Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उगाच वणवा भडकलेला , गजरेवालीने त्यात टाकली माती

ख — खिलजि, Fri, 06/01/2018 - 09:46
मी इकडून आलो ती तिकडून आली मी बघताच थांबलो पण ती निघून गेली सुस्कारा सोडत वर बघितले हळूच इकडेतिकडे बघितले दुसरी मटकत येतच होती ती पण न बघताच निघून गेली कैक आल्या वाटेवरती अशाच गेल्या वाटेवरुनी अजून एक दुरुन येत होती चालता चालता लाजत होती काय होतंय ते काहीच कळेना उगाच छाती धडधडत होती गजरा सुंदर माळलेला चेहरा कोमल उजळलेला लटके झटके बघुनी सारे भाव मनातील पिसाळलेला जवळ येऊनि मला म्हणाली काका, घड्याळात वाजले किती ? गेली दीडफूट आत खोल गेली ताणलेली छाती पार गळून गेली उगाच वणवा भडकलेला गजरेवालीने त्यात टाकली माती कितीतरी गेल्या वाटेवरून देवा एकतरी माझ्यासाठी मिळायला हवी होती सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
6514 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ट
टवाळ कार्टा Fri, 06/01/2018 - 14:41 नवीन
=)) या निमित्ताने आमच्या सरांची सखू आठवली
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Sat, 06/02/2018 - 09:06 नवीन
धन्यवाद टका साहेब . हि सरांची सखू कुठे वाचायला मिळेल बरं . सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 06/02/2018 - 10:06 नवीन
सखू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
ख
खिलजि Sat, 06/02/2018 - 10:12 नवीन
उघडत नाही आहे साहेब हि लिंक . शोधतो आणि वाचतो . धन्यवाद प्रतिसादाबद्दल .
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 06/15/2018 - 00:58 नवीन
जवळ येऊनि मला म्हणाली, काका, घड्याळात वाजले किती ?
याचे उत्तर काय दिलेत ? Image removed.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 06/15/2018 - 01:06 नवीन
हीच का ती गजरेवाली ? Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा