Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सखे..फुलांसवेच आज माळ चांदवा!

स — सत्यजित..., Fri, 05/18/2018 - 13:18
बघूच धावतो कसा? खट्याळ चांदवा... सखे..फुलांसवेच आज माळ चांदवा! अजून पाहिली न मी भरात पौर्णिमा उगाच दावतो मला घड्याळ चांदवा! नभावरुन एकदाच हात फेरला उद्या कळेल बातमी..'गहाळ चांदवा!' शशीस चेहरा तुझा म्हणू कसा? प्रिये, तुझ्यापुढे दिसे मला गव्हाळ चांदवा! निळ्या नभावरी पिठूर साय पांघरु... उधाणला उरातुनी दुधाळ चांदवा! तनू-तनू तहानली सहाण वाटते हळूच वेच चांदणे,उगाळ चांदवा! पहाटही नभावरी गुलाल रंगते मिठीत लाजला तिच्या मधाळ चांदवा! —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
17567 वाचन

💬 प्रतिसाद (24)
स
सस्नेह Fri, 05/18/2018 - 14:01 नवीन
दिल चांदवा चांदवा हो गया !
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Tue, 05/22/2018 - 01:00 नवीन
छोटासाच पण खूप सुंदर बोलका प्रतिसाद! वाह् म्हणून दाद द्यावासा! खूप धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
श
शाली Fri, 05/18/2018 - 14:55 नवीन
आवडली! सुरेख!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 05/18/2018 - 16:02 नवीन
आहा!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 05/18/2018 - 16:51 नवीन
क्या बात...! जबरीच.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 05/18/2018 - 20:17 नवीन
तनू-तनू तहानली सहाण वाटते हळूच वेच चांदणे,उगाळ चांदवा!
जियो! अप्रतिम कल्पना...! एकेक शब्द मनात घोळवत घोळवत हे कडवं म्हणतोय केव्हापासून. सये तुझ्या तनूवरी हा चंद्र मी उगाळतो चांदण्यांच्या वणव्यात साऱ्या जीव कसा पोळतो
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Tue, 05/22/2018 - 00:52 नवीन
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद एस! आपण लिहिलेल्या ओळीही सुंदर आहेत! त्यांतील पहिल्या ओळीवरुन अजून दोन ओळी सुचल्या,ज्या सदर गझलेसाठीच,दुसरा मतला—'हुस्नेमतला',असू शकतील... "सये तुझ्या तनूवरी उगाळ चांदवा, दिसेन मग जरा तरी नव्हाळ चांदवा!" धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Tue, 05/22/2018 - 08:51 नवीन
"सये तुझ्या तनूवरी उगाळ चांदवा, दिसेन मग जरा तरी नव्हाळ चांदवा!" अहाहा! केवळ अप्रतिम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...
प
पद्मश्री चित्रे Sat, 05/19/2018 - 04:40 नवीन
छानच अगदी.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sat, 05/19/2018 - 05:02 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Sat, 05/19/2018 - 06:37 नवीन
अप्रतिम....
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Sat, 05/19/2018 - 10:09 नवीन
शशीस चेहरा तुझा म्हणू कसा? प्रिये, तुझ्यापुढे दिसे मला गव्हाळ चांदवा! हे भारी आवडलं. असं कधी वाचनात नव्हतं आलं. मस्तच
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sat, 05/19/2018 - 18:33 नवीन
मस्तच. नेहमीप्रमाणे सुरेख.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Tue, 05/22/2018 - 01:05 नवीन
दुर्गविहारी,आपण अवर्जून दाद देता,त्याबद्दल मनःपूर्वक आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
स
सविता००१ Mon, 05/21/2018 - 02:34 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 05/21/2018 - 11:59 नवीन
अप्रतिम खरोखरच. फार आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 05/21/2018 - 13:45 नवीन
आवडली रचना. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 05/21/2018 - 14:44 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Tue, 05/22/2018 - 01:10 नवीन
शाली,प्राची,प्रचेतस,पद्मश्री,शिव कन्या,संजय पाटिल,सविता,अभ्या,बिरुटे सर,यशोधरा... आपण सर्वांनी अनेकवेळा अवर्जून प्रतिसाद नोंदवून दाद दिलीत,लिखाणास प्रोत्साहन दिलेत,त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार!
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 05/22/2018 - 13:14 नवीन
सत्यजित साहेब , आपल्या कविता मला फार भावतात . आपण फारच सुंदर विचार करता . सुंदर कविता .. सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Wed, 05/23/2018 - 04:40 नवीन
मस्तच !!!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 05/23/2018 - 13:22 नवीन
सुरेख आणि रेखिव रचना.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Wed, 05/23/2018 - 15:42 नवीन
मी सहसा या विभागात चक्कर मारत नाही. पण आज आल्याचं चीज झालं . कविता आवडली.
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Wed, 07/01/2020 - 06:44 नवीन
फारच छान
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा