Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खरी वाटते, पूरी वाटते

क — कहर, गुरुवार, 06/14/2018 - 05:42
खरी वाटते, पूरी वाटते, जवळ असून ती दूरी वाटते भितो तुला मी, नको मजवरी ऐशी रागावूस प्रिये क्षणभर समशेरीसम मजला तुझ्या हातची सूरी वाटते हरेक सुंदरी समोर असता, हीच फक्त माझ्यासाठी पण हवेत विरते, कणी न उरते, जातच ही कर्पूरी वाटते सारे लिहिले, तारे लिहिले, शेवट ना परी मनासारखा तुझे नाव टाळतो म्हणूनच गोष्ट जरा अधुरी वाटते तू असताना सुचे न काही, आठवांनी पण भरे वही काय करू मी? हाय! तुझ्याहून याद तुझी कस्तुरी वाटते सखे आज तू मला तुझे नि गगनाचे या नाते सांग कशी तुझ्यासोबत असताना , सांज अजून सिंदूरी वाटते कानामध्ये रुंजी घालत आहे अजून होकार तुझा आता वाजू दे काही मजला ती कृष्णाची बासुरी वाटते काय तुझी एकेक अदा.. जग होय फिदा त्यावरी परी हृदयतोडीतील सहजपणाची अदा थोडीशी बुरी वाटते -विशाल (०७/११/२००९)

प्रतिक्रिया द्या
2255 वाचन

💬 प्रतिसाद (1)
श
शाली Sat, 06/16/2018 - 11:50 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा