Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुझे डोळे

क — कौस्तुभ आपटे, गुरुवार, 06/07/2018 - 19:17
सागर पिंजुन रत्न बिलोरी असतील आणले अन जीवनाचे सार ओतुनी भरले चांदणे घडवूनी क्षणभर देव असावा अचंबित ज्यांपूढे तुझे डोळे ...तुझे डोळे ... हे असे ...तुझे डोळे ॥धृ॥ मुग्धता कधी सुमनांची, चारुता कधी चंद्राचि, नयनातुन ती सांडते. गुढता गहन कोड्याची, कल्पना नव्या कवीतेची, नजरेतुन ती मांडते. या तुझ्या लोचनी, खोल गेलो किती, तरीही त्रुप्ती मना ना मिळे. बाळ तान्हे कुणी, मधुरसे हासुनी, जैसे लळा लावते गोजीरे गोजीरे.. तुझे डोळे ..तुझे डोळे ... हे असे ॥१॥ स्वप्न हे कितीक स्वप्नांचे, अंजने आणिक सुरम्यांचे, विरघळावे तुझ्या लोचनी. साकडे तुला अश्रुंचे ढळू नको कधी दुखा:ने मरण यावे तुझ्या पापणीत अंबरीचा वसा, निखळल्या तारका, जणू ह्या चक्षुंतुनी साचले. तव नेत्रांची सुधा, जी मिळे तो सोहळा, म्हणुनी झुरती किती बापुडे बापुडे...तुझे डोळे ..तुझे डोळे ... हे असे ॥२॥ गीत- कौस्तुभ https://www.youtube.com/watch?v=SC920jcJQx4 हे गाणे मी नुकतेच youtube वर प्रकाशीत केले आहे. वरील लींक वर ते ऐकता येईल.ह्याचे गीत आणि संगीत माझे असून मझा मित्र निखिल श्रीधर ने ते गायले आहे. तरी आवडल्यास किंवा काही सुचना असल्यास जरुर कळवा. धन्यावाद.

प्रतिक्रिया द्या
9454 वाचन

💬 प्रतिसाद (19)
प
प्राची अश्विनी Fri, 06/08/2018 - 08:29 नवीन
छान झालंय.
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ आपटे Sat, 06/09/2018 - 08:31 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
श
श्वेता२४ Fri, 06/08/2018 - 11:13 नवीन
.
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ आपटे Sat, 06/09/2018 - 08:31 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
व
विशुमित Sat, 06/09/2018 - 08:50 नवीन
गाणे ऐकले ... मस्त झाले आहे. निखिल श्रीधर छान गायले आहे.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 06/09/2018 - 09:11 नवीन
छान झाले आहे गाणे. आवडले.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 06/09/2018 - 11:22 नवीन
खुप सुंदर.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Sat, 06/09/2018 - 11:47 नवीन
मस्त खूप सुंदर
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ आपटे Sat, 06/09/2018 - 16:44 नवीन
धन्यवाद.आवडल्यास शेअर करा
  • Log in or register to post comments
T
Topi Sat, 06/09/2018 - 19:43 नवीन
छान आहे
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ आपटे Sun, 06/10/2018 - 14:12 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Topi
म
मदनबाण Sun, 06/10/2018 - 05:53 नवीन
गाणे ऐकले, छान आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बादरवा बरसनको आये... :- Irish Malhar
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ आपटे Sun, 06/10/2018 - 14:12 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ख
खिलजि Mon, 06/11/2018 - 09:54 नवीन
छान झालंय. या पावसाच्या सरींमध्ये खूप छान वाटलं ऐकताना . सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Mon, 06/11/2018 - 18:23 नवीन
आवाज आवडला. संगीत यथातथा आहे. काव्य सुमार आहे. प्रयोग (सर्जन) काय आहे हे कळले नाही. प्रतिक्रिया थेट असली तरी नाउमेद होऊ नका. प्रयत्न स्तुत्य आहे. तुमच्याकडून अजून दर्जेदार गाणी ऐकायला मिळोत ही सदिच्छा!
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ आपटे गुरुवार, 06/14/2018 - 19:30 नवीन
मला माहीत्ये मी फार चांगलं लिहीत नाही. मला चालीवरच सुचते...त्या मुळे काही मर्यादा येतात..पण 'सुमार' हा शब्द फारच लागला...सुमार म्हणजे फारच टाकाऊ असा मला समजलेला अर्थ आहे.उदा. सुमार बियाणे , सुमार माल इ. असो मला इथे कोणताही बचाव करायचा नाही :)...पण कुणाला आपल्या काव्यासाठी असा शब्द वापरावासा वाटावा ही मझ्यासाठी चिंतनाची बाब आहे...आणि ते चालू झाले आहे...म्हणून तुमचे आभार...अशा परखड प्रतिक्रिया देणारे दुर्मीळ...तुमच्या या प्रतिक्रियेला मी टाकिचे घाव समजतो आणि माझ्या पुढील कलाकृतीला देवपण येईल अशी आशा बाळागतो :) -धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर
श
शाली Wed, 06/13/2018 - 07:15 नवीन
वाचून ठिकठाक वाटली कविता. पण ऐकायला मात्र खुपच आवडले गाणे. मस्तच झालय. छान!
  • Log in or register to post comments
श
शाली Wed, 06/13/2018 - 07:18 नवीन
lyrics ऐवजी छान व्हिडीओ क्लिप्स असत्या तर आणखी छान वाटले असते.
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ आपटे गुरुवार, 06/14/2018 - 19:33 नवीन
व्हिडिओ बद्दल विचार चालू आहे.. लवकरच तोही रिलीज करण्याचा प्रयत्न करू....प्रतिक्रिये बद्द्ल आणि सुचनेसाठी धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाली
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा