Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ये रे ये रे पावसा

अ — अनन्त्_यात्री, Fri, 06/01/2018 - 14:57
मोरांपासून बेडकांपर्यंत सारे आकाशाकडे डोळे लावून बसलेयत तुझ्या वर्षावात चिंब व्हायला अभिजात कवींपासून र ट फ शब्दजुळार्‍यांपर्यंत सगळे टपलेयत तुझी रिमझिम अन् आपापल्या उबळी शब्दात कोंबायला बकाल महानगरातली पाताळधुंडी माणूसगिळी मॅनहोलं कचरतायत तुझ्या ढगफुटीत तुंबायला. यंदा तरी भरभरून येशील? बघ, तुझ्या आशेवर तर पार भेगाळलेला शेतकरी तयार आहे पुढच्या दुष्काळापर्यंत आत्महत्या लांबवायला.

प्रतिक्रिया द्या
4400 वाचन

💬 प्रतिसाद (12)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/01/2018 - 15:14 नवीन
सर्व मिपाकरांना, सर्व पाऊस कविंना, पावसाची वाट पाहणा-या सर्व शेतक-यांना, सामान्य जनतेला पहिल्या पावसाच्या तहेदिलसे शुभेच्छा....! 'भाव अत्तराचे आज पार कोसळले' 'थेंब पावसाचे जेव्हा मातीत मिसळले' 'ल' आलं लं.......! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 06/01/2018 - 20:56 नवीन
वा वा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 06/02/2018 - 06:19 नवीन
लहान पणी पाउस मजेदार असतो शाळेला सुट्टी मिळते म्हणून तो आवडतो जरा मोठं झाल्यावर तो रोमँटीक होतो ती बरोबर असताना तो येतच रहावासा वाटतो त्या नंतर मात्र काही दिवस त्याचा वैताग येतो कारण तो ऐने वेळी येउन तो ऑफिसची वेळ चुकवतो आणि म्हातातपणी तो परत तारुण्याच्या आठवणीत रमून जातो ती जवळच असल्याचा क्षणभर का होईना पण अनूभव देउन जातो हा पाउस ना मोठा बहूरुपी असतो असतो तोच पण प्रत्येक वेळी नव्या रुपात समोर येतो त आला त पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अभिजीत अवलिया Sat, 06/02/2018 - 13:42 नवीन
'भाव अत्तराचे आज पार कोसळले' 'थेंब पावसाचे जेव्हा मातीत मिसळले'
वा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट
टवाळ कार्टा Fri, 06/01/2018 - 17:35 नवीन
"ये रे ये रे *सा" असे एक लैच विस्फोटक इडंबन डोक्यात आलेय....लिहिले तर आयडीला पंख लागायचे =))
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Sat, 06/02/2018 - 09:00 नवीन
सर इथे न मागता मुभा घेतोय , असं म्हणा चान्स घेतोय . रांगोळी आलीय का ते सांगा ? तो वाट पाहता होता आज येईल, उद्या येईल नेहेमी शेतात नांगर नांगर खेळायचा सोबत कुणी नसलं तरी बैल असायचं राबत कुणी नसलं तरी त्ये खेळायचं उपसून उपसून माती लालबुंद झाली आणि नांगरही लालबुंद झाला ऐकल्या होत्या बातम्या चहूकडून त्याच्या आगमनाच्या पण त्यो यायच्या आधीच , धनी मात्र झाडाला लटकला सरकार आलं , छत्र्या घेऊन , सांत्वनासाठी पाऊस रिपरिप पडत होता त्यो अस्साच झाडाला लटकलेला पंचनामा त्याचा चालू होता पाऊस असेल कुणासाठी काही और पण एकमात्र नक्की जरा उशिरा पडला तर बळीराजासाठी बनतो काळजाचा घोर सिद्धेश्वर विलास पाटणकर र आला " र "
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 06/02/2018 - 13:20 नवीन
गुंतडा सोडून पावसात भिजायला लोणावळ्याला गेलो नाही येता जाता भिजलो तर त्याची खंत नाही मी चर्चा केली नाही,पण उपेक्षा पण केली नाही पाऊस इमानेइतबारे येत राहीला कधी वेळ गाठून कधी वेळ काढून मी भिजत राहीलो ऐन उन्हाळ्यात, तुझ्या आठवणींच्या चिंब वर्षावात, पाऊस नसतानाही हा आलाय अभ्या
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sun, 06/03/2018 - 08:00 नवीन
देणार्‍या सर्वांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 06/05/2018 - 12:27 नवीन
येरे येरे पावसा तुला देतो पेट्रोल
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 06/05/2018 - 13:26 नवीन
का नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 06/05/2018 - 12:27 नवीन
येरे येरे पावसा तुला देतो पेट्रोल
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 06/05/2018 - 12:35 नवीन
नवविवाहित पत्नीने स्नान झाल्यावर ओले रेशमी कुंतल झटकत "अहो"च्या चेहे-यावर ४ नाजूक थेम्ब उडवावेत तेव्हढाच पाऊस पुण्यात पडला
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा