पाककृती

नाचणीचे लाडू

Primary tabs

नाचणीचे लाडू

साहित्य -

नाचणीचे पीठ अर्धी वाटी
ओले खोबरे किसुन २ चमचे
शेंगदाण्याचा कूट ४ चमचे
गूळ गरजे नुसार

नाचणीच्या पिठात पाणी घालून त्याची भाकरी / टिक्की करुन घ्यायची. ती तव्यावर भाजून घ्यायची.

मिक्सरमध्ये भाकरीचे तुकडे, ओले खोबरे , कूट आणि गूळ घालून मस्तपैकी फिरवावे. मिश्रण तयार होते. त्याचे लाडू बांधावेत. एखादा चमचा तूप टाकल्यास चालेल.

वेलची, ड्राय फ्रूट , तीळ , भाजलेली मेथीदाणे एखादा चमचा , खजूर इ इ इ अ‍ॅड करता येईल.

नाचणीच्या पिठाच्या लाडवाच्या अनेक पद्धती दिसतात. पीठ भाजणे, त्यात गूळाचा पाक करुन घालणे. गुळाच्या पाकात नाचणी पीठ घालून तव्यावर गोळा करणे . इ इ
ही पद्धत त्यातल्या त्यात एकदमच सोपी वाटली.

नाचणीच्या पिठाचे तिखट पदार्थ ( डोसे, उत्तप्पा, उपमा, भाकरी, थालीपीठ इ इ ) गरम असतानाच खायला चांगले वाटतात. त्यामुळे त्याना स्टोरेज लाइफ नाही. हे लाडू दोन चार दिवस तरी टिकु शकतील.

ladu

पद्मावति

सोपी वाटतीय पाकृ. आणि वेगळीच पद्धत

असेच म्हणते. मस्तच.

manguu@mail.com

चवीला मस्त झाले आहेत

एस

छान आणि सोपी पाकृ.