Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तेव्हा माघार घ्यावी....

P — Patil 00, Tue, 06/26/2018 - 15:15
तेव्हा माघार घ्यावी.... जेव्हा आपलंच माणूस अनोळखी होतं ... तेव्हा... शांतपणे माघार घ्यावी....... जेव्हा संपतात सारी नाती काही सकारणं... अन काही विनाकारण.... तेव्हा पुरावे मागू नयेत नाती संपण्याचे.. तेव्हा.... शांतपणे माघार घ्यावी... कधी काळी असतो आपण कुणाचे तरी ...हक्काचे कधीतरी असते जागा कुणाच्यातरी डोळ्यात... पण कधीतरी नजरच होते अनोळखी आणि परकी.. तेव्हा... शांतपणे माघार घ्यावी... कधीतरी आपण उगाचच जपतो कुणालातरी... मनात खोलवर... जणू आपल्या अस्तित्वालाच हवाली करतो कुणाच्यातरी मर्जीवर आणि मनावर.. पण कधीतरी जाणवत... कुणालाच नाही आपल्या अस्तित्वाची दखल... तुम्हीच बेदखल होता.. त्याच्या भावविश्वातून... तेव्हा... शांतपणे माघार घ्यावी... उत्तराच्या अपेक्षेने... का करून घ्यावेत स्वतःला प्रश्नांचे डंख.... मिळणार नाहीत कधीच प्रश्नांची उत्तरे.... तेव्हा... शांतपणे माघार घ्यावी... जेव्हा सगळंच संपते... तेव्हाच नियती दान करते एक अनमोल नजराणा... त्याचं नाव ...अनुभव म्हणून सगळं संपत तेव्हा.... तेव्हा... शांतपणे माघार घ्यावी...

प्रतिक्रिया द्या
2202 वाचन

💬 प्रतिसाद (4)
क
कपिलमुनी Wed, 06/27/2018 - 15:36 नवीन
http://aksharpooja.blogspot.com/2018/06/blog-post_18.html तुमच्या कविता / लेख इकडे तिकडे सापडायला लागले आहेत.
  • Log in or register to post comments
ह
हरवलेला गुरुवार, 06/28/2018 - 04:51 नवीन
हम्म! कदाचित आता ते माघार घेतील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सोमनाथ खांदवे Sat, 06/30/2018 - 10:19 नवीन
प्रयत्न चांगला होता , अजून परफेवशन हवंय !! ☺☺☺☺
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 07/04/2018 - 10:43 नवीन
मला फार आवडली
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा