Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हकिक़त

म — मिसळलेला काव्यप्रेमी, गुरुवार, 05/24/2018 - 13:27
ये शायरी नही दोस्तो हकिक़त है ------ अपने माझी को टटोलता हूँ कभी तो गुजरे हुये सालो में एक रुहानी कहानी दिखायी देती है ------ समंदर के किनारे जानो पें सर रख्खे बैठी हुयी एक भोली, कमसीनसी लडकी दिखती है ------ आज भी उसके चेहरे को देखते ही रुह को जो लम्स होता है मानो ओस से भीगी मिट्टी पैरोंको छू गयी हो ------- उस रात अचानक एक बात समझ आयी थी रोशनी मोहताज होती नही चाँद या सुरज की ------- ये शायरी नही दोस्तो हकिक़त है ------ गर जो वो पास ना हो तो भी साथ रहती है सच कहता हूँ सासोंमे महकती रहती है ------- पुरे बारा सालोंका साथ रहा है उसका और मेरा ... वही भोली, कमसीनसी लडकी ... पहचान तो थी उसकी और मेरी शायद पिछले किसी जन्म से ही जानने अब लगा हूँ ये शायरी नही दोस्तो हकिक़त है ------ पता नही क्यु लेकिन मै बात उसकी करता हूँ जब भी तो लोग कहते है मै शायरी करता हूँ ... सच मे ये शायरी नही दोस्तो हकिक़त है |- मिसळलेला काव्यप्रेमी -| १८/०५/२०१८ जानो पें = (दुमडलेल्या) गुडघ्यांवर लम्स = निसटता नाजुक स्पर्श ओस = दव मोहताज = लाचार, अवलंबून ................................................भावानुवाद................................................ खरं सांगू तुम्हाला ? ही कविता नाहीये हे सगळं आहे मी पाहिलेलं, एेकलेलं, अनुभवलेलं -------- कधी एकांतात झरझर जातं डोळ्यासमोरून हे सगळं जणू कुणा सिद्धहस्ताने लिहिलेली एखादी कादंबरी मी पाहिलेली मी एेकलेली मी अनुभवलेली मीच जगलेली माझीच कहाणी -------- समुद्रकिनारी पाय जवळ घेऊन आणि मुडपलेल्या गुडघ्यांवर चेहरा ठेवून बसलेली निरागस अशी 'ती' (आणि तिला पाहणारा घायाळ मी) ------- आजही तिचा चेहरा पाहिला की, एक अलवार शहारा जातो नखशिखांत दवात भिजलेल्या ओलसर मातीचा कसा हळुवार स्पर्श होतो पायाला, तसंच काहितरी ------- आणि ती रात्र ? त्या चांदणरात्री मला उमगलं होतं की चांदणं पडायला चंद्र-चांदण्या हव्याच असं काही नाही ------- खरंच सांगतो ही कविता नाहीये ------- ती जवळपास नसली तरी असतेच खरंतर आसपास आणि दरवळत राहते आसमंतात ------- एक तप झालं तिच्या माझ्या नात्याला ... तीच...समुद्रकिनारी बसलेली निरागस ती (आणि आजही तितकाच घायाळ मी) ... कदाचित, जन्मोजन्मांतरीची ओळख आहे आमची आणि कदाचित, मलाच आत्ता ओळख पटायला लागलीये तिची --------- तिच्या बद्दल काही सांगायला गेलं की लोक 'वाह वा' च करायला लागतात ... पण खरंच सांगतो हो ही कविता नाहीये ही कविता, गजल, रूबाई काहीच नाहीये --चाणाक्य (२४/०५/२०१८)

प्रतिक्रिया द्या
3254 वाचन

💬 प्रतिसाद (13)
र
रातराणी गुरुवार, 05/24/2018 - 23:23 नवीन
खूप सुंदर!! अवांतर : लग्नाचा वाढदिवस जवळ आला आहे का?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 05/25/2018 - 05:03 नवीन
अहहहहहह, वेलकम बॅक मिका पाजी, . तू सचिन आहेस राव काव्यविभागाचा. नजाकत आणि तेच पृव्हन शब्दलालित्य. सिम्प्लि ग्रेट.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 05/25/2018 - 05:57 नवीन
क्या बात मिका.. दिन बन गया!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 05/25/2018 - 07:22 नवीन
मोठ्या गॅप नंतर लिहीलीस पण काय लिहीले आहेस.... वा...जबरदस्त परत वाचताना र्मै और मेरी तनहाई च्या चालीवर (आणि बच्चनच्या आवाजात (मनतल्या मनात)) वाचली, अजून मजा आली अनुवादही चपखल झाला आहे. लिहीत रहा. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 05/25/2018 - 12:11 नवीन
फीस्ट!
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 05/25/2018 - 13:04 नवीन
मिका परत आला. उत्तम.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 05/25/2018 - 16:55 नवीन
द्येवा... __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ख
खिलजि Fri, 05/25/2018 - 13:44 नवीन
आवडला अनुवाद , अप्रतिम झाला आहे . सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 05/25/2018 - 13:44 नवीन
आवडला अनुवाद , अप्रतिम झाला आहे . सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 05/25/2018 - 17:01 नवीन
लयं भारी !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अभिनेत्री ओ अभिनेत्री अभिनय नेत्री नट गायत्री... :- Mahanati
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Fri, 05/25/2018 - 17:21 नवीन
मस्त आवडली.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 05/25/2018 - 18:11 नवीन
मूळ नज्म आणि भावानुवाद, दोन्हीही तरल आणि सुंदर.
  • Log in or register to post comments
फ
फिझा Sun, 05/27/2018 - 13:20 नवीन
वाह .....खूप सुंदर !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा