Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पदर

क — कहर, Tue, 06/05/2018 - 10:13
युष्या मला तुझी खबर मिळू दे केलेल्या सर्व नोंदीची बखर मिळू दे प्रेमरोगी कधी होत नाही बरा औषधाच्या नावावर जहर मिळू दे जन्म जावो उभा वाळवंटी फिरून अंत समयी परी तुझे शहर मिळू दे काट मारल्या स्वप्नांची खाडाखोड सारी कागद कोरा कराया रबर मिळू दे नको ती ठाम काळ्या धोंड्यावरली रेष मिळणारा हर क्षण जर-तर मिळू दे वाट पंढरीची सरता सरे ना झाली विठुनामी अमृताचा गजर मिळू दे मंजूर आहे मरण अगदी या क्षणीही एक तुझी हळहळती नजर मिळू दे किनाऱ्यावर आता नाही राहिली मजा खोल आत ओढून नेणारी लहर मिळू दे सात जन्म संपत आले गोष्ट तरी बाकी सोबतीचा अजून एखादा प्रहर मिळू दे काहीच यातले वा नको तुझ्या कुशीत लपायला तुझा फक्त आई पदर मिळू दे

प्रतिक्रिया द्या
4244 वाचन

💬 प्रतिसाद (5)
श
श्वेता२४ Tue, 06/05/2018 - 10:46 नवीन
शेवटच्या दोन ओळी का कुणास ठाऊक शोभत नाहीत असं वाटलं. त्या दोन ओळी सोडून बाकी छान लिहीलय. खरं तर याही ओळी छान आहेत फक्त त्या वरच्या आशयाला शोभत नाहीत असं वाटलं. माफ करा
  • Log in or register to post comments
क
कहर Tue, 06/05/2018 - 20:34 नवीन
अगदी बरोबर आहे. गझलेच्या नियमानुसार प्रत्येक शेर स्वतंत्र हवा.. आणि शेवटच्या शेराने ही गझल नियमबाह्य होते. लिहिताना लक्षात आले पण तुम्हाला वाटले तसेच तो एक स्वतंत्र शेर म्हणून तसाच राहू दिला.. कविमनाच्या समाधानासाठी ☺
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
श
शाली Wed, 06/06/2018 - 09:23 नवीन
छानच! प्रत्येक शेर मस्त.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 06/11/2018 - 14:13 नवीन
छान झाली आहे . मस्तच सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/11/2018 - 14:34 नवीन
केवळ अप्रतिम !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bho Shambo Shiva Shambo by Lakshmy Ratheesh & Radhika Venugopal
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा