Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुझ्यासाठी म्या काय नाय केलंय

ख — खिलजि, Mon, 05/14/2018 - 12:37
तुझ्यासाठी म्या काय नाय केलंय माझं मन बी बोन्साय केलंय पयलं व्हतं त्ये धरणावाणी त्यात मॉप व्हतं पाणी रंगीत मासळी पवत होती मस्त लव्हाळं झुलंत होती दिवसा खोखो नि रात्री कबड्डी जल्ला स्पीड म्हणू कि जेट्टी चाबूक घेऊन खाली तू आली काय ठाऊक तू खाऊन आली ? फटक्यात जिंदगी स्मशान केली ती चमचमती दुनिया बी गेली त्या समद्यास्नी मारून टाकलंय मॉप पाणी बी आटवून टाकलंय समद्या भावनांना पेटवून टाकलंय माझं मन बी बोन्साय केलंय पयला होतो म्या ताडावाणी दिस रात एक मज होते मनी तारे लखलखत होते खायचो कोंडा अन प्यायचो पाणी चउत भाकरीने बाजार जो केला आत्ता जन्माचा उरलो अडाणी फगस्त तुझ्याचसाठी झुरतोय गप गुमान कामावर जातोय तू सांगशिल त्येच करतोय अन घरामन्दिचं मुरतोय राणी मुरून अर्धा झालोय आता म्या पण बोन्साय झालोय {{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

प्रतिक्रिया द्या
3476 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ए
एमी Mon, 05/14/2018 - 16:58 नवीन
लॉल आपल्याला आवडतात ब्वॉ खिल्जीच्या कविता :D:D
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 05/15/2018 - 09:35 नवीन
धन्यवाद अॅमीजी , काल हि कल्पना , एकदम चालीत म्हणून दाखवली बायकोला . ज्जाम उखडली बघा . घरात किती काम असते आणि मी कसा दिवस घालवते तुझ्या दोन कॅलेंडरबरोबर , ते किती त्रास देतात , हि सर्व पुढील कवितेची शिदोरी तिने हातात दिली आहे . आता एकेक कल्पना शब्दात बंधने आले . आपला अभिप्राय मला सुखद वाटला . धन्यवाद वाचल्याबद्दल . सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
स
सिद्धार्थ ४ Tue, 05/15/2018 - 11:56 नवीन
अजुन येउ द्या
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा