'व्हेअर द माईंड इज विदाऊट फिअर' कवितेचे अनुवाद
मी अलिकडे मिपावर कितीसा पुरोगामी आहेस ? हि कविता लिहिली. :) (त्या कवितेची प्रेरणा विशीष्ट मिपाकर आहेत असे वाटण्याचा संभव आहे :), तसे खरे असण्यास हरकत नव्हती :) पण त्यांच्या दुर्दैवाने -ते दुर्दैवावर विश्वास ठेवत नसलेतरी आम्ही ठेवतो :) - त्या कवितेची तात्कालीक प्रेरणा अभारतीय आमेरीकन व्यक्तीचे अभारतीय विषयावरचे लेखन आहे :( )
कितीसा पुरोगामी आहेस ? कवितेस तुम्ही पुरोगाम्यांनाच का टार्गेट करता परंपरावाद्यांना का नाही असा एक तरी प्रतिसाद यावा अशी राहून राहून इच्छा होती. :) असा प्रतिसाद न झाल्यामुळे मी जरासा अंधश्रद्ध झालो आहे . :) मिपा पुरोगामी मंडळींना खास करून नास्तिकांना ह्या कवितेची प्रेरणा अभारतीय आमेरीकन असल्याचे दैवी शक्तींकडून उमजले असावे असा माझा वहम होऊ लागलेला आहे :) पण ऑदर वाईज केवळ पुरोगाम्यांना टार्गेट न करता परंपरावाद्यां विरुद्धही काही लिहीले जावे हे त्यांना आवडेल हे आम्हाला मात्र दैवी शक्तींकडून कळोन आले :)
आणि म्हणून रविंद्रनाथ टागोरांच्या माझ्या आवडत्या :Where the mind is without fear; या कवितेचा अनुवाद होऊन पुरोगाम्यांवरही परंपरावादी प्रेमाचा वर्षाव व्हावा अशी मनोमन इच्छा करून , सदर कवितेचा अनुवाद करून द्यावा अशी स-आदर विनंती करतो.
तसे माझ्या टिकेच्या फटकार्यातून सहसा कुणीच सुटत नाही मग टागोरांना का अपवाद करावे, म्हणून नजर काढणारा एक तीट लावलेला बरा. विश्वबंधूत्व मानणारे टागोर, एवढी पुरोगामी कविता let my country awake. म्हणून केवळ भारतीयांसाठी का राखीव करतात (त्याचेही भारतीय अंध-पुरोगामी उत्साहाने समर्थन करतील पण ) ते आमच्या परंपरावादी डोळस मनास पटणारे नाही. आमचे परंपरावादी मन टागोरांच्या पुरोगामीत्वावर खटू का होत नाही याचा पुरोगाम्यांना रास्त सम्शय येऊ शकतो आणि असा संशय आल्यास या संशयास आधार देणारे तथ्य म्हणजे पुरोगामी टागोर सुद्धा कुठे तरी एके ठिकाणी म्हणतात, 'कोणताही वृक्ष त्याच्या मूळांपासून तोडून घेऊन बहरू शकत नाही.' म्हणून आमचे टागोरांवर निरतीशय प्रेम आहे आणि टागोरांनी त्यांचे प्रेम या कवितेतून पुरोगाम्यांवर करून आदर्श भारतीय परंपरेचे पालन केले आहे.
अलिकडील काळातील एक भारतीय परंपरावादी नेते म्हणालेत , ' आम्ही कट्टर आहोत ते केवळ उदारतेत, आमची उदारता कट्टर आहे' या कट्टर उदारतेने आमच्या परंपरावादी मिपा मित्रांनी या कवितेच्या अनुवादात साहाय्य करावे अशी नम्र विनंती पुन्हा एकदा.
Title: Parthana or A prayer
Where the mind is without fear and the head is held high;
:Where knowledge is free;
:Where the world has not been broken up into fragments;
:By narrow domestic walls;
:Where words come out from the depth of truth;
:Where tireless striving stretches its arms towards perfection;
:Where the clear stream of reason has not lost its way;
:Into the dreary desert sand of dead habit;
:Where the mind is led forward by thee;
:Into ever-widening thought and action;
:Into that heaven of freedom, My Father, let my country awake.
मूळ बंगाली
* खालील बंगाली लिपीचे मराठी- देवनागरी रुपांतरण तपासून हवे आहे.
चित्त जेथा भयशून्य, उच्च जेथा शिर,
ज्ञान जेथा मुक्त, जेथा गृहेर प्राचीर
आपन प्राङ्गणतले दिबसशर्बरी
बसुधारे राखे नाइ खण्ड़ क्षुद्र करि,
जेथा बाक्य हृदयेर उत्समुख हते
:उत्सासिये उठे, जेथा निर्बारित स्रोते
देशे देशे दिशे दिशे कर्मधारा धाय
अजस्र सहस्रबिध चरितार्थताय,
जेथा तुच्छ आचारेर मरुबालुराशि
बिचारेर स्रोतःपथ फेले नाइ ग्रासि,
पौरुषेरे करे नि शतधा, नित्य जेथा
तुमि सर्ब कर्म चिन्ता आनन्देर नेता,
निज हस्ते निर्दय आघात करि, पितः;
भारतेरे सेइ स्बर्गे करो जागरित ৷
* रविंद्रनाथ टागोरांच्या गितांना संगित देण्याचे अधिकार पंकज कुमार मौलिक यांच्या कडे होते. पंकजकुमार मौलिकांनी संगितबद्ध केलेल्यामुळ बंगाली गीत या युट्यूबवर ऐकता येऊ शकेल.
চিত্ত যেথা ভয়শূন্য, উচ্চ যেথা শির,
:জ্ঞান যেথা মুক্ত, যেথা গৃহের প্রাচীর
:আপন প্রাঙ্গণতলে দিবসশর্বরী
:বসুধারে রাখে নাই খণ্ড ক্ষুদ্র করি,
:যেথা বাক্য হৃদয়ের উৎসমুখ হতে
:উচ্ছ্বসিয়া উঠে, যেথা নির্বারিত স্রোতে
:দেশে দেশে দিশে দিশে কর্মধারা ধায়
:অজস্র সহস্রবিধ চরিতার্থতায়,
:যেথা তুচ্ছ আচারের মরুবালুরাশি
:বিচারের স্রোতঃপথ ফেলে নাই গ্রাসি,
:পৌরুষেরে করে নি শতধা, নিত্য যেথা
:তুমি সর্ব কর্ম চিন্তা আনন্দের নেতা,
:নিজ হস্তে নির্দয় আঘাত করি, পিতঃ;
:ভারতেরে সেই স্বর্গে করো জাগরিত৷
* युट्यूबवर ए. आर. रेहमान यांच्या स्वतच्या आवाजात संगितबद्ध मूळ बंगाली + हिंदी स्वैर अनुवाद ; किंवा हेच समुह नृत्यासोबत
* उर्दू अनुवाद
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Boudi Sopner Sundori... ;)