Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फिफा वर्ल्ड कप २०१८

क
कपिलमुनी
Tue, 05/29/2018 - 11:04
🗣 161 प्रतिसाद
fifa यंदाचा फिफा वर्ल्ड कप रशिया मध्ये खेळवला जाणार आहे. भारत या खेळात मागे असला तरी भारतामध्ये या खेळाचे चाहते खूप संख्येने आहेत. यंदा निवडणूकांमुळे या वर्ल्ड कपची वातावरण निर्मिती म्हणावी तशी झाली नाही. यंदाचा वर्ल्ड कप रशिया मध्ये १४ जून पासून सुरू होणार आहे. त्याची माहिती आणि चर्चा करण्यासाठी हा धागाप्रपंच या वर्षी एकूण ३२ टीम भाग घेणार आहेत . ( रशिया ही यजमान टीम आहे त्यामुळे त्यांना क्वालिफाय ना खेळता सहभाग मिळतो असे विकिने सांगितले , भारताला या प्रकारे आयोजन करून सहभागी व्हावे लागेल :) ) Groups इटली , नेदरलँड आणि चिलि या बलाढ्य टीम यंदा नसतील . या खेळात कोणतेही भाकीत करणे अवघड आहे . यंदाच्या स्ट्राँग टीम जर्मनी , फ्रान्स आणि पोर्तुगाल आहेत ब्राझील , पोर्तुगाल आणि अर्जेंटीना या एकाद्या दुसर्‍या खेळाडू वर अवलंबून आहेत . ते ब्लॉक झाले तर यांचा परफॉर्मन्स ढासळतो पण ते ( नेमार , रोनाल्डो , मेस्सी) चालले तर मात्र टीम जोशात येतात. डार्क हॉर्स : पोलंड , उरुग्वे , कोस्टा रीका यांचे भाकीत करता येणे अवघड आहे ह्या टीम धक्का देत सेमि फायनल पर्यंत पोचू शकतात प्रत्येक देशाचे खेळाडू , व्यूहरचना , गोलकीपर , प्रशिक्षक यावर प्रतिसादात अपडेट करेन आणि सर्वांनी त्यात भर घालावी ! यंदाच्या फिफा वर्ल्ड कपचा शुभंकर mascot
वर्गीकरण
क्रीडा; फुटबॉल ; फिफा

प्रतिक्रिया द्या
49335 वाचन

💬 प्रतिसाद (161)
म
महासंग्राम Sat, 06/23/2018 - 05:25 नवीन
ब्राझील विजेतेपदाचा प्रबळ दावेदार वाटत नाही, त्यांच्या कडे सांघिक खेळाचा अभाव आहे, तसेच फक्त नेयमार वर विसंबून राहणे त्यांना घातक ठरेल. या वर्षी कित्येक छोट्या संघांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. क्रोएशिया, रशिया या सारखे संघ उत्तम फॉर्मात आहेत. त्यामुळे आताच ब्राझील ला दावेदार मानणं चुकीचं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ranapratap
क
कंजूस Fri, 06/22/2018 - 17:54 नवीन
ब्रझिलचे कित्येक प्रयत्न वाया गेल्यावर दोन गेल झाले एकदाचे शेवटी. ही टीम फायनलला जाणे कठीणच वाटतेय. कोस्टारिकाने चांगलेच दमवलेन.
  • Log in or register to post comments
न
निशाचर Fri, 06/22/2018 - 21:50 नवीन
खेळाची दोन मिनिटे शिल्लक आहेत..
  • Log in or register to post comments
न
निशाचर Fri, 06/22/2018 - 22:00 नवीन
स्वित्झर्लंडची जीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशाचर
R
Ranapratap Sat, 06/23/2018 - 15:59 नवीन
बेलजीयम 5-2 विजयी
  • Log in or register to post comments
न
निशाचर Sat, 06/23/2018 - 19:36 नवीन
मेक्सिकोने द. कोरियाला हरवल्याने जर्मनीला आज स्वीडनविरुद्ध जिंकणे भाग आहे. आजच्या खेळासाठी लोवच्या टिममध्ये बरेच बदल दिसतायत. खेडिरा, हुम्मेल्स आणि उझिल ऐवजी रुडी, रुडिंगर, रॉयस आणि हेक्टोर खेळणार. पहिल्या मॅचमधील खराब खेळानंतर आज जर्मनीला सूर गवसेल का...
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स Sat, 06/23/2018 - 20:12 नवीन
जर्मन सुरुवात चांगली झालीये .... बॉल पझेशन जास्त वेळ जर्मन कडेच आहे
  • Log in or register to post comments
न
निशाचर Sat, 06/23/2018 - 20:36 नवीन
बॉल पझेशन ७०% जर्मनीकडे पण स्वीडनने खातं उघडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स
न
निशाचर Sat, 06/23/2018 - 21:13 नवीन
एकदाचा जर्मनीचा गोल झाला.
  • Log in or register to post comments
न
निशाचर Sat, 06/23/2018 - 21:55 नवीन
येस्स! जर्मनी २ - १!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 06/24/2018 - 05:17 नवीन
दोन दिवसांत चांगला खेळ बघायला मिळाला.
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Wed, 06/27/2018 - 17:58 नवीन
गतविजेत्यांची परंपरा कायम राखत जर्मनी चा ग्रुप स्टेज मधून पॅकअप
  • Log in or register to post comments
न
निशाचर Wed, 06/27/2018 - 18:01 नवीन
कोरिया २-० ने विजयी. जर्मनी प्रथमच बाद फेरीत बाद!
  • Log in or register to post comments
R
Ranapratap Wed, 06/27/2018 - 18:03 नवीन
जर्मनी आताही रशियात जिंकू शकली नाही. कोरियाचा 2-0 असा अविविश्वनिय विजय
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/28/2018 - 17:58 नवीन
पोलंड वि जापान सामन्यात, पोलंड जिंकले जापान हरले. १-० तरी जापान का आनंदात आहेत ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
R
Ranapratap गुरुवार, 06/28/2018 - 18:19 नवीन
जपान व सेनेगल चे पॉईंट्स सारखे झाले पण जपानला सेनेगल पेक्षा कमी येलो व रेड कार्ड्स मिळाले हा निकष लावून जपान बाद फेरीत गेले.
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Fri, 06/29/2018 - 04:01 नवीन
धन्यवाद Ranapratap हेच उत्तर हुडकत होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ranapratap
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/30/2018 - 16:29 नवीन
ओह, माहितीबद्दल आभार. बरेच प्रेक्षक मोबाईलवर पाहात होते, मला कळलाच नव्हता गोंधळ काय सुरु आहे म्हणून. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ranapratap
म
महासंग्राम Sat, 06/30/2018 - 08:24 नवीन
विराट कोहली ने सपोर्ट केला म्हणूनच जर्मनी बाहेर गेली या वेळेस
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/30/2018 - 16:21 नवीन
फ्रांसच्या आक्रमण पाहता १-० ची लीड आणि आता फ्री किक.... बाहेर गेली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/30/2018 - 16:32 नवीन
अर्जेंटीनाला संधी मिळत नै ये आणि फ्रांसचे आक्रमणात किमान अजुन दोन गोल होता होता राहिले. मस्त म्याच सुरु आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/30/2018 - 16:44 नवीन
डीमारिया चा मोकळ्या जागेतून जबरा गोल. आत्ताशी बरं वाटलं. ४४ व्या मिनिटाला स्कोर १-१ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
कंजूस Sat, 06/30/2018 - 16:51 नवीन
आता बॅाल सोडतच नैत.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/30/2018 - 16:59 नवीन
तो फ्रांसचा एम्बापे एकटाच सुसाट चेंडू घेऊन पळतोय त्याच्या वेगापुढे अर्जेंटीना पहिल्या हाफ मधे थकुन गेलीय. मला मेस्सीचा गोल बघायचा आहे, मी आज अर्जेंटीनाकडून आहे मनाने. साला खेळ आवडतोय फ्रांसचा. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/30/2018 - 17:10 नवीन
अर्जेंटीनाचा आणखी एक जबरा गोल. अर्जेंटीना २-१ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/30/2018 - 17:17 नवीन
फ्रान्सच्या बेंजोमिनचा अफलातुन दुसरा गोल. २-२ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/30/2018 - 17:25 नवीन
आज फ्रांसचा खेळ पाहता त्यांचा आणखी एक गोल. फ्रांस ३ अरजेंटिना २. मेस्सीला काही जमेना आज. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/30/2018 - 17:29 नवीन
एम्बापेचा आणखी एक गोल ४-२ . अर्जेंटीनाला अजिबात चांस दिसत नै ये, अतिशय वेगवान खेळ फ्रांसचा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न
निशाचर Sat, 06/30/2018 - 17:50 नवीन
फ्रांसचा खेळ बघायला मजा येत्येय. २ मिनिटं उरली आहेत आता फक्त..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/30/2018 - 17:57 नवीन
तीसरा गोल झाला पण फ्रांसचा दमदार विजय. अर्जेंटीना बाहेर. फ्रांस ४ अर्जेंटीना ३ . उरुग्वे आणि पोर्तुगालच्या सामण्यासाठी भेटू भाप्रवे ११:३० ला. -दिलीप बिरुटे (अर्जेंटीनाच्या पराभवाने मूड गेलेला) :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न
निशाचर Sat, 06/30/2018 - 17:51 नवीन
अर्जेंटिनाचा गोल!
  • Log in or register to post comments
R
Ranapratap Sat, 06/30/2018 - 18:00 नवीन
फ्रान्सचा 4-3 ने विजय, संपूर्ण सामन्या दरम्यान अर्जेंटिना लौकिकाला साजेसा खेळ करू शकली नाही. शेवटी अर्जेंटिना खेळाडू चे वर्तन गालबोट लावणारे होते. त्यांनी पराभव मान्य करायला हवा होता.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sat, 06/30/2018 - 19:46 नवीन
अर्जेंटिनाला प्रेरणा कमी पडली. मेस्सी थकला आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 06/30/2018 - 19:54 नवीन
मेस्सीला शेवटचा दीस गोड करायचा होता. बिचारा. पण फारच जबरदस्त मजेदार खेळ झाला बाद फेरितला पहिला.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/30/2018 - 20:42 नवीन
प्रचंड धुसमुसळेपणा, रडारड, धक्काबुक्की याने भरलेला खेळ सुरु आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Sat, 06/30/2018 - 20:50 नवीन
+1000 या यादीत नाटकीपणा पण घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/30/2018 - 21:10 नवीन
नाटकीपणा, खोटारेडापणा, भरपूर मनोरंजनाने भरलेला खेळ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/30/2018 - 21:16 नवीन
पोर्तुगालचा गोल, रोनाल्डोला पुरता घेरून टाकलेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/30/2018 - 21:23 नवीन
उरुग्वेचा दूसरा अफलातून गोल. २-१ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/30/2018 - 21:58 नवीन
उरुग्वेचा बचाव आणि आक्रमक खेळ त्यांनी डी मधे बचावासाठी उभी केलेली भिंत पोर्तुगालला भेदताच आली नाही. शुभ रात्री. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sun, 07/01/2018 - 15:10 नवीन
पोर्तुगाल चा रोनाल्डो आणि अर्जेंटिना चा मेस्सी यांचा अफलातून खेळ मला माहीत होता म्हणून फक्त त्यांच्याच मॅच मी बघितल्या , आता त्या दोन्ही टीम बाहेर पडल्या आहेत तर इथून पुढे कुठल्या टीम च्या कोणत्या खेळाडू चा खेळ पाहण्यासारखा आहे ? कोणी सांगू शकेल का ? . थोडीफार खेळाडू ची माहिती असेल तर मॅच पाहायला मजा येते .
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Sun, 07/01/2018 - 16:09 नवीन
बेल्जियम, क्रोएशिया यांसोबत कालचे विजेते फ्रांस आणि उरुग्वे चांगले संघ आहेत. फुटबॉल हा 'वन मॅन शो' गेम नाही हेच कालच्या दोन्ही सामन्यांनी दाखवून दिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोमनाथ खांदवे
R
Ranapratap Sun, 07/01/2018 - 16:17 नवीन
स्पेन 1-0 ने पुढे, रशियाचा स्वयं गोल
  • Log in or register to post comments
R
Ranapratap Sun, 07/01/2018 - 16:49 नवीन
स्पेन गोलक्षेत्रात स्पेनच्या खेळाडुकडून हँड झाल्यानं रशियाला पेनलटी किक मिळाली व ती रशियाने सत्कारणी लावली.
  • Log in or register to post comments
R
Ranapratap Sun, 07/01/2018 - 18:34 नवीन
30 मिनिटाच्या ज्यादा वेळेत गोल न झालेने निकाल पेनलटी शूट आउट वर, स्पेन च्या टिकी टाका खेळास रशियाचे चोख प्रतियतुर
  • Log in or register to post comments
R
Ranapratap Sun, 07/01/2018 - 18:39 नवीन
स्पेन ने एक पेनलटी किक घालवली
  • Log in or register to post comments
R
Ranapratap Sun, 07/01/2018 - 18:45 नवीन
पेनलटी शूट आउट मद्ये स्पेन च्या 2 किक हुकल्या, रशिया 4-3 ने विजयी
  • Log in or register to post comments
न
निशाचर Sun, 07/01/2018 - 18:45 नवीन
रशियाची जीत! एकामागोमाग एक धक्के..
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Sun, 07/01/2018 - 18:50 नवीन
आता स्पर्धेत मजा यायला लागलीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशाचर
S
sagarpdy Sun, 07/01/2018 - 20:05 नवीन
क्रोएशिया डेन्मार्क ५ मिनिटात १-१. ही मॅच पण बघायला मजा येणार
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा