Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्लॅस्टिक बॅन आणि सरकारी हेतुबद्दल शंका

प
प्रसाद गोडबोले
Sat, 06/23/2018 - 16:13
🗣 132 प्रतिसाद
सकाळी सकाळी व्हॉट्सॅप ओपन केले अन प्लॅस्टीकबंदीचे मेसेज धडाधड कोसळायला लागले! फायनली एकदाची प्लॅस्टिक बंदी झाली . तसे महाराष्ट्र शासनाने गुढी पाडव्याला ( की आधीच केव्हातरी ) घोषित केले होते की प्लॅस्टीक बंद करणार , कारवाई कधी सुरु होते हे च पहाणे फक्त बाकी राहिले होते ! सर्वप्रथम सर्वात महत्वाचे म्हणुन हे एक क्लॅरीफिकेशन : प्लॅस्टिक बंदी हा एक अत्यंत महत्वाचा निर्णय आहे ! खरेतर हा फार पुर्वीच घायला हवा होता पण ठीक आहे देर से आये दुरुस्त आये ! प्लॅस्टिकचा वापर शॉर्ट टर्म मध्ये अत्यंत सुलभ कंव्हिनियंट आणि आर्थिक दृष्ट्या फाय्देशीर दिसत असला तरीही लाँग टर्म मध्ये पर्यावरणाचे होणारे नुकसान आणि त्याची मोजावी लागणारी किंमत पहाता हा तोट्याचाच व्यवहार होता ! ट्रेक करताना गडकिल्यांवर पडलेल्या प्लॅस्टिकचा खच पाहुन मन हळहळायचे ! अजिंक्यतार्‍यावर अगदी लहानपणीपासुन जात असल्याने तिथे जागोजागी झालेली प्लॅस्टिक कचर्‍याची वाढ अगदी नजरेत भरण्यासारखी होती ! आमच्या पवनामाईतही लोकं प्लॅस्टिकच्या पिशव्यात निर्माल्य अन काय काय भरुन फेकताना पाहिले की डोक्यात तिडीक जायची ! काही समाजसेवी संस्था प्लॅस्टिक गोळा करायचे काम करत होत्या, मी स्वतः एकदा पुण्यातील पाषाण लेक जवळ स्वस्छता करणार्‍या ग्रुपसाठी वॉलंटीयरींग केले होते तेव्हा मात्र लक्षात आले की प्लॅस्टिक गोळाकरुन सुटेल अशी ही समस्या नाही. त्यासाठी समस्येचेच्या मुळावर घाव घालणे आवश्यक होते ! तस्मात ह्या निर्णयाचे कौतुकच आहे :)

पण

पण एकुणच दंडाची किंमत पहाता आणि दंड कोणाला लावला जात आहे हे पहाता सरकारी हेतु बद्दल शंका उत्पन्न होते ! सरकारचा हेतु पर्यावरणाचे रक्षण करणे हा नसुन सरकारी महसुल वाढवावा हा आहे असे वाटत रहाते . तसेही आपल्या देशात कायदे हे सुव्यवस्थेसाठी नसुन चिरिमिरी गोळाकरण्यासाठी आहेत हे जगजाहीर आहे ! पोलिस सोडाच हो पण आपला साधा आर.टी.ओ. जेव्हा कैच्याकै कारण काडुन तुम्हाला पावती फाडतो त्या पावतीवर स्पष्ट " तडजोडमुल्य " असे लिहिलेले असते ! शुध्द मराठीत मांडवली रेट ! शिवाय त्यांना ते कायदे लागु नसतातच , पोलिस , आरटीओ ह्यांना कित्येकदा हेल्मेट न घालता गाडी चालवलेले पाहिले आहे . दुसरे उदाहरण म्हणजे सुप्रीमकोर्टाने जनहितार्थ म्हणून हायवेच्या पासुन ५०० मिटर अंतरात असलेले दारु चे बार बंद केले , सरकारचा महसुल बुडायला लागला म्हणुन मग सरकारने पेट्रोल च्या टॅक्स् मध्ये वाढ करुन पैसा वसुल केला हे म्हणजे दारु न पिणार्‍याला देखील भुर्दंड ! थोडक्यात मुळ उद्देश ड्रिंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह अ‍ॅक्सीडेंट कमीकरुन लोकांचे जीव वाचवणे हा होता पण सरकारने त्यात सुध्दा महसुल वाढवण्याचा मार्ग शोधला! इथेही असाच काहीसा प्रकार दिसत आहे ! मुळ उद्देश प्लॅस्टीक बंदी असला तरी त्याचा वापर लोकांना पिळुन पैसावसुल करणे हाच दिसतो. ( वर्षभराने आ.टी.आय खाली , वसुलीचे टारगेट कितीहोते अन दंडाच्या रक्कमेतुन किती महसुल जमा केला ह्याची माहीती कोणीतरी काढायला हवी.) सरकारची अकाऊंटॅबिलीटी काय हे कोठेच स्पष्ट दिसत नाही ! सामान्य माणासाच्या हातात प्लॅस्टिकची पिशवी दिसली की त्याला दंड लावणार , सरकारी कार्यालयात जर कोणी सामान्य माणासाने प्लॅस्टिकचा वापर निदर्शनास आणुन दिल्यास त्याला दंडाच्या रकमे इतकी रक्कम बक्षीस म्हणुन देणार का ? शहरात कोठेही प्लॅस्टिक कचरा आढळ्यास नगरपरिषदेला , मनपा ला दंड लावणार का ? दंडाचे वसुल केलेले पैसे आधीचे प्लॅस्टिक निर्मुलनाला वापरणार की अकार्यक्षम संपखोर सरकारी कामगारांचे पगार वाढवायला अन तोट्यात असुनही बोनस द्यायला वापरणार ? तर सारांश चर्चेचा मुद्दा म्हणजे मुळ प्लॅस्टिक बंदीचा निर्णय अत्यंत कौतुकास्पद असला तरी त्यामागील सरकारी हेतु शंकास्पद आहे असे वरकरणी जाणवत आहे . तुम्हाला काय वाटते ? #उत्तरदायित्वास_नकारलागु # तुकाम्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
45630 वाचन

💬 प्रतिसाद (132)
ग
गामा पैलवान Mon, 06/25/2018 - 08:34 नवीन
साहना, फडणवीसी सरकार हे लोकांचे सरकार नसून कोणी तरी NGO त्यांच्या पत्नीद्वारे हे नसते उपद्व्याप आमच्या डोक्यावर लादत आहे. सहमत आहे. जी बंदी उत्पादनाच्या टप्प्यात घालायला हवी ती सामान्य ग्राहकाच्या पातळीवर घातल्याने शासनाच्या हेतूविषयी शंका उत्पन्न होते आहे. खरंतर जैविक प्लास्टिकच्या संशोधनास उत्तेजन द्यायला हवं. या आस्थापनाने बनवलंय तसं : http://envigreen.in/ कुठं काय करायचं त्याची प्राधान्ये सरकारने नीटपणे ठरलेली नाहीत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 06/25/2018 - 08:48 नवीन
<<<कुठं काय करायचं त्याची प्राधान्ये सरकारने नीटपणे ठरलेली नाहीत>>> ==>> ठो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 06/25/2018 - 09:34 नवीन
प्लॅस्टिकवरची बंदी ही कल्पना नवी नाही आणि मूळात सद्याच्या सरकारची नाही, ही कल्पना पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या काळात पुढे आणलेली होती पण काही कारणाने तिची अंमलबजावणी करणे टाळले होते. सद्याच्या सरकारने फक्त ती अंमलात आणण्याचे धाडस केले आहे (किंवा धडाडी दाखवली आहे, जे हवे असेल ते मानावे). जी बंदी उत्पादनाच्या टप्प्यात घालायला हवी ती सामान्य ग्राहकाच्या पातळीवर घातल्याने शासनाच्या हेतूविषयी शंका उत्पन्न होते आहे. कुठं काय करायचं त्याची प्राधान्ये सरकारने नीटपणे ठरलेली नाहीत. सरकारच्या प्राधान्यक्रमाबाबत (प्रथम वापरावर बंदी, उत्पादनावर नाही) माझा अंदाज असा... जे उत्पादन अनेक वर्षे चालू आहे त्यावर सरळ सरळ बंदी घालण्यात अनेक अडचणी असतात... त्यातली मुख्य म्हणजे त्या उत्पादनाच्या जोरावर आर्थिकदृष्ट्या सबळ झालेल्या कारखानदारांचा कोर्टात खटले लावून केला जाणारा विरोध. भारतात असे खटले अनेक दशके चालवून, त्यांच्या आड उत्पादन बिनघोरपणे चालू ठेवणे शक्य असते... अर्थात, अश्या छुप्या कारवायांनी बंदीचा बोर्‍या वाजवणे शक्य असते व बर्‍याचदा केलेही जाते. त्याविरुद्ध, त्या उत्पादनाच्या वापराला बंदी घातली तर उत्पादकांवर बंदी नसल्याने त्यांची बाजू कायदेशीररित्या पांगळी होते. तरीही उत्पादकांनी कोर्टात खटला दाखल करून बंदीवर स्टे आणण्याचा प्रयत्न केला आहेच... मुंबई उच्च न्यायालयाने स्टे ला नकार दिल्याने सद्याची बंदी व्यवहारात येऊ शकली... खटला चालू राहीलच ! :) पण... वापरावर बंदी आल्याने व तसेच, काही काळात प्लस्टिकच्या बदली सामग्री वापरून संसाधने (उदा : कागदी/कापडी पिशव्या, बायोडिग्रेडेबल प्लस्टिक, इ) बाजारात येऊन स्थिरावली की बंदी असलेल्या प्लस्टिकचा खप शून्य झाल्याने त्याचे उत्पादन करण्यात उद्योजकांना रस (आर्थिक फायदा) राहणार नाही... त्यामुळे उत्पादन आपोआप बंद होईलच ! "सबळ शत्रूला समोरासमोर तोंड न देता, त्याची रसद तोडून, जेरीस आणून संपवावे", असा शिवरायांनी शिकवलेला गनिमी कावा मला सरकारच्या या कृतीमागे दिसत आहे ! जय महाराष्ट्र ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 06/25/2018 - 09:42 नवीन
खरंतर जैविक प्लास्टिकच्या संशोधनास उत्तेजन द्यायला हवं. हे आताच उघडपणे केले तर; बंदीने ग्रस्त प्लास्टिक उद्योजक (आणि सरकारला कोंडीत घेण्यासाठी असल्या-नसलेल्या कारणाच्या शोधात असलेले राजकारणी) यांना, "बघा, बघा, हे आमचे उद्योग बंद करून आपल्या बगलबच्च्यांचे उद्योग पुढे आणत आहेत", असा कांगावा करायला कारण दिल्या सारखे होईल. भारतात प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची फॅशन जोरात आहे... तिला नजरेआड करणे वेडेपणाचे होईल. त्याऐवजी, अगोदर आणि सद्याही जैविक प्लास्टिकच्या उत्पादनाकडे काही व्यावसायिक वळले आहेतच, त्यांना या बंदीने अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळत आहेच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ज
जेम्स वांड Tue, 06/26/2018 - 07:58 नवीन
भारतात प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची फॅशन जोरात आहे... हे तर फारच जाणवते, अगदी मिसळपाववर सुद्धा!, कित्येकांना तर आजकाल राजकारण सबकॉन्शस मध्ये घुसल्यागत आपण अतीच राजकीय बोलतोय ह्याचीही शुद्ध उरत नाही. अतिशय प्रस्तुत कॉमेंट, खूप आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
व
विशुमित Tue, 06/26/2018 - 10:49 नवीन
मी तर यातून बाहेर पाडण्यासाठी उपचार घेत आहे. पण डॉक्टरांचं म्हणणं आहे की " चालू सरकार " बदलल्याशिवाय जीवाला फरक पडणे खूप अवघड आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
अ
अनन्त अवधुत Tue, 06/26/2018 - 20:09 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ह
हरवलेला गुरुवार, 06/28/2018 - 02:05 नवीन
" चालू सरकार " की " चालू " सरकार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
मार्मिक गोडसे Wed, 06/27/2018 - 13:18 नवीन
जे उत्पादन अनेक वर्षे चालू आहे त्यावर सरळ सरळ बंदी घालण्यात अनेक अडचणी असतात... त्यातली मुख्य म्हणजे त्या उत्पादनाच्या जोरावर आर्थिकदृष्ट्या सबळ झालेल्या कारखानदारांचा कोर्टात खटले लावून केला जाणारा विरोध. मुळात ही प्लॅस्टिक बंदी संपूर्ण भारतात लागू नाही. काही राज्यांमध्ये अंशतः तर काहीमध्ये संपूर्ण प्लॅस्टिक बंदी आहे. त्यामुळे कुठलेही राज्यसरकार असे उत्पादन बंद करू शकत नाही, कारण बंदी असलेल्या राज्यातील कारखाने आपले प्लॅस्टिक उत्पादन बंदी नसलेल्या राज्यात विकू शकतात. त्यामुळे राज्यसरकारचा हा गनिमी कावा वगैरे नसून हतबलता आहे. उत्पादनावर बंदी घालू शकत नसल्याने राज्यसरकारने विक्रीवर व वापरावर बंदी घालण्याचा सोपा मार्ग स्वीकारला आहे. दंडाची रक्कम बघता ती अवास्तव जास्त वाटते. ही मोहीम जास्तीत जास्त ३-४ महिने चालू राहील ह्याची राज्यसरकारला कल्पना असल्याने जास्तीत जास्त महसूल गोळा करण्याचा राज्यसरकारचा हेतू आहे. कदाचित नंतर प्लॅस्टिकबंदी मागेही घेतली जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सुबोध खरे Wed, 06/27/2018 - 16:29 नवीन
जास्तीत जास्त महसूल गोळा करण्याचा राज्यसरकारचा हेतू आहे. असा कितीसा महसूल गोळा होईल या ऐवजी पर्यावरणाचा सेस लावला( जि एस टी वर- हा लावता येतो असे एका अर्थ तज्ज्ञाने सांगितले ,कसे ते मला समजले नाही) तर त्यातून कितीतरी जास्त महसूल गोळा करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
स
सुबोध खरे Wed, 06/27/2018 - 16:41 नवीन
जे राज्य १५००० कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प सादर करते त्यात शे दोनशे कोटींनी काय फरक पडणार आहे. दोनशे कोटी म्हणजे ४ लाख लोकांकडून पाच हजार रुपये दंड वसूल केला तर येईल. हे शक्य तरी आहे का? तेंव्हा महसूल गोळा करण्याची पुडी ज्याने सोडली आहे त्याचा काही तरी अजेंडा आहे असेच म्हणावे लागेल. आणि आपले लोक भाबडे पणाने अशांवर विश्वास ठेवतात. https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/maharashtra-budget-2018-sudhir-mungantiwar-presents-state-budget-for-2018-19/articleshow/63228777.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मार्मिक गोडसे Wed, 06/27/2018 - 17:35 नवीन
जे राज्य १५००० कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प सादर करते त्यात शे दोनशे कोटींनी काय फरक पडणार आहे. जप्त केलेल्या मालावर gst चा महसूल मिळाला आहेच , आता दंडाच्या रूपाने अधिक महसूल मिळतोय. एखादी छोटी मोठी योजना किंवा एखाद्या स्मारकाला हातभार लागू शकेल. बंदी मागे घ्यायचा पर्यायही आहे सरकारकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सोमनाथ खांदवे Mon, 06/25/2018 - 08:53 नवीन
देशप्रेम , निसर्गप्रेम आणीक समाजसेवा यामदी आपल्या भारतात यकच समाज सगळ्यात यक नम्बर हाये आणि त्यांची पाळेमुळे गुजरात मदी हायेत . प्लास्टिक बंदीमुळ त्या समाजावर आन्यायच झाला हाये . प्लास्टिक करखान्याच मालक , प्लास्टिक च घाऊक / किरकोळ ब्यापारी आशी संघटना मिळून सामान्य लोकांच जीवन सुसह्य करून निसर्गामदी येगयेगळ्या रंगाची उधळण करत व्हती पण या सरकारन त्यांच पार कम्बर्ड मोडल . शेतकऱ्याकडून सतत ज्यास्त भावात माल घ्येऊन कमी भावात नाग्रीकानां दिल्या मूळ यांच्यातील हजारो लोकांनी आत्महत्या क्येल्या . पाकिस्तान आणि चीन बरुबरच्या युद्धा च्या येळेला या लोकांनी 5 पैशाचा ही काळाबाजार न कर्ता सैन्याच्या आणि जतें च्या पाठीमागे खम्बीरपने वुभे राह्यले , तसेच सैन्यभरतीत हिरहिरीन भाग घ्येतल्या मूळ ही लोक पारशी सारखे नामशेष व्हत हायेत . लोकांच्या हौसमौज ची काळजी करून सोन्याच्या ब्यापाऱ्यांनी दुकान बंद ठ्येऊन gst ला इरोध क्येला व्हता , पण सरकार न लईच रगीलपना दाखवला . सगळी दुकान , कम्पन्या आणि बांधकाम शेत्र या लोकांनी येळप्रसंगी नुसकानीत चालवून देशातील लोकांची खूप सेवा क्येली हाये . आशा लोकांच्या आडचणी आजून वाढवल्या बद्दल मी या सरकार चा धिक्कार करतो .
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Mon, 06/25/2018 - 09:13 नवीन
प्लास्टिक बंदीमूळ सामान्य माणसाच्या त्रासाची कल्पना आल्या मूळ ह्या ब्यापाऱ्याच्या समाजसेवी संघटनानीं समाजहित ध्यानात घ्येऊन नुकताच यक दिवसाचा बंद पुकारला हाये , आता तुमी त्ये त्यांच्या फायद्या साठी बंद करत हायेत आस म्हणू नगा .
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 06/25/2018 - 09:16 नवीन
https://www.biogreenbags.com https://en.m.wikipedia.org/wiki/Bioplastic https://m.indiamart.com/proddetail.php
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 06/25/2018 - 10:24 नवीन
आज घडलेला प्रसंग एकदम ताजा ताजा ... परेल येथे के इ एम रुग्णालय .. एका व्यक्तीवर प्लास्टिक पिशवी वापरल्याबद्दल दंड आकारण्यात येत होता .. बाजूलाच एक भिकारी अंगावर प्लास्टिक पिशवीचे आवरण करून हातात प्लास्टिक पिशव्यांचा मुद्देमाल घेऊन काय चाललंय ते बघता उभा होता .. एकाच्या हि गोष्ट लक्षात येता , त्या व्यक्तीने त्या भिकार्यावर देखील कार्यवाही करा म्हणून घोषा धरला .. मनपा टीम मात्र इथे नोकरदारावर हुज्जत घालण्यात गुंग होती .. जेव्हा रेटा वाढू लागला तेव्हा मात्र त्यांनी तिथून काढता पाय घेतला .. वरील प्रकारावरून तरी असे दिसतंय कि हा सारा कर उभारण्यासाठी उद्योग चालू आहे .. बाकी दुसरं काही नाही .. सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 06/25/2018 - 15:07 नवीन
+१ एक्झॅक्टली माझेही हेच म्हणणे आहे. प्लास्टिकबंदीत पर्यावरणाचा कळवळा हा नुसता दिखावा आहे , मुळ उद्देश सामान्य लोकांना पिळुन पैसा वसुल करणे हाच आहे ! कारण तो जर तसा नसता तर इतका अव्वाच्या सव्वा दंड , काहीही पर्यायी सोय न पुरवता केलेली अंमलबजावणी , शिवाय सरकारची जबाबदारी आणि सरकारी संस्था प्लॅस्टिक वापरताना आढळल्यास त्यांच्यावर होणारी कारवाई वगैरे गोष्टी आधीच क्लीयर केलेल्या असत्या. जी. एस.टी च्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे राज्यांकडे जो कर जमा होत होता त्या महसुलाचा मेजर हिस्सा केंद्राकडे जायला लागला , आता मग ही तुट भरुन कशी काढायची म्हणुन प्लॅस्टिकबंदी आणि दंड हा शोधलेला उपाय आहे असे वरकरणी दिसते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
ट
ट्रेड मार्क Mon, 06/25/2018 - 23:47 नवीन
त्या व्यक्तीने स्वतःची तुलना भिकाऱ्या बरोबर करून घेतली. काय दिवस आलेत. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी खरं तर त्याला सांगायला पाहिजे होतं की भिकाऱ्याकडून दंड घेतला नाही म्हणून तुझ्याकडून दंड घेत नाही. पण मग बाकी पण गोष्टीत पण तू भिकाऱ्याची बरोबरी करायची. अवघड आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
च
चौकटराजा Mon, 06/25/2018 - 11:19 नवीन
आकुर्डी चौकात दोन महिला वहातुक पोलिस उभ्या. त्यान्च्या समोर एक सरळ सरळ सिग्नल तोडून गेला. तेवढ्यात एक टेम्पो आला त्याला लगबगीने अडवण्यात आले. यातील खोच अशी की टेम्पो वाल्याला अगोदरच माहीत असते की हे अडवणार . तो पैसे घेउनच आलेला आहे हे पोलीसानाही माहीत असते . त्याने ते अगोदरच टेम्पो बिलात समाविष्ट केलेले असतात . तिथे विनातक्रार पैसे मिळतात व सरकारने वर टांगलेली कर दंड आकारणीच्या उद्दीष्टाची तलवार डोक्यात पडत नाही . अलीकडे दुचाकी वाल्याशी फार हुज्जत घालण्याच्या भानगडीत पोलीस पडत नाहीत . शिवाय गुप्तपणे क्यामेरा वगैरे ही भीती असतेच . भारत देश असा आहे जिथे गरीबाने काहीही गुन्हा केला तरी त्याला तो माफ असतो श्रीमंताने केला तर दोन दिवसात जामिन मिळतो व निकाल २५ वर्षाने लागतो. दंडाचे हे असे वास्तव आहे .
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 06/25/2018 - 14:28 नवीन
:-))) ये चौक बहोतही पेशल हैं चौरासाहेब ! इथं सिग्नलचे नियम पाळणारे पाळतात, न पाळणारे पाळत नाहीत, सर्रास, पोलिसांच्या डोळ्यादेखत ! अन जे पाळत नाहीत, त्यांना पोलिस काहीच करत नाहीत! हैं के नहीं ये पेशल चौक !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
न
नाखु Wed, 06/27/2018 - 04:08 नवीन
असलेले वाहतूक नियंत्रक दिवे हे शोभेच्या वस्तू असून त्याचा आपल्याशी काही संबंध नाही,अशी धारणा गाववाले,नाववाले,आणि रिक्षाचालक यांचे संयुक्त मत आहे अडाणी अभिमन्यू नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Wed, 06/27/2018 - 14:00 नवीन
व्हय नाखु ! या पिंचिंवाडीत गाववाले, नाववाले, आणि रिक्षाचालक हे किंग्ग आहेत. मनपा, प्राधिकरण, हाटिलवाले, टोलवाल, आरटीओचे लोक आणि बर्‍याच एजन्सीज यांचं जबरदस्त नेटवर्क आहे. बरीच बुडवाबुडवी चालते, बाकीच्यांना मात्र प्रामाणिकपणे रहावे लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
म
मराठी कथालेखक Mon, 06/25/2018 - 12:25 नवीन
प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी योग्य असली तरी प्लास्टिकला योग्य असे पर्याय उपलब्ध करुन मग ही बंदी घालणे योग्य ठरले असते. यासाठी काही वर्षे सरकारने संशोधन करवून योग्य ती धोरणे अवलंबायला हवी होती (जसे प्लास्टिकवर जास्त कर, विघटनक्षम प्लास्टिकसदृष उप्तादनांना कमी कर वा सबसिडी ई). पण अशाप्रकारे योग्य टप्प्यात /नियोजनबद्ध कार्यक्रम न राबवता एकदम आणलेल्या या बंदीने खूप गोंधळ माजू शकतो. या मुद्यावर राज्यात युतीला२०१९ मध्ये सत्ताही गमवावी लागू शकते.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 06/25/2018 - 12:33 नवीन
एक नंबर ... मी अगदी सहमत आहे आपल्या प्रतिसादाशी .
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 06/25/2018 - 12:44 नवीन
प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीकरिता सगळ्या महापालिकांनी नवीन कर्मचारी भरलेत का ? नसल्यास हे कर्मचारी परवापर्यंत काय करत होते आणि आता ते या कामाला लागल्यावर त्यांची नित्याची कामे कशी पार पडत आहेत ?
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 06/25/2018 - 12:45 नवीन
प्लास्टिक उद्योगाला १५ हजार कोटींचं नुकसान झालं असून एका रात्रीत तीन लाख लोकांनी आपली नोकरी गमावली आहे https://www.loksatta.com/mumbai-news/three-lakh-lost-job-plastic-ban-1702958/ ==== मी सहसा अशा आकडेवारींवरती आता जास्त विश्वास ठेवत नाही पण नोकऱ्या गेल्या असणार यात वाद नाही. कोणाचे हातचे काम गेले तर हळहळ वाटते. ==== ज्याव उस सायंटिस्ट को धुंड के लावो जिसे प्लास्टिक का शोध लगाया. उस को फासी पे चढाव!
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 06/25/2018 - 15:29 नवीन
माझा प्लॅस्टिक बंदीला पाठींबा आहे. कापडी, कागदी पिशव्या वापरणे म्हणजे फार मोठा जाच नाहीय, आरामात अंगवळणी पडू शकते ही सवय. मात्र, दंडाची रक्कम अती आहे. हे भ्रस्।टाचाराचे नवे कुरण तयार करणे आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 06/25/2018 - 16:41 नवीन
१९८२ चे दर्म्यान भारत देशात संगणक वापरायची सुरूवात करण्याचे ठरले त्यावेळी हे काय संकट अशी बोंबाबोंब ब्यांक कर्मचार्यानी केली . ती नोट कौंटींग मशीन च्या बाबत्तीतही केली . आजचे चित्र काय आहे ? भारत देशात एकादा निर्णय रोजगार या एकमेव निकषावर घ्यायचा झाला तर देश काम्युनिस्ट चीनच्या ताब्यात द्यावा लागेल. युरोपात विना तिकीट ला जबर दंड आहे. दंड करणे बरोबर आहे तो मोठाही हवा पण सद्या तरी तो उपभोक्ता पातळी वर नको अशा सूचनाही मंत्राल्याने दिल्या आहेत .
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Mon, 06/25/2018 - 23:42 नवीन
सरकारला नावं ठेवण्यात भारतीयांचा हात धरणारा कोणीच नसेल. वर्षानुवर्षे ओला आणि सुका कचरा वेगळा करा म्हणून सांगितलं जातंय. प्लास्टिकच्या कुठल्याही वस्तू मग ती पिशवी असो वा बाटली रस्त्यावर न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावा हे पण कित्येक वर्ष सांगितलं जातंय. प्लॅस्टिकच्या वापरामुळे कॅन्सर होतो हे पण सिद्ध झालेलं आहे. पर्यावरण वगैरे ठेवा बाजूला पण जीवघेणा आजार होतो म्हणून तरी प्लॅस्टिकच्या वस्तू वापरणं थांबवलं पाहिजे. पण भारतीयांची खासियत आहे की एखादी गोष्ट करू नका म्हणलं की हटकून करणारच. लोकांना चिंता कसली तर मग इडली घेतल्यावर सांबार कशात घेणार, चहा कुठल्या कपातून पिणार किंवा पाण्याची बाटली कुठून आणणार. अगदी मटण काय कुकर मधून आणणार काय असे विचारणारे मेसेज पण फिरत होते. गरम सांबार किंवा चहा इतक्या हलक्या गुणवत्तेच्या प्लॅस्टिकच्या संपर्कात आल्यावर त्या प्लास्टिक मधून धोकादायक रसायनं मिसळली जातात. बिस्लेरीच्या बाटल्या ट्रकमधून भर उन्हात कितीतरी दिवस वाहून नेल्या जातात मग तीच बाटली फ्रीझ मध्ये ठेऊन देतात. त्यातून कुठली धोकादायक रसायनं पाण्यात मिसळली जातात हे थोडं गूगललं तरी कळेल. फार नाही पण अगदी २०-२२ वर्षांपूर्वीपर्यंत आपण कापडी पिशव्या वापरत होतो. चहा पिण्यासाठी काचेचे ग्लास किंवा चिनी मातीचे कप असायचे आणि पाणी पिण्यासाठी आपल्या वर्षातून एकदा/ दोनदा घेतल्या जाणाऱ्या बाटल्या असायच्या. तेव्हा दूध आणण्यापासून ते अगदी बाकी सांबार किंवा तत्सम प्रवाही पदार्थ आणायला आपण घरूनच स्टीलचा डबा घेऊन जायचो. आता त्यात कमीपणा वाटायला लागला का? किंवा सहज मिळणारी प्लॅस्टिकची पिशवी जरा जास्तच सोयीची वाटायला लागली? प्रगत देशात दुकानांमध्ये प्लॅस्टिकची बॅग विकत घ्यायला लागते. तसेच लोक इमाने इतबारे प्लास्टिकचा कचरा डिस्पोझेबल बिन मध्ये टाकतात. अमेरिकेत/ कॅनडा मध्ये रस्त्यावर कचरा करणाऱ्याला $१००० (एक हजार) दंड आहे. समस्त जनता, अगदी भारतीयसुद्धा, रस्त्यावर चालताना किंवा वाहनातून जाताना कचरा टाकत नाही. वेफर्सच्या बॅग्स तर सोडाच, पण साधं चॉकलेटचं रॅपर सुद्धा टाकत नाहीत. चुकून काही हातातून पडलंच तर लगेच उचलून स्वतःच्या खिश्यात, ब्यागेत किंवा गाडीत ठेवतात. कधी येणार अशी शिस्त आपल्याला? स्वतः बेशिस्त वागायचं आणि मग कारवाईचा बडगा उगारला की सरकारला शिव्या द्यायच्या. बंदीच्या विरोधात ओरडायचं काय तर - भ्रष्टाचाराला अजून एक कुरण मिळालं: पण भ्रष्टाचार कोण करतंय त्यात तुम्ही पण सामील झालात ना? - सरकारला टॅक्स जास्त मिळत नाही म्हणून आता अश्या मार्गाने पैसे गोळा करत आहेत: मग सरकारचा या मार्गाने पैसे गोळा करण्याचा डाव हाणून पाडा ना. अजिबात प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या न वापरून सरकारची फजिती करा. - प्लास्टिक वस्तू बनवणारे उद्योग धंदे आणि पर्यायाने कामगार बेरोजगार होतील: काळाबरोबर न बदलणारे सगळेच बेरोजगार होतात हे पूर्वापार चालत आलेलं सत्य आहे. सरकारने काय काल रात्री सांगितलं नाही की उद्या पासून प्लास्टिक बंद म्हणून. पण, काय होईल ते बघून घेऊ किंवा सरकार असले नियम करत असतं पण पाळायचे की नाही हे आम्ही ठरवू, ही वृत्ती नडते आहे का?
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 06/26/2018 - 03:40 नवीन
काही तरी चांगला बदल हा कोणाच्यातरी शेपटीवर पाय देणारा असतोच ! आपण भारतीय समाजाचे वास्तव बरोबर मांडलेय ! फक्त दु: ख याचे आहे की सरकारच्या शेपटीवर पाय द्यायची संधी मतदाराला दैनदिन येत नाही ती ५ वर्शातून एकदाच येते . रिझर्व बॅन्क ,सेबी यानी डी एस के प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे त्याना दंड किती करायचा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
स
सोमनाथ खांदवे Tue, 06/26/2018 - 03:44 नवीन
मस्त रं भावू !! यक घाव दोन तुकड !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
प
प्रसाद गोडबोले Tue, 06/26/2018 - 04:27 नवीन
एकदम " नायक" चित्रपट आठवला. इतका भोळा आशावाद बाळगणार्‍यांविषयी फार कणव वाटते मला . एकदम साने गुर्जींची आठवण येते . #जप्_हो_श्याम
कॅनडा मध्ये
कनेड्डा च्या गफ्फा नका हो सांगु . हेल्थकेअर संपुर्ण फ्री आहे कनेड्डात . बोला तुमच्या सरकार ला जमेल का ? कनेड्डात होमो सेक्सुअ‍ॅलिटी लिगल आहे , बोला तुमचे सरकार कधी करणार ? कनेड्डा अजुन इंग्लंडच्या राणीचे पाय चाटते , बोला तुम्ही चाटणार का ? नसस्त्या उपमा कोठुनही कोठेही देण्यात काय अर्थ आहे ? भारत हा एक थर्ड वर्ल्ड कन्ट्री आहे जिथे प्रचंड भ्रष्टाचार आहे ही वस्तुस्थीती आहे . कॅनडात जवळपास ना के बराबर आहे भ्रष्टाचार ! उगाचच कॅनडाशी कशाला तुलना करताय ?
मग सरकारचा या मार्गाने पैसे गोळा करण्याचा डाव हाणून पाडा ना. अजिबात प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या न वापरून सरकारची फजिती करा.
if a police car chases you for a mile they will find a reason catch you ! मी पैज लाऊन सांगतो , एकदा का पोलिसाने तुम्हाला पकडले की तुमच्याकडुन वसुली करायला तो वट्टेल तो कायदा शोधु शकतो ! एकदा आर. टी. ओ ने मला आणि माझ्या मित्राला डांगे चौकात आडवले. आम्ही दोघेही हसलो , टिपिकल बामणी भोळाभाबडा चेहरा असल्याने हा अनुभव आम्हाला नवीन नव्हता ! , त्याला विचारलं - आम्ही सिग्नल मोडला नाहीये , आम्ही हेल्मेट घातलंय अडवायचा संबंधच काय ? तर तो म्हणाला - लायसन्स दाखवा - मित्राने लायसन्स दाखवला - तो म्हणाला गाडीची कागदपत्रे दाखवा - आम्ही लगेच डिकीतुन काढुन गाडी ची कागदपत्रे दाखवली - तो म्हणलाला पी.यु.सी. दाखवा - आम्ही तेही दाखवला . मग तो म्हणाला इन्शुरस्न्स पेपर्स दाखवा . लगेच डिकीतुन काढुन तेही दाखवले ! आता मात्र आर. टी. ओ . हतबल झाला आणि आम्हाला हसुन म्हणाला - " आम्हाला थांबवावेच लागते लोकांना . दहा कोटीचे टारगेट आहे पुण्याचं ! असो. जा तुम्ही." ही १००% घडलेली खरीखुरी घटनाआहे , चनावाला सांगतो तसली काल्पनिक मनघडन घटना नव्हे ! एके दिवशी सेम कंडीशन मध्ये एका आर. टी. ओ ने माझ्या गाडीवरील MH11 मधील MH चा फॉन्ट हा 11 पेक्षा एक ने मोठ्ठा आहे हे कारण सांगुन आर. टी. ओ ने माझ्याकडुन १०० रुपये वसुल केले आहेत ! . चिंचवड मधील वाल्हेकर वाडीच्या सिग्नल ला गाडी कॉर्नर ला थांबवली असताना आर. टी. ओ ने हात करुन पुढे बोलावले , आम्ही पुढे गेल्यावर तुम्ही सिग्नल मोडलाय लायस्नस दाखवा असे म्हणुन लायसन्स काढुन घेतला व शेवटी म्हणाला १०० द्या , नाहीतरे पावती फाडा. आम्ही सिग्नल मोडलाच नव्हता त्यामुळे गाडीत बसलेल्या घरच्यांनी एकदम टिळकांसारखा आव आणुन मी शेंगा खल्ल्या नाहीत , मी टरफले उचलणार नाही असा स्टॅन्ड घेतला , मी म्हणालो गप्प बसा हा देश टिळकांचा नाहीये गांधींचा आहे म्हणुन गपचुप १ गांधीजी सारुन पटकन सुटलो . ( पुढच्या सिग्नल ला सेम प्रकार झाला तेव्हा मात्र बहीण प्रचंड चिडली आणि म्हणाली मी सिग्नल तोडलाच नाहीये १ पैसा दंड भरणार नाही , आत्ताच मागच्या सिग्नल ला आर. टी. ओ ला १०० दिलेत , तेव्हा तो आर. टी. ओ . खजील ( कि निरुत्तर) झाला अन त्याने जाऊन दिले ! तात्पर्य काय की तु तुम्ही काहीही करा , एकदा का पोलिसाने पैसा वसुल करायचा ठरवुन तुम्हाला पकडले की तो काहीही कारण काढुन पैसा वसुल करु शकतो , तुमच्या हातात काहीही नसते ! त्याची फजीती बिजीती करणे करत बसणे इतकेच उद्योग आहेत का आपल्याला आयुष्यात ? गांधी बाबा की जय म्हणुन एक नोट सारुन पुढे जाणे हाच सर्वसामान्य नागरिकापुढचा प्रॅक्टिकल पर्याय असतो ! आशावाद असणे चांगले पण भोंगळ आशावाद असणे फार वाईट ! अगदी झालीच ही प्लॅस्टिकबंदी यशस्वी अन थांबला सरकार चा रिव्हेन्यु तर पैज लाऊन सांगतो जसा दुष्काळचा सेस , शिक्षणाचा सेस लावला आहे लावला आहे तसाच अजुन एखादा सेस लावायला सरकार कमी करणार नाही !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Tue, 06/26/2018 - 05:12 नवीन
कॅनडाच्या गप्पा हाणल्या म्हणून वाईट वाटून घेऊ नका. ते फक्त संदर्भ म्हणून सांगितलंय की नुसता रस्त्यावर कचरा टाकला तर एवढा दंड आहे. कारण काही प्रतिसादांमध्ये परदेशातले रस्ते किती स्वच्छ असतात याचं कौतुक केलं आहे. आपल्याकडे बेबंदपणे रस्त्याचा उकिरडा करतात त्याला असाच जबर दंड करायला पाहिजे. आणि मी अमेरिकेचा पण उल्लेख केलाय हो, उगाच ट्रम्पभाऊंना वाईट वाटायचं. पोलीस कसे अडवतात ते मला पण माहित आहे हो, तुम्ही काय ते सांगताय. भारतीय पोलिसाने तुम्हाला अडवलं तर तुम्ही वाद घालू शकता आणि नाहीच ऐकलं तर ते नुसते पैसेच घेतात. मुद्दा तो नाहीये, नियम केला की त्यातून पळवाट काढणारे सगळेच आहेत, मग ती जनता असो किंवा ज्यांच्याकडे तो नियम राबवायची जबाबदारी आहे ते असोत. आशावाद असणे चांगले पण भोंगळ आशावाद असणे फार वाईट मी कुठलाच आशावाद दाखवला नाहीये कारण भारतीय लोक सुधारणार नाही हे मला माहित आहे. मी तर लोकांच्याच चुका दाखवतोय की साधा कचरा वेगवेगळा ठेऊन आणि प्लास्टिक रिसायकल करून थोडाफार हा प्रश्न सुटू शकेल. पण ते कोण करणार? सरकारला स्वतःचे असे काही उत्पन्न नसते त्यामुळे कर गोळा करायलाच लागतो. त्यात जिथे सगळंच सरकारने करायचं आणि त्यात पण सरकारी नोकर असले तरी त्यांनी मिळेल तिथून पैसा ओढायचा अशी स्थिती असल्यावर, त्यावर जनतेमध्ये जमेल तितका कर चुकवायचा अशी मानसिकता असल्यावर दुसरं काय होणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ब
बबन ताम्बे Tue, 06/26/2018 - 09:18 नवीन
" आम्हाला थांबवावेच लागते लोकांना . दहा कोटीचे टारगेट आहे पुण्याचं ! असो. जा तुम्ही." हे दहा कोटीचं टारगेट कोण ठरवतं ? सरकार? म्हणजे ही जनतेची सरकारने केलेली सरळ सरळ पिळवणुक झाली! लोकांनी इन्कम टॅक्स भरा, गाडीचा टॅक्स भरा, टोल भरा, अजुन कुठले कुठले टॅक्स भरा, तरीही महसूल मिळवण्यासाठी अशी जनतेची लुबाडणूक केली जाते? सरकार कुठलेही असले तरी हे राजरोस चालणार? चिड येते अक्षरशः !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
च
चौथा कोनाडा Fri, 06/29/2018 - 08:59 नवीन
टारगेट आणि टार्गट देखिल आहे शासन आणि इतरही पक्ष ही यंत्रणा ! पोटच भरत नाहीय यांचं ! एकजात बकासुर ! सगळे संबधित लोक दिवसेंदिवस खाऊन खाऊन श्रीमंत होत चाललेले आहेत! पुण्यात आधी बीआरटी अन आता मेट्रो देखिल फेल होणार ! पीएमपी तर स्क्रॅप झाल्यातच जमा ! आपण नुसते कर भरत राहणार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
स
सोमनाथ खांदवे Tue, 06/26/2018 - 03:49 नवीन
ट्रेडमार्क भावू न बरुबर आरसा दाखवलाय , आपणच बेफिकीर राहून प्लास्टिक चा कचरा वाढवतोय .
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 06/26/2018 - 10:17 नवीन
प्लॅस्टिक बंदीला ३ महिने स्थगिती मिळाली म्हणे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 06/26/2018 - 10:18 नवीन
प्लॅस्टिक बंदीला ३ महिने स्थगिती मिळाली म्हणे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 06/26/2018 - 10:21 नवीन
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 06/26/2018 - 10:21 नवीन
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 06/26/2018 - 10:23 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
उ
उपयोजक Tue, 06/26/2018 - 10:24 नवीन
_*Why 'Yes' to plastic & 'No' to paper*_ It's a very wrong notion that Plastic is hazardous and we should not use Plastic. Plastic has made our lives convenient with any food item, vegetables, water, medicines, garments, stationary, jewelery, toothpaste, shampoo, washing powder, food grains, vegetable oils, milk, fruits & many more available items anytime anywhere. It has given employment & livelihood to lakhs of people which always is a concern for any Government. It has _*replaced paper*_ and thus SAVED a lot of trees from being cut, _which is very much essential to stop global warming._ Plastic waste of course is a concern only when it is not collected and recycled/ reused. All Plastic MUST BE recycled and reused. It is our responsibility to throw this Plastic or any wastage in correctly earmarked Dustbins so it can be sent for recycling. WE need to change OUR DAILY habits and not ban Plastic. We can also generate electricity from any plastic waste with hardly 1% residue. Where as _*thousands of trees & lakhs of litres of water is used to manufacture paper*_. This contaminated water is then disposed off in rivers & seas thus polluting the marine environment. Plastic is made out of a byproduct left after processing of crude oil which is extracted from the sea. So why 'No' to Plastic?? Iron ore used for making metal is depleting our land. _*Paper is taking away our trees & pushing us towards global warming*_. So when we say BAN Plastic ...... are we talking of actually saving our environment?? Whom should we blame? A civilian who doesn't throw the thrash in the earmarked Dustbin? Or the Municipal Corporation who has not developed an efficient system to collect & recycle plastic waste & pass their inability & failure to Plastic users? Shouldn't these Politicians stop playing with the common man's life and get UNNECESSARY political mileage ? The Mobile phone has made our lives easy but at the same time it is taking away our mental peace. Whilst it keeps us all connected (more than we need to be sometimes) It has made for distance in so many relationships. It is also generating tons of e-waste which is not recyclable. Should we ban the use & sale of mobiles?? Cars, bikes, trucks all emit a lot of Co2. So should we ban cars and stop manufacturing all vehicles? Air-conditioners emit lots of hot air, so should we ban Air-conditioners ? Lots of hazardous chemicals are used for agriculture which causes cancer. Can't we ban them and go for organic farming immediately ? I can give you many such examples which we should ban immediately. SO Should we Ban Plastic??? Do we want to revert back to the18th century ??? _*Should we not correct our slovenly habits rather than banning all products & gadgets*_ ?? Can't we make rational use of all our resources so we make our next generations life better by being RESPONSIBLE & CONSIDERATE beings 1st ? Now can you think of replacing Plastic with Paper??? Think.... Circulate this post so it reaches the BMC, the CM & the Authorities concerned who blame Plastic in order to hide their inabilities & make the people suffer unnecessarily. *Vinitkumar Yadav* WhatsApp वरुन साभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
ख
खिलजि Tue, 06/26/2018 - 11:14 नवीन
आज जर राजकुमार हयात असते तर त्यांनी या निर्णयाला केराची टोपली दाखवली असती "" जानी , ये प्लास्टिक है , कोई बंदूक कि गोळी नाही .. इससे खेलोगे तो पांच हजार रुपया गमाओगे... इससे खेळणं तो हमारी पुराणी आदत है .. आनेडो मनपा टिमको , प्लास्टिक भी हमारा होगा , पिशवी भी हम हि पकडेंगे , वक्त भी हमारा होगा लेकिन पांच हजार सरकार का होगा ... हम वो प्लास्टिक है जिसे कभी दंड ना लाग सका और ना हि कभी लागेगा ....""
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 06/27/2018 - 10:19 नवीन
खिलजि :-))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
स
स्वधर्म Tue, 06/26/2018 - 12:54 नवीन
एका महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधायचे अाहे. कुठुन येतं हे प्लॅस्टीक मुळात? ते येतं रिफायनरीज मधून. पेट्रोल व डिझेलची गरज सतत वाढत अाहे, नवे तेलशुध्दीकरण प्रकल्प येत अाहेत. अाहेत त्यांची क्षमता वाढवण्याचे चालले अाहे. तर मग तिथे जे उपउत्पादन तयार होणार ते बाजारात अोतायलाच पाहिजे नाही का? त्यामुळे प्लॅस्टीक तयार होण्याला कसलाच पर्याय नाही. जोपर्यंत अापण तेल वापरणार, शुध्द करणार, तोपर्यंत प्लॅस्टीक हे तयार होणारच. अापली प्लॅस्टीकची निर्यात खूप कमी अाहे. उलट अापण ते अायात बरेच करतो अाहोत. समजा एखादा माणूस म्हणाला, की मला फक्त भोजनच अावडतं, त्याची सोय म्हणून स्वयंपाकघराचेच नियोजन करणार, पण उत्सर्जन मात्र करणार नाही, त्याची सोय (शौचालय) करणार नाही, मला त्याची घाण वाटते, तर काय होईल? तेलावर अाधारित अर्थव्यवस्था, विकास यांचं असं अाहे. त्याची पर्यावरणीय किंमत माणसाला चुकवावीच लागेल. त्यामुळे प्लॅस्टीक हे अापल्या अायुष्यातून तोवर जाणार नाही, जोवर खनिज तेल जाणार नाही. सरकार कोणता विचार (?) घेउन हा निर्णय करत अाहे, त्यांच त्यांनाच माहीत! दुसरं असं बघा, की प्लॅस्टीक बनवतं कोण? तर सगळ्या सरकारी तेल कंपन्या व रिलायन्स. तेल हे जरी त्यांचं मुख्य उत्पादन असलं, तरी यांच्या दुय्यम उत्पादनाच्या (प्लॅस्टीकच्या) मार्केटला हात लावायला सरकार धजावेल तरी का? या बंदीचं काय होईल, हे सांगता येणार नाही, पण यात समग्र विचार काही असलाच, तर तो दिसत नाही, हे मात्र नक्की. जाता जाता खालच्या रिपोर्टवर एक नजर टाका. Indian Petrochemical Industry Review of 2016-17 & Outlook for 2017-18 दुवा: http://cpmaindia.com/pdf/apic-country-2017/apic2017-india-report.pdf उत्पादकांच्या साठी त्यात बर्याच सकारात्मक बाबी अाहेत. सगळा कसा पाॅझीटीव्ह अाउटलूक अाहे! अजून अजून पाॅलिमर उत्पादनांचं मार्केट कसं वाढतं अाहे, सरकार कसे नविन नविन परवाने देत अाहे, मागणी कशी वाढत अाहे इ. इ. अाणि अापण बसलोय इथे प्लॅस्टीक पिशव्यांच्या बंदीवर चर्चा करत.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 06/26/2018 - 20:13 नवीन
प्लस्टिक जगातल्या सार्वकालीक सर्वोत्तम संशोधनांपकी एक आहे. आजच्या घडीला मानवी जीवन सुखकारक आणि प्रगत करण्यास प्लास्टिकने जितका हातभार लावला आहे, तितका (किंवा अगदी त्याच्या निम्माही) कोणत्याही एका पदार्थाने लावलेला नाही. समस्या प्लास्टिक हा पदार्थ नाही तर, वापरानंतर त्याची विल्हेवाट लावण्यात जनता व सरकारकडून दाखविला जाणारा बेजबाबदारपणा व अनावस्था या समस्या आहेत. खनिज तेलापासून विविध प्रकारची ईंधने आणि इतर उपयोगी पदार्थ वेगळे केल्यानंतर उरलेल्या चोथ्यापासून प्लस्टिक बनते. म्हणजे एका अर्थाने कचर्‍यातून सोने मिळते. त्याच्यापासून तयार केलेल्या वस्तूंच्या नेहमीच्या वापरानंतर त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट (तश्याच वस्तू परत बनवण्यासाठी पुनर्वापर; आणि इतर प्रकारचा वापर, उदा : रस्ते बनवणे, बांधकामात पूरक म्हणून वापरणे, इंधनात पूरक म्हणून वापरणे, इ) लावल्यास त्यापासून खालील अधिक फायदे मिळतात : १. प्लस्टिकला पर्याय म्हणून वापराव्या लागणार्‍या कागदासाठी करावी लागणारी जंगलतोड थांबेल, २. कचर्‍यातले प्लास्टिक वापरून बनवले जाणारे रस्ते व बांधकाम जास्त टिकाऊ व जास्त जलनिरोधक बनते...

३. कचर्‍यातल्या प्लास्टिकचा इंधन पूरक म्हणून वापरल्यास इंधनाचा खर्च कमी होतो...

या व इतर काही गोष्टी अगोदरच व्यवहारात आलेल्या आहेत. त्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करणे आवश्यकच नाही तर फायद्याचे आहे. कचर्‍यातल्या प्लास्टिकचे वर्गिकरण करून ते नियमितपणे उपलब्ध झाले तर, त्या स्वस्त कच्च्या मालाचे अजून काही नवनवीन उपयोग शोधण्यासाठी, अनेक संशोधक पुढे येतील आणि त्यावरील व्यवसायांत गुंतवणूक करण्यासाठी अनेक व्यावसायिक पुढे येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
व
विशुमित Wed, 06/27/2018 - 07:18 नवीन
<<<कचर्‍यातल्या प्लास्टिकचे वर्गिकरण करून ते नियमितपणे उपलब्ध झाले तर, त्या स्वस्त कच्च्या मालाचे अजून काही नवनवीन उपयोग शोधण्यासाठी, अनेक संशोधक पुढे येतील आणि त्यावरील व्यवसायांत गुंतवणूक करण्यासाठी अनेक व्यावसायिक पुढे येतील.>>> ==>> +१ कचरा वर्गीकरण करायला लोक कंटाळा करतात. खरा प्रॉब्लेम तिथे आहे. नाहीतर प्लास्टिक कचरा इथे तिथे पडणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
स्वधर्म Wed, 06/27/2018 - 09:10 नवीन
तुंम्ही दिलेले दोन्ही व्हिडीअो पाहिले. २०% प्रमाणात प्लॅस्टीक डांबरात मिसळून त्याचा रस्ते बनवताना उपयोग होऊ शकेलही. दुसरा व्हिडीअो मात्र समजला नाही. त्यात कोणत्या रूपात उर्जा तयार होते, ती कशासाठी वापरू शकतो तसेच टायर वितळवण्यासाठी व तेलाच्या रूपात घातलेली उर्जा व मिळालेली उर्जा यांचे गुणोत्तर काय? याची काही माहिती नाही. मुळात पदार्थापासून उर्जा करताना, पुन्हा काही वेस्ट तयार होणारच, त्याची विल्हेवाट कशी लावायची? की संपूर्ण टायर्सचा पदार्थ अगदी १००% उर्जेत रूपांतरीत होणार? तुंम्ही पॅसिफिक महासागरातल्या प्लॅस्टीकच्या डोंगराबाबत वाचलं असेलच. तूर्त तरी त्याच्यावर काहीही करता येत नाही अाहे. प्रयोगशाळेत पदार्थापासून उर्जेचे रूपांतर करुन दाखवणे वेगळे व मुख्य व्यवहारात प्रत्येक चौरस फुटातला कचरा गोळा करणं अाणि त्याचं रूपांतर उर्जेत करणं वेगळं. प्रयोगशाळेत जमलं म्हणजे ते झालंच, असं मला तरी वाटत नाही. विचार करा, एक प्लॅस्टीकची पिशवी उचलण्यापासून ते ती उर्जा प्रकल्पापर्यंत नेण्यासाठी जेवढी उर्जा लागेल, त्याहून जास्त उर्जा त्या पिशवीपासून अाधिकचा काहीही घातक कचरा निर्माण न करता निर्माण करता येईल का? अात्तापर्यंत लॅस्टीकचा संपूर्णपणे निचरा करणं शक्य झालं अाहे काय? प्लॅस्टीकचे रस्ते करणं हा एक त्याचं व्यवस्थापन करण्यातला भाग झाला. मूळ गुणधर्म अविनाशी असणे व निसर्गचक्रात न सामावू शकणे हे अाहेत. ते पृथ्वीवर सतत वाढतच राहिलं, तर पुढे त्याचं व्यवस्थापन करणं कसं शक्य अाहे? वरीलप्रमाणे व्हिडीअो पाहिले की मला याची अाठवण येते: A second myth is that with enough knowledge and technology we canmanage planet Earth.. "Managing the planet" has a nice a ring to it. It appeals to our fascination with digital readouts, computers, buttons and dials. But the complexity of Earth and its life systems can never be safely managed. The ecology of the top inch of topsoil is still largely unknown, as is its relationship to the larger systems of the biosphere. What might be managed is us: human desires, economies, politics, and communities. But our attention is caught by those things that avoid the hard choices implied by politics, morality, ethics, and common sense. It makes far better sense to reshape ourselves to fit a finite planet than to attempt to reshape the planet to fit our infinite wants. संदर्भ: - What Is Education For? Six myths about the foundations of modern education, 
and six new principles to replace them by David Orr https://www.eeob.iastate.edu/classes/EEOB-590A/marshcourse/V.5/V.5a%20What%20Is%20Education%20For.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 06/27/2018 - 13:25 नवीन
एक मुद्दा धरून त्याची चिरफाड करून काय साधणार ? ते मुद्दे केवळ वानगीदाखल दिलेली उदाहरणे आहेत आणि तशी उदाहरणे असंख्य आहेत... योग्य कचरा व्यवस्थापन झाले तर भविष्यात अजून अनेक नवीन उदाहरणे तयार होतील. तसे पाहिले तर खुद्द प्लस्टिक हे सुद्धा खनिज तेलापासून उपयोगी गोष्टी वेगळ्या करत करत उरलेल्या व सुरुवातीच्या काळात कचरा (waste) समजल्या जाणार्‍या गाळातूनच निर्माण केले जाते हे विसरून चालणार नाही ! एकेरी दृष्टीने विचार केला तर अनेक महत्वाचे मुद्दे नजरेतून सुटून जातात. उदाहरणार्थ, वरच्या प्रतिसादात प्लस्टिकपासून उर्जा निर्माण होण्यात खर्च होणार्‍या उर्जेत, "एक प्लॅस्टीकची पिशवी उचलण्यापासून ते ती उर्जा प्रकल्पापर्यंत नेण्यासाठी जेवढी उर्जा लागेल" ही उर्जा समील केली आहे. आता असे पहा... प्लस्टिकच्या कचर्‍यापासून उर्जा बनवा किंवा बनवू नका, (प्लस्टिकसह इतर सर्व प्रकारचा) कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यास उर्जा खर्च करावीच लागते; या १००% व्यय असलेल्या कृतीला सक्षम / मोठे पर्यायही नाहीत. मग, त्या अनिवार्य खर्चाच्या बदल्यात इंधन बनवून काही प्रमाणात उर्जा परत मिळाली तर ते फायद्याचेच नाही का ? एकदा व्यावहारीकरित्या सक्षम झाले की संशोधनाला अनेक फाटे फुटून अकल्पित फायदे पुढे येतात हे प्लस्टिकच्या उदाहरणानेच सिद्ध झाले आहे, नाही का ? असो. मुख्य मुद्दे असे आहेत : १. जनतेने प्लास्टिक योग्य तर्‍हेने कचराकुंडीत / इतर कोणत्या कचराव्यवस्थापन प्रणालीत गोळा केले आणि ते व्यावसायिकांसाठी उपलब्ध झाले तर "कचर्‍यातून सोने (लक्षार्थाने... वाच्यार्थाने नव्हे ;) ) बनविण्यासाठी उद्योजक पुढे येतील. या गोष्टीची सद्या व्यवहारात आलेली उदाहरणे आहेत. ही गोष्ट नवीन आहे आणि त्यात संशोधकांच्या बुद्धीला खूप वाव आहे. २. कचर्‍याचे व्यवस्थापन योग्य तर्‍हेने करण्यास जनता आणि सरकार यांनी एकमेकाला सहकार्य केले तर (अ) जनतेला प्लस्टिकचे सद्याचे सर्व उपयोग निर्वेधपणे उपभोगता येतील आणि (आ) प्लस्टिकच्या पुनर्वापर / नवीन वापराने नवनवे आर्थिक व इतर फायदे मिळण्याची वास्तविक शक्यता आहे. ३. प्लॅस्टिक ही मानवाने बनवलेल्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे... ती मानवी जीवनाला व्यापून, त्याला सुविधापूर्ण करून, चार अंगुळे उरलेली आहे ! या वाक्यावर विश्वास बसत नसेल तर, प्रत्येकाने आपापल्या घरातल्या, (अ) पूर्णपणे प्लॅस्टिकच्या असलेल्या किंवा (आ) प्लस्टिकचा काही अंशभाग असलेल्या वस्तूची कचर्‍यात टाकण्यासाठी मोजदाद करावी असे सुचवतो. पूर्णपणे मातीच्या, लाकडाच्या, धातूच्या (यात नॉनस्टिक भांडी पकडू नका... त्यांना लेप दिलेले टेफ्लॉन प्लस्टिकचा प्रकार आहे ;) ), इत्यादी मोजक्या वस्तू सोडून इतर सर्व टाकून द्याव्या लागतील... टिव्ही, रेडिओ, संगणक, मोबाईल्स, कुकिंग रेंज, हल्ल्लीच्या नवीन कुकिंग गॅस बॉटल्स, फर्निचर, विजेच्या वायर्स, बटणे व इतर उपकरणे, सिंथेटिक कपडे, पडदे, इत्यादी, इत्यादी, इत्यादी... यादी न संपणारी आहे ! आहे का तयारी ???!!! यात व्यापारी तत्वावर, सार्वजनिक सोयीत आणि शास्त्रिय संशोधानासाठी वापरल्या जाणार्‍या प्लस्टिकच्या गोष्टींची भर घातली तर मानवी विकास सहजपणे ५० वर्षे तरी मागे जाईल. तेव्हा, वर म्हटल्या प्रमाणेच... प्लास्टिक हा पदार्थ समस्या नाही तर वरदान आहे, त्याच्या वापरानंतर त्याची विल्हेवाट लावण्यात जनतेकडून दाखविला जाणारा बेजबाबदारपणा व सरकारकडून असलेली कचरा व्यवस्थापनातली अनावस्था या मूळ समस्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
म
मोहन Wed, 06/27/2018 - 14:03 नवीन
+१०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा