टोलनाक्यावरील टोळधाड , आपणास योग्य वाटते का ?
टोलनाक्यावरील टोळधाड , आपणास योग्य वाटते का ?
मी गेले काही वर्षे हा अनुभव घेत आहे . मला ऑफिसला पोहोचण्यासाठी वाशी खाडी पूल पार करावा लागतो . गेले काही वर्षांपासून तिथे हळूहळू वाहतूक पोलीस , आर टी ओ यांनी आपापले बस्तान बसवले आहे . एकतर टोल द्या आणि याच ससेमीराही सोसा .
मला जवळ जवळ पाच एक मिनिटे टोलनाका पार करायला लागतात . माझ्या नेहेमीच्या निरीक्षणावरून हे पठ्ठे जवळजवळ दहा ते पंधरा दुचाकीस्वार बाजूला घेतात . जे अडकतात ते बाजूला गाडी उभी करतात आणि बाकीचे जीव मुठीत घेऊन निघून जातात .
हा आकडा माझ्या निरीक्षणाचा तर विचार करा दिवसभरात किती जण त्रस्त होत असतील .
मलाही दोन तीन वेळा अडवले होते . माझी अक्षरशः पंधरा वीस मिनिटे फुकट गेली होती आणि मी शंभर रुपये टेकवून तिथून सटकलो होतो .
आपलं यावर काय मत आहे ? टोलनाका असल्या कारणाने तिथे कुठल्याही गाडीचा वेग मंदावणे साहजिकच आहे पण हे असे अडवणे योग्य आहे का ?
सिद्धेश्वर विलास पाटणकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अभिनेत्री ओ अभिनेत्री अभिनय नेत्री नट गायत्री... :- Mahanatiमी शंभर रुपये टेकवून तिथून सटकलो होतो .असे करणार्यांना "सिस्टिम"ला दोष देण्याचा अजिबात अधिकार नाही... किंबहुना, तेच "सिस्टिम" बिघडवण्याचे काम करत असतात आणि इतरांचा त्रास वाढवत असतात.