चालू घडामोडी - जुलै २०१८
‘शाकाहारी’ दहशतवाद्यांनी थांबवली बोकड निर्यात!
http://www.bigul.co.in/bigul/2650/sec/8/goat%20export
====
खाऊन माजलेली बोकडं कष्टकरी जनतेच्या हिताचा विचार करणार आहेत की नाही ?
💬 प्रतिसाद
(77)
म
माहितगार
Wed, 07/11/2018 - 19:17
नवीन
फिक्स क्येलं तर समद फिक्स व्हतय, प्र्याक्टीसनं रुळतयं :)
- Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे
Fri, 07/13/2018 - 15:43
नवीन
अजून एक वर्ष बाकी आहे , भाजप का मुखभंग करून घेत आहे तेच समजत नाही .' शायनिंग इंडिया घोषणा देऊन वाजपेयी चें सरकार घालवले , आता मोदींचे सरकार ही त्याच वाटेने जात आहे . प्रसिद्धीलोलुप लोकांचा भरणा असला की असेच होते . अजून जिओ इन्स्टिट्यूट च्या कार्यालयाचा पत्ता नाही आणि भाजप ला जिओ चे रँकिंग वाढवण्याची घाई झाली आहे , निर्लल्जपणाचा कळस झालाय . मोदीं उद्योगपती साठी रेडकार्पेट टाकत आहेत का त्यांचे पाय धुवत आहेत ?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 07/13/2018 - 06:11
नवीन
भारतातही स्त्री वरीळ अत्याचारांचे प्रमाण कमी होण्यासाठी कार्यरत रहाण्याची गरज नक्कीच आहे, पण बाकी युरोमेरीकेच्या परिस्थिती पेक्षा भारतात परिस्थिती वाईट असल्याच्या फसव्या माध्यम प्रसिद्धीतील उणीवा ससंदर्भ सांख्यिकी विश्लेषणासहीत सुभोदीप मुखोपाध्याय यांच्या लेखात आली आहे.
भारतातील बरेच अत्याचार अनरिपोर्टेड रहाण्याची शक्यता वर्तवली जाते त्या आकडेवारी साठी अॅडज्स्टमेंट केल्यावर सुद्धा युरोमेरीकेतील परिस्थिती भारतापेक्षा ९ पट खेदजनक असल्याचे २१ देशांच्या आकडेवारीवरुन ते दाखवून देताना दिसतात.
भारतातील सद्य स्थिती पेक्षा समाज अधिक कसा चांगला असेल हे बघीतलेच पाहीजे पण परदेशात भारताबद्दलचे चुकीचे स्टिरीओटायपींगही टळावे असे वाटते.
- Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे
Fri, 07/13/2018 - 07:23
नवीन
आंतरराष्ट्रीय नानेनिधींच्या महिला अध्यक्षा ने मोदींना भारतातील महिलांच्या सुरक्षितते बद्दल सुनावले ते म्हणजे उलटा चोर कोतवाल डाटें प्रकार म्हणावा काय ?
https://youtu.be/5zub_3U-REQ
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 07/13/2018 - 10:05
नवीन
हा ओव्हर-ऑल मिडियामध्ये जाणीवपूर्वक नकारात्मक प्रतिम निर्माण करण्याचा परिणाम असावा. Christine Lagarde स्वतः फ्रान्सच्या आहेत. सुभोधीप मुखोपाध्याय डाटा विशेषज्ञ आहेत त्यांची आकडेवारी बरोबर असेल तर. फ्रान्सचे प्रति एक लाख लोक्सख्ये मध्ये रिपोर्टॅड रेपची लाखेवारी १६ आहे आणि भारताची केवळ १.८ आहे . दोन्ही देशात अनरिपोर्टॅडची शक्यता आकडेवारी स्भोधीपप्रमाणे लक्षात घेतली तर फ्रान्समध्ये हे प्रमाण १६० असेल आणि भारतात केवळ १२.९ इन एनीकेस त्यांच्या फ्रान्स मधलाच प्रॉब्लेम भारतापेक्षा किमान दहापटीने अधिक असावा. बाकी युरोपाचीही स्थिती ची आकडेवारी बोलकी आहे .
तुम्ही आयएमएफच्या प्रमुख आहात महिला असल्यामुळे समोर आलेल्या बातमी बाबत सहानुभूती वाटणे सहाजिक आहे पण आंतरराष्त्रीय पदावर काम करणारी स्त्री अधिक जबाबदार असावी सर्वच देशातील स्त्रीयांबद्दल सारखीच आपुलकी असावी. 'एक स्त्री म्हणून काळजी वाटते' एवढे विधान पुरेसे आहे ना . मिडिया कसा बायस्ड वागू शकतो हे वरीष्ठ स्तरावरील स्त्रीस माहित नसावे का की बघा बघा तुमच्या देशात कसा रिव्होल्ट होतोयची भाषा करावी ? फॉर्मल विधान केल्या नंतर मोदी किंवा सुषमा स्वराज किंवा अरुण जेटलीशी फोनवर संवाद साधण्यास किती वेळ लागतो ? पण कसय दुर्दैवानी , कि एन जी ओ क्षेत्रातील जॉब त्यांच्या बोलवित्या धन्यांच्या इच्छेस किती उतरु शकता त्या नुसार मिळत आणि टिकत असतात.
एखाद्या व्यक्तीचा दुटप्पीपणा किती असू शकतो पहा याच मॅडम सौदी राजाला श्रद्धांजली वाहताना काय म्हणतात पहा - आणि या सौदींनी स्त्रीयांवर केलेले अन्याय अंतरजालावर पहाण्यास मिळतीलच पण हा सौदी राजा स्त्रीयांचा सपोर्टर असता तर दिल्लीत नेपाळी स्त्रीयांना त्यांच्या राजदूतांनी केलेल्या अत्याचाराच्या केस मध्ये न्याय मिळवून दिला असता की नाही ? कमाल असते एक एक.
भारताची आर्थीक स्थिती खर्या अर्थाने मजबूत असती आणि भारत आय एम एफ चालवत असता तर ह्याच बाई वेगळ्या पद्धतीने बोलल्या असत्या. केवळ त्यांना दोष देऊन उपयोग नाही आपल्या देशाची आर्थीक स्थिती सबळ न ठेवण्यात आपण मागे पडतो आणि आपल्याच देशाची एकांगी नकारत्म्क चित्र रंगवण्यात स्वतःच हकनाक पुढे असतो.
- Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे
Sat, 07/14/2018 - 04:09
नवीन
रांगेत उभे राहून पोलिसांसोबत मुख्यमंत्र्यांचे जेवण; अधिवेशनातील कामाचे केले कौतुक
https://www.loksatta.com/maharashtra-news/cm-fadnavis-visits-meets-interacts-and-has-dinner-with-the-police-personnel-at-police-camp-rpts-in-nagpur-1713136/
Shared via Loksatta Android App चांगली गोष्ठ आहे एकत्र जेवण केल्याने दुरावा कमी होतो , तसेच निवडणुका आल्याच आहेत आता पुन्हा एकदा सर्व पक्षाच्या खेडोपाडी दलित वस्तीवर जेवण करण्याच्या प्रथेला सुरवात होईल .
किमान अस केल्यामुळे तरी पोलीस महत्वाच्या व्यक्तींनां आपल्याला न विचारता ( महाराष्ट्र बँक चे मॅनेजर मराठे ) डायरेक्ट कोठडीत टाकणारं नाही असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल . बिचाऱ्या मुख्यमंत्र्यांना गेली चार वर्ष भाजप मध्ये गृहमंत्रीपदा साठी योग्य नेता न भेटल्यामुळे शहांच्या आदेशानुसार गृहमंत्रीपद सुद्धा सांभाळावे लागत आहे .देव करो पुढील निवडणुकीनंतर मुखमंत्र्यांचं अतिरिक्त ओझं कमी करण्यासाठी योग्य नेता भेटो , दोन दोन खाती सांभाळायची म्हणजे कामाचा लोड काय कमी असतो का ?
- Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे
Sat, 07/14/2018 - 05:41
नवीन
https://www.usatoday.com/story/money/legal/2018/07/12/nearly-4-7-billion-awarded-j-j-baby-powder-lawsuit/781525002/ जॉन्सन अँड जॉन्सन वर अमेरिकेत चाललेली केस कंपनी हरली , 22 महिलांनी केस ठोकली होती त्यातील 6 महिला कॅन्सर ने मरण पावल्या . बेबी पावडर मधील ऍसबेस्टस मूळे आपल्याला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचा दावा त्यांनी ठोकला होता . प्रश्न असा उपस्थित होतो की त्या कम्पनी ची ती पावडर आपल्या इथे एसबेस्टस शिवाय आहे का ?
का आपल्या इथे मरण स्वस्त असल्या मूळे कॉस्मेस्टीक , औषधे , खाद्यपदार्थ ची गुणवत्ता कशी ही चालते ?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 07/14/2018 - 08:58
नवीन
भोपाळ वायू दुर्घटना माहित आहे ना ! आपण वापरलेले शब्द वस्तुनिष्ठ आहेत, बाकी काही नाही.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 07/14/2018 - 09:06
नवीन
ऐकावे ते नवलच !
Taking page out of BJP book? Congress, CPM turn to Ramayana in Kerala
"राम आस्तिवात नव्हता व रामायण केवळ काल्पनिक कथा आहे", "रामसेतू रामाने बांधला या कल्पनेला कोणताही आधार नाही", इत्यादी दावे खुद्द सर्वोच्च न्यायालयात करणारी भारतिय रष्ट्रिय काँग्रेस आणि "देव-धर्माची कल्पना अफूची गोळी आहे" हे मूलभूत तत्व बाळगणारा नास्तिक कम्युनिस्ट पक्ष (CPM), हे दोन पक्ष केरळमध्ये रामायणासंबंधीच्या उत्सवात एकमेकावर कुरघोडी करू लागले आहेत !!!
"हा तमाशा निवडणूकांकडे लक्ष ठेऊन चाललेला आहे. हे ध्यानात येणार नाही इतके लोक मूर्ख आहेत" असा राजकारण्यांचा समज आहे असे दिसत आहे !
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 07/14/2018 - 10:50
नवीन
कम्युनीस्ट नॅरेटीव्ह वेगळा लेफ्टीस्टच राहील
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 07/14/2018 - 17:39
नवीन
?
- Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे
Sun, 07/15/2018 - 03:29
नवीन
MT: 'सेक्रेड गेम्स'चा वाद; राहुल गांधींनी सोडलं मौन
http://mtonline.in/zEHAzb/dga via @mataonline: http://app.mtmobile.in
वाद सेक्रेड गेम बद्दल चा , हल्ला भाजप आणि rss वर तोही ट्विटर वर करून का तर पत्रकार परिषद मध्ये बोलताना पचका होतो .
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 07/24/2018 - 17:52
नवीन
डेव्हिड कोलमन हेडली उपाख्य दाऊद सईद गिलानी हा २६/११ साठी अमेरिकेतल्या शिकागो तुरुंगात शिक्षा भोगत असतांना त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.
अधिक बातमी : https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/26/11-mumbai-attack-plotter-david-headley-battling-for-life-in-us-prison/articleshow/65107694.cms
बहुधा मोदींनी २६/११ ची अंडीपिल्ली बाहेर काढायला सुरुवात केलेली दिसतेय.
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 07/24/2018 - 18:11
नवीन
आपल्या शेवटच्या वाक्यातून आपण नेमके काय म्हणू इच्छिताय ?
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 07/24/2018 - 20:35
नवीन
परदेशात कायमचे राहण्याचे सर्व उपाय थकल्यावर आता मल्ल्याभाऊ भारतात परत येऊन सर्व देणी परत करण्याची भाषा करू लागले आहेत !!!
https://timesofindia.indiatimes.com/india/vijay-mallya-in-talks-to-return-to-india-voluntarily-sources/articleshow/65124297.cms
- Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे
Wed, 07/25/2018 - 02:24
नवीन
मल्ल्या कर्ज बुडवून पळून गेल्या मूळे कित्तेक देशभक्तांनी किंगफिशर च्या बियर पिणे बंद केले होते , आता ते लोक्स पुन्हा स्वाद घेऊ शकतील .
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 07/27/2018 - 06:00
नवीन
गूड जॉब इन बीइंग सलेक्टीव्ह १, २, ३
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 07/27/2018 - 09:48
नवीन
इतर छोट्यामोठ्या गोष्टींचा सोईस्कर गवगवा करणार्या तथाकथित लोकप्रिय माध्यमांच्या आणि तथाकथित पुरोगाम्यांच्या नजरेतून अश्या अनेक गोष्टी निसटल्या, याचे आश्चर्य वाटावे काय ?!
खुद्द सुप्रिम कोर्टाने शेरा मारल्यावरही ही बातमी इतर बातम्यांच्या भाऊगर्दीत बुडालेली आहे...
https://timesofindia.indiatimes.com/india/what-is-happening-in-kerala-priests-are-becoming-rape-accused-sc/articleshow/65153839.cms?utm_campaign=andapp&utm_medium=referral&utm_source=native_share_tray
ही व्हिडिओ क्लिप, एक अग्रणी व तथाकथित पुरोगामी माध्यम कसे दिशाभूल करते याची अनेक उदाहरणे सबळ पुराव्यासह देते (युट्युबवरून साभार)...
