अंड्याचा रस्सा
Primary tabs
चावट रश्श्याच्या धाग्यात बर्याच लोकांनी माझ्या आजीची ही रेसिपी देण्याचा आग्रह केला सो काल केला अंड्याचा रस्सा !
जमवाजमव एकदम सिंपल. हा एक झटपट रस्साच आहे म्हणा ना :)
तर एक (च) अंडे, बोटाच्या पेराएवढं आलं, ४-५ लसूण पाकळ्या, ४-५ चमचे ओले खोबरे, १ चमचा तीळ आणि अर्धा चमचा जिरे, एक मध्यम कांदा बारीक चिरून. कोथिंबीर बारीक चिरून.
१ चमचा कोल्हापुरी चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ, आणि थोडी हळद. फोडणीसाठी तेल, जिरे मोहरी. झाले साहित्य. सगळी मापे आजीच्या हिशेबाने दिलीत बरं ;)
आता पहिले अंडं भरपूर फेसून ठेवायचं.
मग आले, खोबरे तीळ आणि जिरं यांचं बारीक वाटण करून घ्यायचं. लसूण भरड ठेचून बाजूला ठेवायचा. वाटणात नाही घालायचा. नाही तर खमंगपणा जातो.
मग भांड्यात अंमळ सढळ हाताने तेल सोडून ते तापल्यावर चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या यचा. मग ठेचलेला लसूण घालून लगेच हळद व वाटण घालून परतावे. मग कांदा-लसूण मसाला घालायचा, त्यातच चिरलेली कोथिंबीर आणि एक ते दीड फुलपात्र भरुन पाणी घालायचं.
पाण्याला उकळी आली की मीठ घालून झाकण ठेवून २ मिनिटे ठेवावे. मसाला मुरला की झाकण काढून फेसलेल्या अंड्याची बारीक धार एका हाताने त्यात सोडावी आणि दुसर्या हाताने एकसारखे ढवळत रहावे. पूर्ण अंडे घालून झाल्यावर ढवळणे बंद करून झाकण न ठेवता २ मिनिटे उकळू द्यावे.
गरमागरम अंड्याचा रस्सा तय्यार आहे ! शक्यतो भाकरी बरोबरच खावा.
संध्याकाळी गडबडीत केल्यामुळे स्टेपवाईज फोटो काढायला जमले नाही. या एकावरच समाधान मानून घ्यावे :D

अंड कुणी बनवून दिलं तरच खाऊ शकते, त्यामुळं कुणाला तरी कामाला लावलं पाहिजे ;)
बुकमार्कच करून ठिवलाय!. करणार लगीच जमल तवा.
झकास. धन्यवाद.. आणखी रस्से येऊदेत. रस्सा सीरीजची वाट पाहतोय जागुताईच्या मासे सीरिजप्रमाणे.
अहो हे असं दुपारच्या वेळेला बघून पॉट खालीखाली वाटू लागत . पण रस्सा जरा कमी केला असं वाटत . भरपूर भूक लागली आहे आणि हे सुंदर चविष्ट चित्रण . एक काम करतो आज मंगळवार आहे , खाऊ शकत नाही तेव्हा याची झेरॉक्स काढतो आणि ती समोर ठेवून डोळे मिटून जेवतो . कसं ..
करून बघतो. धन्यवाद.
आली का पाकृ? धन्यवाद. करून बघणार.
२-३ अंडी घातली तरी चालेल नाही का? की जास्त दाट होईल?
मसाल्याचे प्रमाण पण वाढवावे लागेल ना जरासे?
एक अंड्याचा अदमासे तीन जणांना पुरतो. २ किंवा ३ घातली तर वाटण त्या प्र माणात वाढव.
नीट ढवळता यावा म्हणून मी भांडे जरा मोठेच घेतले होते. त्यामुळे रस्सा कमी वाटतोय :)
ओके, करून सांगते.
चविष्ट दिसतय. भाताबरोबरही छान लागेल.
बेसन पिठाचे केले जाईल
बाकी मीही काय घातले की चवसाधर्म्य राखले जाईल याचा विचार करतेय
गरम पाण्यात कच्च्या कुरड्या (थोडया चुरून) थोडावेळ भिजवून ह्या रश्यात घालून शिजवल्या तर कुरडईची भाजी मस्त जमेल, त्याशिवाय रश्यात धार सोडून शिजवलेल्या अंड्याशी 'टेक्सचर साधर्म्य' दिसेल ते वेगळेच.
आमच्याकडे अंडाकरीत हाफ हाफ अंडी टाकतात. पिवळा बलक वाला एक भाग आणि पांढरा भाग असे वेगवेगळे होतात, त्या पेक्षा त्याला किसून टाकलं पाहिजे असं वाटतं.
बाकी, पाकृ छान. अजुन येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
खायला कधी येऊ ते बोल. बाकी थोड्याफार फरकाने आमच्या घरी उकडलेल्या अंड्याची भाजी करतात.
आज च करते! वाट च पाहत होते.
वाह छान ...ह्यातच उकडलेली अंडी टाकली कि एग रारा ....
चिकन किंवा मटण रारा मध्ये चिकन/मटण खिम्यात चिकन /मटणाचे तुकडे शिजवले जातात... त्याच धर्तीवर एग रारा ... :-)
विकेंडी नक्कीच करून बघतो!!
.
बुर्जी पेक्षा याचे टेक्स्चर व कन्सिस्टन्सी वेगळी आहे.
कांदा लसूण तिखटाऐवजी जर मालवणी मसाला घातला तर चालेल का? (रंगाला वरतून काश्मिरी मिर्ची पावडर घालता येईल)
मालवणी काभी अपना एक अलग टेस्ट रहेगा ना :)
बेस्ट. पाककृती आवडली. या विकेंडला करून बघणार. ते सावकाश बारीक धारेने ओतायचे जमायला हवे फक्त.
ही पाकृ अंडे न घालता करता येईल का?
महागाईच्या दिवसात परवडेल असा काही उपाय सांगा....
पैजारबुवा,
हे जबर !!!!!!!
जबऱ्या फोटू
लिटरभर लाळ गळली! (जुन्या मिपाटाइप प्रतिसाद).
वाव !
कलर भारी आलाय :)
मस्त पाककृती! उद्या ईद च्या मुहूर्तावर करून बघतो
मस्त,स्नेहांकिता,वेगळाच प्रकार,आतापर्यंतआंदो उकडून,किंवा कढत सोडून ,किंवा ऑम्लेट रश्श्यास्ट घालून रस्सा केला/खाल्ला होता,आता असाही करून/खाऊन पाहीन.
अंडी, असे वाचावे.
लोखंडाच्या कढईत केल्याने चव अजून खुलून आली, ओले खोबरे नव्हते पण सुक्या खोबऱ्याचा किस घातला होता
भाकरी नव्हती म्हणून चपाती बरंच वरपला
टेस्ट आवडली का ?
मी मालवणी मसाला वापरला होता, कोल्हापुरी मसाला हाय घरी फुडं कधीतरी त्यो वापरून बघायला येईल करून. दुसरं म्हंजे मी अंडी रश्यात घालताना धार नीट बारीक नाय धरू शकलो, त्यामुळं थोडा जास्त सरबरीत झालता रसा पण टेस्ट लैच जबरदस्त.
म्हणजे कच्चं अंडं फोडून रश्यात घालणे एक प्रकार झाला, जर अंडं फेटून कोरी बिना मसाला मीठ भुर्जी सरबरीत भाजून रश्यात घातली तर? जमेल का?