Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कितीसा पुरोगामी आहेस ?

म — माहितगार, Tue, 06/19/2018 - 06:28
(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी) कमिटेड टू हूम कमिटेड टू व्हॉट पुरोगामी पुरोगामी कितीसा पुरोगामी आहेस ? तुझ्यासाठी आपले कुणीच नाही तूला तू त्यांचा आहेस असे वाटते तेही फसवे नसते का ? आपल्यातल्या आपल्यांचा होऊ शकला नाहीस त्यांचाही होऊन रहाणे खरेच जमेल का तूला ? आणि तूही कुणाचाच नाहीस हेच खरे नसते का ? त्यागी आहेस हे बरे आहे एका अर्थाने आपल्या अंगच्या वस्त्रांचाही त्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे जंगलात जाऊन कायमचा एकांतवास अनुभवून पहाशील का ? पूरोगामीत्व निवांतपणे अनुभवण्याचा आणि अनुभवू देण्याचा तो सर्वोत्कृष्ट पुरोगामी मार्ग आहे ना स्वतःस पुरोगामी सिद्ध करण्याचा तोच तू स्विकार ! . . . . * कवितेच्या मर्यादीत ओळी वापरण्यास हरकत नाही, पण शक्यतो सुयोग्य संदर्भ अबाधीत रहावे म्हणून पूर्ण कवितेचा मिपा दुवा (https://www.misalpav.com/node/42844) सोबत जोडत जावा अशी अपेक्षा आणि विनंती आहे. आ.न. माहितगार

प्रतिक्रिया द्या
2855 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा