Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फलीत

क — कहर, Sat, 06/09/2018 - 17:11
पाळते तू टाळतो मी ही जगाची रीत का जी बनवणाऱ्यास होता भेटला प्रेषित का काय त्या सांजेस त्याचे शब्द होते संपले अर्धवटसे वाटते आहे मला हे गीत का भंगले याच्यात काही खंगले याच्यात काही दंगले होते जयात ही ती अघोरी प्रीत का नाक डोळे ओठ कुंतल वर्णिले गेले किती नाद नाही हो जयाविन कान दुर्लक्षित का घाव सोसून देव होतो वेदनेतून हो सृजन अन दुःखी होताच मन जन्म घे संगीत का खोडले तव नाव आणि वाचली कविता पुन्हा तीच कविता भासते आहे अशी विपरीत का बंदी झाली बंदी गेली वाढली किंमत जरा जे खिशाला परवडेना ते म्हणू जनहित का उतरता उन्माद कळले एकटाच रणांगणी मित्र नाही आप्त नाही ही म्हणावी जीत का ओळ आहे खूप साधी वाच अन सोडून दे शोधते आहे तयातील अर्थ तू गर्भित का घटना आरोप मोर्चा बातमी भाषणे नि चर्चा सावकाश विसरण्याचा तोच क्रम नियमित का पाहणी केली तयांनी साक्ष घेतली नोंदवून काढले फोटो.. निघाले.. पुढे लालगी फीत का धुण्याआधी थाळीे तू घे तपासून एकदा त्यात कृष्णाच्या नावाचे उरले आहे शीत का अग्नीत प्रवेशताना वदे रामास सीता जपले शील तुझ्यास्तव हे त्याचे फलीत का

प्रतिक्रिया द्या
4650 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ए
एस Sun, 06/10/2018 - 16:12 नवीन
गझल बरीच गुंतागुंतीची वाटली. का कुणास ठाऊक.
ओळ आहे खूप साधी वाच अन सोडून दे शोधते आहे तयातील अर्थ तू गर्भित का
हा शेर आवडला.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 06/11/2018 - 09:52 नवीन
एस जी म्हणतात त्याप्रमाणे खरंच गुंतागुंत वाढली आहे . माफ करा पण मी आपली गझल खालीलप्रमाणे जुळवली आहे आणि देत आहे . राग मानू नका , हलकेच घ्या ओळ आहे खूप साधी वाच अन सोडून दे शोधते आहे तयातील अर्थ तू गर्भित का इथपर्यंत मला आवडली पण पुढे थोडी सैल झाली म्हणून मी खालील प्रमाणे जशी मला योग्य वाटली तशी बनवली आहे . राग नसावा .. अर्थ साधा मीही साधा भासतो का वेगळा इशारे कळूनही तुजला आज मी अपरिचित का बीज बोता अंकुर फुटले वृक्ष त्याचा जाहला लगडली फळे विखारी हेच त्याचे फलित का सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
क
कहर Mon, 06/11/2018 - 17:05 नवीन
आपल्या निर्भेळ प्रतिसादासाठी धन्यवाद. काही शेर लयीत आणण्यासाठी नक्की प्रयत्न करेन. वरील प्रतिसाद वाचून एक नवीन शेर सुचला दूर तू अन दूर मी राहिली कुठली कमी भेट ना घडे या जन्मी ही अंतरे शापित का
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 06/12/2018 - 09:41 नवीन
वा खुप छान ...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 06/12/2018 - 20:00 नवीन
घाव सोसून देव होतो वेदनेतून हो सृजन अन दुःखी होताच मन जन्म घे संगीत का वा...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मागू कसा मी अन् मागू कुणा,माझी व्यथा ही समजावू कुणा... :- भिकारी
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा