचो . मग सांगणारी माझी आई असली तरीही मी मला जे पटेल तेच करायचो . मी आणि माझा पवित्रा याने हळूहळू संपूर्ण घरावर ताबा घ्यायला सुरुवात केली होती . बाबांना वाटलं पोरगं वाया जातंय म्हणून त्यांनी पण काहीतरी नवस बोलला असेल आणि एक शेंडी सरळ धारण करून टाकली . आजही ती शेंडी त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून मोठ्या दिमाखात मिरवत आहे .त्या शेंडीने माझ्या मनात बरीच उलथापालथ माजवली . कित्येक प्रश्न निर्माण झाले . भरपूर देवदेवळे झाली . पंडितांबरोबर चर्चा झाली . पण तो प्रश्न " शेंडी का धारण करावी किंवा ठेवावी ?" याचे समाधानकारक उत्तर कुणीच दिले नाही . बराच काळ लोटला पण तो प्रश्न मनात घर करून उभा होता जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष . अर्थात मी त्याचा प्रामाणिक पाठपुरावा कदाचित नंतर केला नसेल जसा त्यावेळी केला होता . नाहीतर मला त्याचे उत्तर थोड्या अवधीतच मिळाले असते . पण देवाचे ( माफ करा , त्या अनामिक शक्तीचे मनापासून आभार ) कि ज्याने ते उत्तर द्यायला वेळ निवडली होती ती अगदी सार्थच होती . ती वेळ त्याचे अस्तित्व दाखवून देत होती याबदल किंचितही शंका नाही माझ्या मनात . २६ जुलै ला जो पाऊस मी मुंबईत झाला त्याने थैमान माजवले होते मुंबईत हे सर्वश्रुत आहे . असाच पाऊस मला वाटत एक दोन तीन वर्षांनी मुंबईत झाला होता . तेव्हाही थोडाफार हाहाकार मजला होता . तो पाऊस झाला तेव्हा मी लॅबमध्ये जायला निघत होतो आणि इतक्यात माझ्या मुलाच्या शाळेतून मेसेज आला " पाऊस जास्त असल्याने शाळेतील बस मुलांना घेऊन येऊ शकत नाही तर आपापल्या मुलांना पालकांनी स्वतः घेऊन जावे ". नशीब बलवत्तर म्हणून मी त्यादिवशी घरीच होतो आणि नुकताच बाहेर पडणार होतो . कारण एकदा का बाहेर पडलो असतो तर मग मी सरळ बॅगेतला मोबाईल लॅब मध्येच पोहोचल्यावरच बघतो . ठरलं , मी पहिलं सोहमला ( माझ्या मोठ्या मुलाला ) आणणार आणि मग वेळ असेल तरच कामाला जाणार. तिथून उलट्या रस्त्याला जायचे म्हणजे गाडी ना घेऊन जाणे कधीही योग्य . मी सरळ तिथे टॅक्सिने पोहोचलो . जाताना इतरत्र पाणी जमले होते ते बघून पुढचा अंदाज बांधलेला खरा ठरला ,कि येताना टॅक्सी मिळणे अवघड काम आहे हा . मग मी आणि सोहमतिथेच बाहेर रस्त्यावर काही सोया होतेय का ते वाट बघत होतो . रस्ता पूर्णपणे सुनसान झाला होता थोड्याच अवधीत . पाऊस मी म्हणत होता . शाळेतील द्वारपालाने मला आत येऊन बसण्यास सांगितले पण मी ती विनंती नम्रपणे नाकारली . मी म्हणालो " आत आलो तर टॅक्सी कशी मिळेल परत जायला ". त्यालाही ते बहुधा पटले असावे म्हणून तो आतूनच लक्ष ठेवून होता आमच्यावर . पारशी कॉलनीत मोठी झाडं भरपूर असल्याने त्याला आमची काळजी वाटणं रास्त होत . त्यात सकाळीच त्याच्या सांगण्यानुसार कळले होते कि एक मोठी फांदी खाली उभ्या असलेल्या गाडीवर येऊन आदळली होती . बराच वेळ लोटल्यानंतर एक टॅक्सी जणू आमच्यासाठीच पाठवली आहे अशी देवदूताप्रमाणे समोर उभी राहिली . आहे कि नाही काहीतरी चांगलं घडण्याची वेळ . लक्षात असू द्या , इथे तुम्हाला जेव्हा न मागता काही मिळते तेव्हा त्याची कृपा झाली असं समजावं . मी कितीतरी वेळ जी पण गाडीघोडा जात होतो त्याला हात दाखवून दाखवून थांबवत होतो पण साल कुणी थांबायलाच तयार नाही आणि इथे बघा न हात दाखवता टॅक्सी हजर. आत कोणीतरी तेजपुंज पुरुष " गोरापान पण थोडासा वयोवृद्ध " आमचे हसून आदरातिथ्य करत त्याने आम्हाला आत बसायची सूचना केली . मी जरा दबकतच सांगितले कि मला सायनला जायचेय म्हणून कारण मला भीती वाटत होती कि गांधीमार्केटला पाणी साचत असल्याने बहुतेक टॅक्सिवाले सरळ नकारच देतात म्हणून . पण हे साहेब त्वरित उत्तरले कि कि मला आदेश आलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला सोडायला आलेलो आहे . मी फारवेळ टॅक्सी चालवत नाही पण विधात्याने हे काम जेव्हाजेव्हा मला करायला सांगितले आहे तेव्हा तेव्हा मी ते केलेलं आहे अगदी मनापासून . अर्थात सर्व संवाद हिंदी भाषेतूनच चालू होता . मी पण त्या उत्तराने जरा चपापलोच . कारण त्याने नकळत मला छेडले होते . मला आधीपासूनच त्या गूढ वातावरणाचा अंदाज मनापासून घ्यायला आवडते . मीही मग त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली . ट्राफिक असल्याने मलाही पूर्ण खात्री होती कि आपण काही चाळीस मिनिटांच्या आत घरी पोहोचत नाही म्हणून मीदेखील गप्पा मारायला सुरुवात केली . आधीच मला त्यांच्याबद्दल एक उत्कट भाव निर्माण झालाच होता कि त्यांनी मला आशा वेळेला मदत केली होती जजिथे पैशाचे मोलच नाही .त्यामध्ये एक गोष्ट सारखं लक्ष वेधून घेत होती ती म्हणजे त्यांची लांबलचक गाठ मारलेली शेंडी . एकंदरीत त्यांचा अवतार पहिला कि असं वाटत होत कि ते स्वतः कुणीतरी योगीपुरुष आहेत . माझा तो पण अंदाज खरंच ठरला होता . कारण त्यांची दोन्ही मुले अमेरिकेत मोठ्या हुद्द्यावर कार्यरत होती . इथे मुंबईला ते स्वतः आणि त्यांची सुना नातवंड गुण्यागोविंदानं राहत होती . त्यांचं दिनक्रम हाच कि लवकर उठणे आणि भजन कीर्तनात दंग राहणे . अध्यात्मिक विचारविमर्श करणे. त्यांच्या समाजात त्यांना भरपूर मान होता . अरे हो हे सर्व सांगण्याच्या नादात मी त्यांचे नाव जे मी आजपर्यंत विसरलो नाही आहे ते सांगायचे राहूनच गेलं . त्यांचं नाव होत " राजपाल शुक्ला " . मी हळूच बोलता बोलता त्यांच्या ज्ञानाचा अंदाज घेतला आणि सरळ माझ्या प्रश्नाच्या भात्यातून तो रामबाण बाहेर काढला " चाचा हं चोटी क्यू रखते है ? " ते संहारक अस्त्र त्यांच्यावर आदळले खरे पण त्यांच्या त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून दिलेल्या उत्तराने माझ्या आत्तापर्यंतच्या सहनशीलतेचे सार्थक झाले होते . मी भरून पावलो होतो . मला त्या उत्तराने द्विगुणित आनंद झाला होता . तोच प्रश्न आज मला या ओघवत्या मंचावर विचारावासा वाटतोय आणि पहिले उत्तर जे मला अपेक्षित आहे त्याला माझ्यातर्फे बक्षीस द्यावेसे वाटतेय . अजून एक आज संध्याकाळपासून मी गायब होत आहे . एका अनवट जागी सहकुटुंब चाललो आहे . तेव्हा मी सरळ सोमवारीच उगवेन. तोपर्यंत आशा आहे कि मला उत्तर मिळालेलं असेल आणि जर नाही मिळालं तर हरकत नाही . मी इथे परत आल्यावर ते आपल्या सर्वाना जरूर कळवेन . सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
25893 वाचन

💬 प्रतिसाद (58)
प
प्रसाद_१९८२ Wed, 05/16/2018 - 08:40 नवीन
एकाद्याला "शेडी लावणे" ह्या वाक्प्रचारचा उगम कसा काय झाला?