भारतिय माध्यमे दिवसेदिवस जास्त जास्त अविश्वासू बनत चालली आहे, दुर्दैवाने ! :(
- Log in or register to post comments
य
यश राज
Fri, 07/27/2018 - 12:31
नवीन
खुपच नालायकपणा आहे हा.. या भांड मिडीयाकडून अजून काय अपेक्शा करणार..
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 07/27/2018 - 20:38
नवीन
वरचा प्रतिसाद लिहिला आणि आजच व्हॉट्सअॅपवरून खालील कविता आली (कवीचे नाव लिहिलेले नव्हते)...
जात कळली नव्हती
चौकातील पुतळा थोडा तुटला होता
जरासा फुटला होता..
झाली होती त्याची विटंबना
मोर्चेकरीही तयार होते..
दंग्यांची मात्र सुरुवात झाली नव्हती
कारण अजूनही पुतळ्याची..
जात कळली नव्हती
बलात्कारी पीडिता किंचाळत होती
अत्याचाराचा न्याय मागत होती..
जनता नेहमी सारखच फक्त बघत होती
मदत करणारच होतो हो आम्ही..
पण अजूनही पीडितेची ..
जात कळली नव्हती
छळलं होत त्याला व्यवस्थेनं
म्हणून त्यानं आत्महत्या केली होती..
ठरतील आता त्याचे समर्थक-विरोधक
सोबत होईल राजकारणही
मग हि शांतता कसली..
कारण अजूनही मरणाऱ्याची ..
जात कळली नव्हती
वाचलेलं पुस्तक अन त्यातला गाभा
कळलेला इतिहास आणि त्यातले संदर्भ
खर मानाव कि खोट
तेच उमगत नव्हतं..
कारण अजूनही लिहिणाऱ्याची ..
जात कळली नव्हती
शेवटी एवढंच..
जात कळत नाही म्हणून
माणसं टाळू नका
जाती अंता साठी....
जात कळली नव्हती
आजच्या घडीची परिस्थिती पाहता, या कवितेत थोडीशी भर टाकून आपण असे म्हटले तर जास्त योग्य होईल...
आपल्याला हवी ती जात पकडून
प्रथम आपली पोळी भाजून घेऊ
नंतर सत्य विपरित निघाले तर
मिठाची गुळणी धरून बसू
आपले काम झाल्याशी कारण
लोकांची दिशाभूल झाली तर झाली
त्यांची आठवण कमकुवत असते
आपली तुम्बडी भरली की झाले
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Sat, 07/28/2018 - 14:35
नवीन
अकोला : गडकरींचा एक निर्णय आणि कमळगंगेला जीवदान"
गडकरीजींनी महामार्ग बांधत असताना रस्ते बांधायला लागणारी माती कमळगंगेच्या पात्रातुन काढुन वापरली ज्यामुळे कमळगंगेच पा त्र रुंद व खोल झाल !! अश्या प्रकारे कमळगंगेला पुर्नजीवित करण्यात यश आलेल आहे ,!
अकोला जिल्हा टँकर मुक्त झालेला आहे !!
https://youtu.be/hXKkQktIHyU
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Sat, 07/28/2018 - 17:53
नवीन
असं out of box विचार करण्याची अक्कल मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना आली तर , मुंबई पुरमुक्त करणे फार कठीण नाही.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 07/28/2018 - 18:00
नवीन
मा.गो.,
मनपाच्या हातात अशी कितीशी सत्ता आहे? त्यातून आजूनही मुंबईच्या उरावर बसतेच आहे गर्दी. राज्य व केंद्र शासनांची काहीच जबाबदारी नाही?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Sat, 07/28/2018 - 20:35
नवीन
पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास पाण्याचा निचरा न झाल्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचते. भर घालून इमारती बांधल्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा येतो व सखल भागात पाणी साचते. ह्यावर उपाय म्हणजे प्रथम हे अडथळे काढून टाकावे लागतील, हे काम खर्चिक असल्याने महानगरपालिका करू शकणार नाही. पण महानगरपालिकेने अशा भागात विकासकांना पुनर्बांधकामास अमर्याद चटई क्षेत्र द्यावे, त्याबदल्यात पूर रेषेच्या वर बांधकाम, सांडपाण्याचा पुनर्वापर , बहुमजली पार्किंग, इमारतीपर्यंतचा (एलिव्हेटेड)रस्ता ई. विकासकाकडून करून घ्याव्यात.
गर्दी ही समस्या न होता बांधकाम क्षेत्रास लाभदायक ठरेल. महानगरपालिकेस अधिक कर मिळेल, त्याचा उपयोग सार्वजनिक वाहतूक अधिक कार्यक्षम करण्यास वापरता येईल. जलवाहतूकिसारखे कमी खर्चिक पर्यायही सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरता येतील. हे काम कठीण असले तरी अशक्य नाही.
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Sun, 07/29/2018 - 04:34
नवीन
पाच वर्षांखालील मुलींचा मृत्यूदर सर्वाधिक; मुलींबाबतचा भेदभाव कायम असल्याचे स्पष्ट
Updated: Jul 29 2018 01:27 a.m. | Written by लोकसत्ता टीम
|| शैलजा तिवले
मुलींबाबतचा भेदभाव कायम असल्याचे स्पष्ट; आहार, उपचारांकडे दुर्लक्ष
राज्यभरातील गावागावांत लेक वाचवा अभियान राबविले गेले असले तरी पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूदरामध्ये मुलींच्या मृत्यूचे प्रमाण अद्यापही अधिक असल्याचे २०१६च्या नमुना नोंदणी अहवालावरून (सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टम) समोर येत आहे. तसेच २०१३ नंतर मुलींच्या जन्मदराचे प्रमाणही घसरत असून २०१६ मध्ये ते ८७६ पर्यंत खाली आल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.
असे अहवाल प्रत्येक 2 / 3 वर्षांनीं प्रसिद्ध केले जातात , सरकार ने लिंग निदान चाचण्या वर बंदी घालून सुद्धा मुलींचा जन्मदर कमी होत चालला आहे .
असे असताना भिडे गुरुजी सारख्या जाणता माणसाने ' आंबे खाऊन मुलगे होतात ' अस वक्तव्य केले .
त्या नंतर ' अर्धवट व्हिडिओ आहे , त्यांनी अस म्हटलेच नाही , नीट ऐकू येत नाही ' असे वकिली मुद्दे मांडुन त्यांच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ समस्त ब्रह्मवर्ग आंतरजालावर उतरतो काय हे सगळ अनाकलनीय आहे .
तेच वक्तव्य जर आंबेडकर , आठवले , पवार ,राणे यांच्या पैकी कोणाचे असते तर ब्रह्मवर्गाने हेच मतप्रदर्शन केले असते का ?
जातीव्यवस्थे च्या उतरंडी मध्ये वरच्या मानाच्या स्थानी असलेल्या वर्गाकडून ही अपेक्षा नव्हती . त्या वक्तव्या बद्दल सडेतोड विचार मांडले गेले असते तर ब्रह्मवर्गा बद्दल असलेला दुषित पूर्वग्रह ( इति - आदित्य कोरडे ) कमी होण्यास मदत झाली असती .
- Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे
Mon, 07/30/2018 - 08:31
नवीन
भाजप च हे दिसून येणारे काम पण मीडिया याच कौतुक न करता त्या 40 लाख लोकांच्या वेदना छापत बसणार , या बेकायदेशीर लोकांमूळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते पण मीडिया ला त्याच्या शी घेणेदेणे काय ? या विषयांवर काँग्रेस ची अवस्था धरलसोडलचावतय अशी झालेली दिसते .
आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मसुदा आज जाहीर झाला आहे. या यादीनुसार आसाममध्ये २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोक कायदेशीर असून ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना बेकायदा घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आसाममध्ये घुसखोरी केलेल्या आणि नागरिकता सिद्ध करू न शकलेल्या या ४० लाख लोकांना बेघर व्हावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आसाममध्ये ३ कोटी २९ लाख ९१ हजार ३८४ लोकांनी वैधतेसाठी अर्ज केला होता. त्यातील ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना अवैध घोषित करण्यात आले आहे. कागदपत्रांची पुर्तता करू न शकणाऱ्या आणि नागरिकता सिद्ध न करू शकणाऱ्या या ४० लाख लोकांना अवैध घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, हा मसुदा अंतिम नसून ज्यांना त्यावर आक्षेप आहे, ते लोक तक्रार करू शकतात. ज्यांचं नाव या यादीत आलं नाही ते लोक पुन्हा अर्ज करून आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकतात, असं एनआरसीच्या राज्य समन्वयकाने स्पष्ट केलं. दरम्यान, एनआरसीच्या या मसुद्यावर तृणमूल काँग्रेसने संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे. तर आरजेडीने यावर राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे.
सात जिल्ह्यात कलम १४४ लागू
हा मसुदा जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सशस्त्र पोलिसांच्या २२० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. बारपेटा, दारंग, दिमा हासौ, सोनितपूर, करीमगंज, गोलघाट, धुबरी आदी जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Tue, 07/31/2018 - 09:56
नवीन
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2