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 05/16/2018 - 09:03 नवीन
अगदी ओढून ताणून शास्त्रीय अर्थ लावायचा तर, कुटुंबप्रमुखाची जबाबदारी कुटुंबाचे रक्षण ही होती. शेंंडी ठेवल्याने, तो बाकीच्या कुटुंबाचे विजेपासून(लाईटनिंग) संरक्षण करत असे. त्याची शेंडी म्हणजेच लाईटनिंग प्रोटेक्टर!!! आहाहा, काय तो स्वार्थत्याग! स्वतः विजेचे वाहक होऊन जळून जायचे, पण कुटुंबाला वाचवायचे.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Wed, 05/16/2018 - 09:54 नवीन
शेंडीचा उपयोग काय , याचे उत्तर शेंडी ठेवलेल्याला आपोआप शेंडीनेच द्यायला हवे, इतरांना विचारावे लागते , म्हणजे शेंडीच्य कार्यात बाधा आहे का ?
  • Log in or register to post comments
अ
अकिलिज Wed, 05/16/2018 - 10:58 नवीन
एखादी गोष्ट जर सतत लक्षात ठेवायची असेल तर बरेच जण काही ना काही उपाय करतात. जसे फेंगशूई मध्ये घरात दर्शनी ठिकाणी एक पुतळा ठेवला तर घरी राहणार्‍याला सतत काहीतरी चांगले होणार आहे असे वाटत राहते. तसे शेंडी ठेवणार्‍याला सतत आपण विश्व नियंत्रण करणार्‍या शक्तीला जोडत बसावयाचे आहे याची जाणिव करून देत असावेत.
  • Log in or register to post comments
व
वकील साहेब Wed, 05/16/2018 - 16:14 नवीन
वीणा३ व पिलियन रायडर यांनी मांडलेले मुद्दे अधिक पटतात संध्याकाळच्या सगळ्या गोष्टी, सगळे सण वार, मुंज, होळी, संक्रांत, सुतक याही व्यतिरिक्त अनेक गोष्टी अशा आहेत की त्या कधीकाळी त्या वेळेची गरज होत्या. पण आज सोपस्कार म्हणून उरल्या आहेत. वीणा ताई याची यादी बनवण्या साठी एखादा नवीन धागा तुम्हीच काढावा असे या निमित्ताने सुचवावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sun, 05/20/2018 - 18:52 नवीन
आचार्य अत्रे यांनी लिहिले आहे. "मला सांगितले गेले होते की शेंडीत वीज असते. हे 100% सत्य आहे कारण जेंव्हा मी शेंडी काढून टाकली तेंव्हा आमच्या वडिलांना जोरदार धक्का बसला होता".
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 05/22/2018 - 12:38 नवीन
Image removed. मिपा मित्रांनो, तमिळ प्राच्य लिपी संशोधक इरावथम महादेवन यांच्या Dravidian Proof of the Indus Script via the Rig Veda: A Case Study या २०१४ च्या संशोधन निबंधात सिंधू लिपीतील चार चिन्हांवर अभ्यसनीय रोचक लेखन आहे. योगा योगाने तो लेख आज वाचनात् आला , योगा योगाने एका चिन्हातील शेंडी बद्दलही चर्चा आहे. अर्थात हि चर्चा फक्त शेंडी बद्दल आहे समजून लेख दुर्लक्षीत करु नका कारण अजून बरेच काही वाचनीय आहे आणि सर्व माहिती इथे देऊन तुमचा वाचनांनंद घालवत नाही . त्यांनी त्यांच्या निबंधात वापरलेले आर्य द्रविड हे शब्द तात्पुरते बाजूस ठेऊन वाचले तरी , सिंधू लिपीतील चिन्ह तमीळ भाषा आणि ऋग्वेदातील एक देवता यांचा संबंध दाखवण्याचा एक महत्वपूर्ण प्रयत्न म्हणून पहाण्या सारखा वाटतो. एखाद्या संशोधन प्रयत्नाची दखल पाश्चात्यांनी घेतल्यावरच आपण घ्यावी असा आग्रह नसेल तर आवर्जून वाचावे. * Dravidian Proof of the Indus Script via the Rig Veda: A Case Study चा सरळ पिडीएफ दुवा जो मी हरप्पा डॉट कॉम या संस्थळावरुन या दुव्यावरुन मिळवला . बाकी चर्चा वाचना नंतर आलेल्या प्रतिसादांवर करुया .
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 05/25/2018 - 13:27 नवीन
शेंडीवरून इतकी उलथापालथ झाली हे आम्हास ठाऊकच नव्हते . शेंडी ना धारण करताही इतके ज्ञान तर शेंडी धारण करून किती मिळेल याचा आम्ही सध्या विचार करतोय . धन्यवाद सर्व प्रतिसादकांना आणि वाचकांना , माझ्या स्वतःच्या वैयक्तिक ज्ञानात भर टाकल्यामुळे . सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा